xSEO

हिपॅटायटिस प्रकार, लक्षणे, उपाय आणि माहिती (Types, Causes, Symptoms And Hepatitis Information In Marathi)

Trupti Paradkar  |  Oct 22, 2021
Hepatitis information in Marathi

हिपॅटायटिस (Hepatitis In Marathi) हा यकृताचा विकार आहे. व्हायरल इनफेक्शनमुळे हिपॅटायटिस होण्याची शक्यता असते. या इनफेक्शनमुळे यकृताला सूज येते. यकृत म्हणजेच लिव्हर वर सूज येण्याची कारणे समजली तर हिपॅटायटिसवर त्वरीत उपचार करता येतात. हिपॅटायटिस निरनिराळ्या प्रकारचे असतात. पाच मुख्य प्रकारामध्ये त्याचे वर्गीकरण केले जाते. हे पाचही प्रकार गंभीर स्वरूपाचे असून ते महामारीचे भयंकर रूप धारण करू शकतात. यासाठीच प्रत्येकाला हिपॅटायटिसबाबत सर्व माहिती (Hepatitis Information In Marathi) वेळीच असणं गरजेचं आहे. ज्यामुळे त्वरीत हिपॅटायटिस इनफेक्शनवर उपाय केले जाऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या हिपॅटायटिसची लक्षणे (Hepatitis Symptoms In Marathi), हिपॅटायटिस होण्याची कारणे (Causes Of Hepatitis) हिपॅटायटिस संसर्गाचे प्रकार (Types Of Viral Hepatitis), हिपॅटायटिसवर उपचार मराठीतून ( Hepatitis Treatment In Marathi) आणि हिपॅटायटिसवर प्रतिबंधात्मक उपाय (Hepatitis prevention in Marathi)

पोटाचे विकार आणि पोट फुगणे उपाय जाणून घ्या (Bowel Disorders In Marathi)

हिपॅटायटिस होण्याची कारणे (Causes Of Hepatitis In Marathi)

Hepatitis Information In Marathi

हिपॅटायटिस (Hepatitis In Marathi) होण्याची कारणे समजली तर हा विकारावर योग्य ते उपचार करणं नक्कीच सोपं जाऊ शकतं. यासाठी जाणून घ्या या हिपॅटायटिस होण्यामागची काही प्रमुख कारणे 

व्हायरल इनफेक्शन (Viral Infection)

हिपॅटायटिस हा एक संसर्गजन्य विकार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे हिपॅटायटिस इनफेक्शन झालेल्या लोकांच्या संपर्कात येणं अथवा त्यांच्या वस्तू वापरणं हे हिपॅटायटिस होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. मुख्यत्वे हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी व्हायरस संसर्ग वाढवण्यासाठी परिणामकारक ठरतात. 

मद्यपान (Alcohol Intake)

हिपॅटायटिस होण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मद्यपान असू शकते. जे लोक अती प्रमाणात मद्यपान करतात त्यांचे यकृत कमजोर होते. हिपॅटायटिस हा यकृताचा विकार असल्यामुळे अशा लोकांना हिपॅटायटिस होण्याची शक्यता जास्त असते. 

ऑटोइम्यून प्रणालीची प्रतिक्रिया (Autoimmune System Response)

काही केसेसमध्ये एखाद्याची ऑटोइम्यून प्रणाली अथवा शरीराची प्रतिकारक यंत्रणाच या विकाराला कारणीभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत यकृताचे कार्य बिघडल्यामुळे त्या व्यक्तीला हिपॅटायटिस इनफेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. 

हिपॅटायटिस संसर्गाचे प्रकार (Types Of Viral Hepatitis In Marathi)

Hepatitis Information In Marathi

हिपॅटायटिस (Hepatitis in Marathi) हे व्हायरल इनफेक्शन असून त्याचे हे पाच मुख्य प्रकार आहेत.

हिपॅटायटिस ए (Hepatitis A)

हिपॅटायटिस ए हा प्रकार साधारणपणे दूषित पाणी अथवा अन्नामधून पसरतो. भारतात बाहेरील आणि उघड्यावरील पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वर्षभरात अनेक लोक या प्रकारामुळे आजारी पडतात. त्यामुळे साधारणपणे संसर्ग झालेल्या रूग्णाला हिपॅटायटिस ए होण्याची शक्यता जास्त असते.

हिपॅटायटिस बी (Hepatitis B)

हिपॅटायटिस बी (Hepatitis B In Marathi) ची लागण मात्र या इनफेक्शनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्त, व्हजायनल स्त्राव, शूक्राणूच्या संपर्कात आल्यामुळे इतर लोकांना होऊ शकते. संक्रमित लोकांचे इंजेक्शन, शारीरिक जवळीक, त्यांच्या संक्रमित वस्तू वापरल्यामुळे कोणालाही हिपॅटायटिस बी होण्याचा धोका असतो. 

हिपॅटायटिस सी (Hepatitis C)

हिपॅटायटिस सीच्या विषाणूमुळे या प्रकारचा हिपॅटायटिस होण्याची शक्यता असते. हा हिपॅटायटिसदेखील संक्रमित व्यक्तीच्या इंजेक्शन अथवा सेक्समधून पसरू शकतो. मात्र हे इनफेक्शन गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे त्याचे संक्रमण वेगाने होते.

हिपॅटायटिस डी (Hepatitis D)

हिपॅटायटिसच्या या प्रकाराला डेल्टा हिपॅटायटिस असंही म्हणतात. हा एक गंभीर यकृताचा विकार असून तो हिपॅटायटिस डी या विषाणूमुळे होतो. हा एक दुर्मिळ प्रकारचा प्रकार असून तो हिपॅटायटिस बी च्या संसर्गाने होण्याची शक्यता असते. कारण हिपॅटायटिस बीच्या संपर्कात आल्याशिवाय हिपॅटायटिस डी वाढत नाही. 

हिपॅटायटिस इ (Hepatitis E)

हिपॅटायटिस ई हा प्रकार म्हणजे एक हिपॅटायटिस ई विषाणूमुळे होणारा जलजन्य विकार आहे. प्रामुख्याने ज्या ठिकाणी अस्वच्छता असते अथवा दूषित पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही अशा ठिकाणी हा विकार आढळून येतो. खराब पाण्याच्या संसर्गामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना हे इनफेक्शन होऊ शकते. 

बायपोलर डिसऑर्डर – एक मानसिक विकार (Bipolar Disorder In Marathi)

हिपॅटायटिसची लक्षणे (Hepatitis Symptoms In Marathi)

Hepatitis Information In Marathi

हिपॅटायटिसच्या प्रकारानुसार त्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. कधकधी एक ते तीन प्रकारच्या हिपॅटायटिसची लक्षणे एकसमानदेखील असू शकतात. पण एखादा हिपॅटायटिस तीव्र स्वरूपाचा असेल तर तो कोणत्या टप्प्यावर आहे यानुसार लक्षणांमध्ये बदल होत जातो. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये हिपॅटायटिस विषाणू आक्रमक होतो आणि यकृतामध्ये पसरतो. यासाठीच या व्हायरसला आटोक्यात ठेवण्यासाठी अथवा त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हिपॅटायटिसची काही सामान्य लक्षणे माहीत असणं गरजेचं आहे. यकृतासंबधित काही लक्षणे ओळखून हिपॅटायटिसचे निदान करता केले जाते. 

हिपॅटायटिसवर उपचार मराठीतून (Hepatitis Treatment In Marathi)

Hepatitis Information In Marathi

रूग्णाला कोणत्या प्रकारचा हिपॅटायटिस झालेला आहे यानुसार त्याच्यावर उपचार केले जातात. यासाठी आधी  हिपॅटायटिसच्या प्रकाराचे निदान केले जाते.

कावीळ ची लक्षणे आणि घरगुती उपचार (Kavil Symptoms In Marathi)

हिपॅटायटिसवर प्रतिबंधात्मक उपाय (Hepatitis Prevention In Marathi)

हिपॅटायटिसच्या कोणत्याही प्रकारचे इनफेक्शन होऊ नये यासाठी प्रत्येकाने स्वतःची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी (Hepatitis B Vaccine In Marathi) यावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहेत. मात्र इतर प्रकार टाळण्यासाठी काही गोष्टींबाबत सावध राहणं हा उत्तम पर्याय असू शकतो. 

हिपॅटायटिसबाबत काही निवडक प्रश्न – FAQ’s

1. कोणत्या प्रकारचा हिपॅटायटिस पूर्ण बरा होत नाही ?

हिपॅटायटिसच्या पाच प्रकारांपैकी फक्त ए, बी आणि सीवर उपचार उपलब्ध आहेत. मात्र असं असलं तरी यातील फक्त ए आणि सी पूर्ण बरा होतो. इतर प्रकारामध्ये रुग्णाच्या स्थितीमध्ये सुधारणा केली जाते मात्र ते पूर्ण बरे होतील याची खात्री नसते. 

2. हिपॅटायटिस पुन्हा पुन्हा होतो का ?

हिपॅटायटिस कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याचे इनफेक्शन किती प्रमाणात झाले आहे यावर तो पुन्हा होणार का हे ठरू शकते. बऱ्याचदा काही प्रकारच्या हिपॅटायटिसचे इनफेक्शन खूप काळ शरीरात राहू शकते. 

3. हिपॅटायटिसवर एखादी लस उपलब्ध आहे का ?

हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी  (Hepatitis B Vaccine In Marathi) वर लस उपलब्ध आहे. त्यामुळे  वेळीच लसीकरण करून या इनफेक्शनपासून बचाव करणे नक्कीच योग्य ठरेल.

Read More From xSEO