Natural Care

पिंपल्समुळे चेहरा काळवंडला असेल तर अशी घ्या काळजी

Leenal Gawade  |  Sep 20, 2020
पिंपल्समुळे चेहरा काळवंडला असेल तर अशी घ्या काळजी

चेहऱ्यावर पिंपल्स येणे हे काही नवे नाही. चेहऱ्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे पिंपल्स येत असतात. पण पिंपल्स येऊन गेल्यानंतर त्याचे डाग चेहऱ्यावर राहिले तर मात्र हे पिंपल्स त्रासदायक वाटू लागतात. तुमच्या चेहऱ्यावरही पिरेड्सदरम्यान, प्रवासामुळे किंवा अरबटचरबट खाण्यामुळे पिंपल्स येत असतील तर आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. तर या पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग राहण्याची शक्यता असते. हे डाग चेहऱ्यावरुन घालवणे म्हणजे चंद्रावरुन डाग घालवण्यापेक्षाही कठीण असते. पण पिंपल्समुळे काळवंडलेला चेहरा तुम्ही पूर्ववत करु शकता. तेही अगदी थोडीशी काळजी घेऊन. चला तर जाणून घेऊया तुम्ही नमकं काय करायला हवं ते

सोप्या उपायांनी करा चेहऱ्यावरील लालसरपणा कमी

स्क्रब महत्वाचे

Instagram

 पिंपल्समध्ये बरेचदा पस असतो. हा पस बाहेर आल्यानंतर तेथील त्वचा काळी पडते. त्वचा काळी पडताना तेथे काही मृत त्वचेचा थरही तयार होतो. हा थर तुमची त्वचा अधिक काळी करत असते. ही त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब हा उत्तम पर्याय आहे. आठवड्यातून किमान तीनवेळा चांगल्या स्क्रबचा उपयोग करुन तुमची त्वचा स्क्रब करा. स्क्रब निवडताना ते माईल्ड असू द्या. क्रिमी स्वरुपात असलेले स्क्रब मुळीच घेऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला पिंपल्स जास्त होण्याची शक्यत असते. त्यामुळे लिक्वीड बेस स्क्रबचा उपयोग करा. अत्यंत हळुवारपणे तुम्ही चेहरा स्क्रब करा. 

नैसर्गिकरित्या सौंदर्य खुलविण्यासाठी खास टिप्स

टोनरचा करा उपयोग

Instagram

तुम्ही स्क्रब केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्स उघडतात. हे पोअर्स बंद करणे फार महत्वाचे असते. असे करताना तुमच्या चेहऱ्याच्या पोअर्समध्ये केमिकलही जाऊ देऊ नका. चेहरा पाण्याने स्वच्छ करुन त्यावर टोनर लावा. टोनर तुमच्या त्वचेवरील उघडी असलेली छिद्र बंद करण्याचे काम करते. शिवाय तुमची त्वचा टोन्ड करते. पिंपल्समुळे तुमची त्वचा सैलही होते. अशावेळी तुम्हाला त्वचा टोन्ड करणेही फार महत्वाचे आहे. टोनरच्या प्रयोगामुळे तुमच्या त्वचेमध्ये बराच फरक पडतो.

फेस मसाज महत्वाचा

Instagram

फेस मसाज हा चेहऱ्यासाठी कधीही महत्वाचा असतो. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असो वा नसो चेहऱ्यासाठी मसाज हा फारच फायदेशीर असतो. फेस मसाज  करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या फेस सीरमचा उपयोग करत असाल तर फारच उत्तम. रात्रीच्या वेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला शोभेल असे सीरम घेऊन लावा. पिंपल्सचा त्रास हा तेलकट त्वचेला अधिक होतो. त्यामुळे चेहऱ्यासाठी सीरम निवडताना तुम्ही त्वचेच्या प्रकारानुसार याचा उपयोग करा. तेलकट त्वचेसाठी साधारणपणे ग्रीन टी असलेले सीरम वापरणे नेहमीच फायद्याचे ठरते. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या अन्य समस्याही दूर होतात. त्यामुळे दिवसातून किमान दोन वेळा तुम्ही या सीरमचा उपयोग करा. आंघोळीनंतर आणि रात्री झोपताना तुम्ही या सीरमचा उपयोग करा. तळहातावर थोडे सीरम घेऊन ते चेहऱ्याला पसरवा आणि साधारण दोन मिनिटांसाठी मसाज करा. 

पाठीचा मेकअप करण्यासाठी बेस्ट मेकअप प्रोडक्ट

पिंपल्स फोडू नका

Instagram

पिंपल्स आल्यानंतर ते चेहऱ्यावरुन काढून टाकण्यासाठी अनेक जण पिंपल्स फोडणे पसंत करतात. पण असे करु नका. जर तुम्हाला पिंपल्स चेहऱ्यावर नकोसे झाले असतील आणि त्यातून पस  काढून टाकायचा असेल. तर तुम्ही चेहऱ्याला वाफ घ्या आणि मगच पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करा. पण असे करताना तुम्ही पिंपल्स खूप दाबू नका. जर त्यातून पस येत असेल तर तो स्वच्छ करुन घ्या.चेहऱ्यावर बर्फ लावून ती जखम बंद करुन घ्या. त्यानंतर तुमच्या चेहऱ्याला शक्यतो काही लावू नका. 


आता पिपंल्सने चेहरा काळवंडला असेल तर हे काही उपाय नक्की करुन पाहा.

तुम्ही उत्कृष्ट स्क्रबच्या शोधात असा तर My Glammचे हे प्रोडक्ट नक्की ट्राय करा

Read More From Natural Care