लाईफस्टाईल

एकेकाळी ऑडीशनमध्ये रिजेक्ट झालेले हे स्टार्स तुम्हाला माहीत आहेत का?

Aaditi Datar  |  Mar 18, 2019
एकेकाळी ऑडीशनमध्ये रिजेक्ट झालेले हे स्टार्स तुम्हाला माहीत आहेत का?

जर तुम्ही रिजेक्शन (rejection) घाबरत असाल किंवा रिजेक्ट होण्याच्या भीतीने पुढचं पाऊल टाकत नसाल तर आम्हीही तुम्हाला सांगणार आहोत बॉलीवूड (Bollywood) च्या काही यशस्वी स्टार्सबद्दल, जे एकेकाळी ऑडिशनमध्येच झाले होते फेल. जे स्टार्सना आपण मोठ्या पडद्यावर पाहून त्यांच्या अभिनयाचं आज कौतुक करतो. एक काळ असा होता की, या स्टार्सना अनेक ठिकाणी उंबरे झिजवावे लागले होते. पण त्यांनी या परिस्थितीतही रिजेक्शनमुळे हार मानली नाही आणि पुढे जात राहिले. त्यांचा हाच आत्मविश्वास यशाची शिडी बनला आणि आज त्यांनी बॉलीवूडमध्ये नाव कमवलंय. चला जाणून घेऊया बॉलीवूडमधले या स्टार्सबाबत जे कधीकाळी फेल झाले पण आज आहेत सुपरहीट.

रणवीर सिंग Ranveer Singh
‘गली बॉय’ बनण्याआधी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने आपल्या अनेक फिल्म्समधून अभिनयाची छाप पाडली. पण एकेकाळी त्यालाही रिजेक्शनचं दुःख सहन करावं लागलं होतं.


रणवीर सिंगने फिल्म ‘भाग मिल्खा भाग’ साठी ऑडिशन दिलं होतं. या फिल्ममध्ये रणवीरला मिल्खा सिंगची आयकॉनिक भूमिका करायची होती. पण त्याला रिजेक्ट करण्यात आलं आणि ही भूमिका मिळाली फरहान अख्तरला .

Also Read : मन्नत बंगला

वरुण धवन Varun Dhawan
‘सुई धागा’ आणि ‘ऑक्टोबर’ सारख्या चित्रपटातून आपली ओळख बनवणाऱ्या वरुण धवनच्या आयुष्यात ही असा एक काळ होता, जेव्हा त्याला एका मागोमाग रिजेक्ट करण्यात आलं होतं. दिग्दर्शक डेव्हीड धवन यांचा मुलगा असूनही त्याने हे सहन केलं. मात्र त्याने न घाबरता प्रयत्न सुरूच ठेवले आणि आज त्याचं यश दिसतंय.


खूप कमी जणांना माहीत असेल की, वरूण धवनने ‘धोबी घाट’ आणि ‘लाइफ ऑफ पाई’ यासारख्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिलं होतं.

विकी कौशल Vicky Kaushal

बॉलीवूडमधला लेटेस्ट हार्टथ्रोब विकी कौशलला त्याच्या ‘उरी’ चित्रपटांमुळे प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलंल. ‘मसान’ फिल्ममधून त्याने अभिनयाचा करियरचा श्रीगणेशा केला. त्यानंतर विकीने ‘राजी’ सारख्या वुमन ओरिएटेंड चित्रपटातही स्वतःची जागा बनवत प्रेक्षकांचं मन जिंकलं.


पण तुम्हाला हे माहीत आहे का?, विकीनेही भाग मिल्खा भाग’ या चित्रपटासाठी ऑडीशन दिलं होतं आणि त्याचाही पदरी नकारच आला होता.

आलिया भट्ट Alia Bhatt
बॉलीवूडमध्ये सध्या सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट. अनेक हीट चित्रपट आणि चांगल्या भूमिका आज आलियाच्या नावावर आहेत. पण एकेकाळी आलियाचं वजन जास्त होतं, त्यामुळे लोक तिला आलू म्हणत. आलियाने तेव्हा रणबीरने भूमिका केलेल्या ‘वेक अप सिड’ या चित्रपटासाठी ऑडीशन दिलं होतं पण तिला रिजेक्ट करण्यात आलं.


एवढंच नाहीतर आलिया भटने संजय लीला भन्साली यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटात रानी मुखर्जीच्या बालपणीच्या भूमिकेत काम करण्याचीही इच्छा बोलून दाखवली होती.

अनुष्का शर्मा Anushka Sharma

बॉलीवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये आज अनुष्का शर्माचं नावही सामील होतं. अनुष्का आता इतकी प्रसिद्ध झाली आहे, पण एकेकाळी याच अनुष्काला राजकुमार हीरानीसोबत काम करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती.  


तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अनुष्काने ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘थ्री इडियट्स’ या फिल्मसाठी ऑडीशन दिलं होतं. पण तिच्या पदरी रिजेक्शन आलं. पण अखेर तिचीही इच्छा पूर्ण झाली ती ‘पीके’ आणि ‘संजू’ या चित्रपटाच्या रूपात.

दीपिका पदुकोण Deepika Padukone
बॉलीवूडची डिंपल गर्ल आणि ‘पद्मावत’ दीपिका पदुकोणची गणती आज टॉपच्या अॅक्ट्रेसेसमध्ये होते. बॉलीवूडच्या बहूतेककरून सगळ्या मोठ्या अॅक्टर्ससोबत तिने काम केलं आहे. पण याच दीपिकाला ईराणी दिग्दर्शक माजिद मजीदीच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ या चित्रपटात काम करायचं होतं.


त्यासाठी तिने लुक टेस्टही दिली होती पण काही कारणांमुळे तिचं सिलेक्शन झालं नाही.

सारा अली खान Sara Ali Khan
तुम्ही विचार करत असाल की, सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी असल्याने सारा अली खानला स्टार किड असल्याचा भरपूर फायदा मिळत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. या क्षणी सारा अली खानकडे अनेक चित्रपट आहेत पण एक काळ असा होता जेव्हा तिला कोणीचं भाव देत नव्हतं.


साराने ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ या चित्रपटासाठी फातिमा सना शेखच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं पण ती फेल झाली.

अक्षयकुमार Akshay Kumar
बॉलीवूडचा ‘पॅडमॅन’ अक्षयकुमार आपल्या चांगल्या अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो. कोणतीही भूमिका असो तो अगदी सहजतेने त्यात मोल्ड होतो. मग तो कॉमेडी असो वा अॅक्शन असो वा बायोग्राफी, तो प्रत्येक चित्रपट आपल्या दमावर हिट करून दाखवतो.  


याच अक्षयकुमारला ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट करण्यात आलं होतं.

अमिषा पटेल Amisha Patel
बॉलीवूड फिल्म ‘कहो न प्यार है’ मध्ये ऋतिक रोशनच्या बरोबरीने अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवणारी अमिषा पटेल आता मात्र बॉलीवूडमधून गायब झाली आहे. खरंतर या चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर नेलं होतं.  


पण फार कमी लोकांना माहीत असेल की, ‘कहो न प्यार है’ आधी तिने आमिर खानच्या बहुचर्चित ‘लगान’साठीही ऑडीशन दिलं होतं पण ती भूमिका मात्र मिळाली  ग्रेसी सिंगला.

हेही वाचा – 

रणवीर सिंगने चित्रपटाचे मानधन घेण्यासाठी का दिला नकार

आगामी चित्रपटासाठी दीपिकाची दुहेरी कसरत

‘या’ आहेत बॉलीवूडच्या सुपरवुमन ज्यांनी स्वबळावर केले चित्रपट सुपरहिट

Read More From लाईफस्टाईल