Care

केसगळती रोखण्यासाठी घरच्या घरी बनवा शँपू, करा नैसर्गिक उपचार

Dipali Naphade  |  Jan 13, 2020
केसगळती रोखण्यासाठी घरच्या घरी बनवा शँपू, करा नैसर्गिक उपचार

सध्या वातावरण सतत बदलत असतं. या वातावरणात तब्बेत तर खराब होतेच, पण त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो ते आपल्या केसांवर. बऱ्याचदा केसगळतीची समस्या वातावरण बदललं की त्रासदायक ठरते. उन्हाळ्यात केस पातळ होणं, पावसाळ्यात केसगळती आणि हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा अशा समस्या तर होतच असतात. मग अशावेळी केसगळती ही कॉमन समस्या असते. त्यावेळी घरगुती उपाय शोधायला बरेच जण सुरुवात करतात. पण केसगळती रोखण्यासाठीही आपल्या स्वयंपाकघरामध्ये अनेक वस्तू असतात. नैसर्गिकरित्या आपण आवळा, रीठा आणि शिकेकाई यांचाही वापर करू शकतो. या तिन्ही कॉम्बिनेशनचा उपयोग करू शकतो. बऱ्याचदा आपण केसगळतीसाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करतो. पण यामुळे आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. कारण केसगळतीवर घेतलेली औषधं ही हार्मोन्सवर अधिक परिणाम करतात. त्यामुळे देशी उपाय करून आपण आपल्या केसगळतीसाठी घरच्या घरी शँपू बनवून त्याचा वापर करू शकतो. त्याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. त्यापूर्वी केसांसाठी या वस्तूंचे नक्की काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया  – 

आवळ्याचे फायदे

आवळा (Shutterstock)

यामध्ये अँटिऑक्सिडंट असतं जे केसांना पोषण देऊन डॅमेज्ड हेअरना रिपेअर करण्याचं काम करतात. तसंच केसांची काळजी घेऊन त्यांना अधिक पोषण तर देतातच शिवाय अधिक निरोगी करण्याचं कामही करतात. यामुळे केसांच्या वाढीसाठीही फायदा होतो.

रीठाचे फायदे

रीठा (Shutterstock)

रीठामध्ये अधिक प्रमाणात लोह अर्थात आयर्न असते. जे केसांना निरोगी राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तसंच केसांची वाढ होण्यासाठीही मदत करतात. तसंच यामध्ये अधिक अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे केसगळती थांबण्यासाठी मदत करतात. 

केसगळती कशी रोखावी

शिकेकाईचे फायदे

शिकेकाई (Shutterstock)

या तीनही गोष्टींमध्ये शिकेकाईमध्ये अशी तत्व असतात जी आवळा आणि रीठाचीदेखील सगळी पोषक तत्व केसांना मिळवून देतात. तसंच निरोगी केस मिळण्यासाठीही याचा अधिक फायदा होतो. त्यामुळे केसगळती होत असेल तर घरातील या गोष्टींचा वापर करून आपण शँपू बनवून तुम्ही वापरू शकता. 

केसगळती रोखण्यासाठी वापरा घरगुती 5 सोपे हेअर मास्क

केसगळती रोखण्यासाठी घरच्या घरी कसा बनवाल शँपू

केसगळती (Shutterstock)

घरच्या घरी शँपू बनवणं अतिशय सोपं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नसतं. कशाप्रकारे करायचा शँपू पाहूया – 

1. आवळा, रीठा आणि शिकेकाई सर्व गोष्टी एक प्रमाणात घेऊन त्याचे साधारण 7 ते 8 तुकडे करून घ्या

2. हे सर्व तुकडे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. तुमचे केस लांब असतील तर याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवा

3. सकाळी यामध्ये थोडं पाणी अजून घाला आणि मग उकळवा

4. व्यवस्थित उकळल्यानंतर हे पाणी थंड करून घ्या

5. थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित मॅश करून घ्या

6. हा पल्प काढून व्यवस्थित मिक्स करा आणि गाळणीतून गाळून घ्या

7. आता केस धुण्यासाठी तुम्ही नियमित शँपूप्रमाणे याचा वापर करा

8. हे मिश्रण तुम्ही जास्त प्रमाणातही करू शकता. जे तुम्ही नियमित वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा की,  एअरटाईट जारमध्येच हे मिश्रण ठेवा

मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई

हा शँपू तुम्ही रोज वापरू शकता. तुम्हाला जर कोंड्याची समस्या असेल तर गरम पाण्यासह याचा वापर करू नका. केसांची काळजी घेणं ही खरं तर अत्यंत नाजूक गोष्ट आहे. केसगळती होत असेल तर त्याची खूपच काळजी घ्यावी लागते. अशावेळी बाहेरच्या केमिकलयुक्त वस्तूंचा वापर करण्यापेेक्षा नैसर्गिक आवळा, रीठा आणि शिकेकाईचा वापर करून बनवलेल्या शँपूचा वापर करणं हे नक्कीच चांगलं आहे. यामुळे तुमचे केस अधिक निरोगी राहतात आणि त्याशिवाय नैसर्गिक उपचार तुम्हाला घरच्या घरीही करता येतात. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Care