Fitness

Periods Lavkar Yenyasathi Upay | मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

Dipali Naphade  |  Jul 26, 2022
मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

मासिक पाळी म्हटलं की प्रत्येक महिलेसाठी हा एक नाजूक विषय आहे. काही जणींना या दिवसात होणारा त्रास, तर या चार दिवसात विविध गोष्टींना सामोरं जावं लागतं. कधीकधी काही कामानिमित्त बाहेर जायचं असतं नेमकं तेव्हाच अथवा कोणत्याही सणासमारंभाच्या दिवशीच मासिक पाळीचा त्रासही सहन करावा लागतो. अशावेळी मासिक पाळी लवकर (Pali Lavkar Yenyasathi Upay) यायला हवी असते. मग काही जणी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मासिक पाळी लवकर आणण्यासाठी गोळ्या घेतात. पण त्यासाठी तुम्ही घरगुती गोष्टींचा अवलंबदेखील करू शकता. खरं तर मासिक पाळी येण्याची तारीख आणि वार हा परफेक्ट ठरलेला नसतो. साधारण 28 दिवसांनी पाळी येते. पण काही जणींच्या बाबतीत ही तारीख बऱ्याचदा मागेपुढे होत असते. मासिक पाळी न येण्याची अनेक कारणे (Causes of Delay In Period in Marathi) आहेत.  कधीतरी असं होतं की, दिवस उलटून गेले तरीही मासिक पाळी येत नाही. अशावेळी आपली अधिक चिडचिड होत असते. पाळी उशीरा आली किंवा खूप आधी आली तर या दोन्हीही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. पाळी वेळेवर येणं म्हणजे आपण निरोगी असणं. त्यामुळे असं कधी झालं तर तुम्हाला मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय उपाय (Periods Lavkar Yenyasathi Upay) करता येतील. कधी कधी पाळी लवकर येत नाही. मग पाळी लवकर येण्यासाटी (Masik Pali Yenyasathi Upay) काय करावे लागते. कधी कधी पाळी मागेपुढे होते. पण मग अशावेळी नक्की कोणते घरगुती उपाय करायला हवेत हे आपल्याला माहीत हवे. 

आल्याचा करा वापर

Masik Pali Yenyasathi Upay

आलं हे मुळातच उष्ण असतं. असं म्हटलं जातं की, पूर्वीच्या काळी मासिक पाळी लवकर येण्यासाठी आल्याचा वापर करण्यात येत असे. तुम्ही आताही आल्याचा चहा पिऊन मासिक पाळी लवकर येण्यासाठी प्रयत्न करू शकता. पण याचा अतिरेक करू नका. आलं हे आरोग्यासाठी जितकं चांगलं तितका त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो.  त्यामुळे प्रमाणात तुम्ही आल्याचा चहा दिवसभरातून दोन वेळा जरी प्यायलात तरी तुम्हाला मासिक पाळी लवकर आणण्यासाठी उपयोग होऊ शकतो. 

पपईनेसुद्धा येईल मासिक पाळी लवकर

Pali Lavkar Yenyasathi Upay

मासिक पाळी लवकर येण्यासाठी (Masik Pali Lavkar Yenyasathi Upay) तुम्ही जर घरगुती उपाय शोधत असाल तर तुम्हाला पपईचा उपयोग करून घेता येतो. मासिक पाळी येत नसेल अथवा थांबलेली मासिक पाळी येण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही पपईचे सेवन करू शकता. पपईमध्ये कॅरोटीन अस्ट्रोजन हार्मोन्स उत्तेजित करतात त्यामुळे मासिक पाळी लवकर येते. तुम्ही अशावेळी कच्चे पपईचे सेवन करू शकता. तसंच कच्च्या पपईचा रसही तुम्ही पिऊ शकता. दोन्ही स्वरूपात तुम्ही उपयोग केल्यास मासिक पाळी लवकर येण्यास (MC Lavkar Yenyasathi Upay) मदत मिळते. 

थांबलेली पाळी येण्यासाठी उपाय ऊसाचा रस पिणे

MC Lavkar Yenyasathi Upay

ऊसामध्येही जास्त उष्णता असते. त्याशिवाय ऊसाच्या रसामध्ये लिंबू आणि आलंदेखील मिक्स करण्यात येतं. त्यामुळे मासिक पाळी लवकर आणण्यासाठीही हादेखील एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय आहे. तुम्हाला जर ऊसाचा रस प्यायला आवडत असेल तर मासिक पाळीच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि लवकर मासिक पाळी येण्यासाठी हा पर्याय तुम्ही अवलंबू शकता. ऊसाच्या रसाने अंगामध्ये अधिक उष्णता निर्माण होण्यास मदत मिळते आणि त्यामुळेच पाळी लवकर येते. 

ओव्यामुळे पडतो फरक

Masik Pali Yenyasathi Upay

ओवा हा खरं तर पोटातील आजारांवर उत्तम उपाय आहे. त्याशिवाय ओव्यातदेखील उष्णता जास्त आहे. ज्या महिलांना मासिक पाळी उशीरा येण्याचा त्रास आहे त्यांनी गुळासोबत ओव्याचं सेवन करणं हा उत्तम पर्याय आहे. मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही 1 चमचा ओवा आणि 1 चमचा गूळ पाण्यामध्ये रात्रभर भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असं केल्याने तुम्हाला मासिक पाळी लवकर येते. त्याचा तुम्हाला त्रासही होत नाही आणि हे अतिशय नैसर्गिक उपचार आहेत. ज्यामुळे तुमच्या प्रकृतीला कोणतीही बाधा येत नाही.  

धणे

Periods Lavkar Yenyasathi Upay

ज्या महिलांना मासिकपाळी नीट आणि नियमित वेळेवर येत नाही त्यांच्यासाठी धणे अर्थात कोथिंबीरीचे दाणे अधिक फायदेशीर ठरतात. धण्यामध्ये असे गुणधर्म आहेत जे मासिकपाळी दरम्यान शरीरामध्ये उत्तेजित करतात आणि मासिक पाळी लवकर येण्यासाठी (Period Lavkar Yenyasathi Upay) प्रवृत्त करतात. धण्याचा वापर करण्यासाठी दोन कप पाण्यात तुम्ही धणे उकळून घ्या आणि जेव्हा ते उकळून साधारण एक कप पाणी होईल तेव्हा थंड करण्यासाठी ठेवा. या काढ्याचा तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा उपयोग करा. याचे सेवन मासिक पाळी येण्यासाठी उपयुक्त ठरते.

डाळिंबाचे दाणे

डाळिंबाचे दाणे आपण नियमित खातो. पण मासिक पाळी लवकर येण्यासाठी (Masik Pali Yenyasathi Upay) याचा उपयोग होऊ शकतो हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. डाळिंब हे असं फळ आहे जे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरते. महिलांना नियमित स्वरूपात दोन ते तीन वेळा डाळिंबाच्या रसाचे सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. तसंच रक्ताच्या कमरतेसारखी समस्या असल्यास, यासाठीही डाळिंबाच्या रसाचा उपयोग होतो. तुम्ही डाळिंबाचा रस आणि ऊसाचा रसही एकत्र करून पिऊ शकता. यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत मिळते. 

बडिशेप

Pali Lavkar Yenyasathi Upay

जेवल्यानंतर अनेक जणांना बडिशेप खाण्याची सवय असते. यामुळे जेवण पचविण्यास मदत मिळते. पण महिलांना मासिक पाळी उशीरा येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय करायचा असेल तर बडिशेप हा प्रभावी उपचार आहे. महिला बडिशेपचा उपयोग चहामध्ये अथवा नुसते खाऊनही करू शकतात. ब़डिशेपेचा चहा हा एक औषधीय चहा आहे जो मासिक पाळी अधिक लवकर येण्यासाठी गुणकारी ठरतो. या गोष्टीची काळजी घ्या की, सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हा चहा प्यावा. यासह बिस्किट्स अथवा अन्य खाण्याचे पदार्थ खाऊ नयेत. उपाशीपोटी हा चहा प्यायल्यावर अधिक फायदेशीर ठरते. यासाशिवा एका ग्लास पाण्यात बडिशेप रात्रभर भिजवा आणि सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायल्यासदेखील याचा फायदा मिळू शकतो. 

मेथीचे दाणे

Masik Pali Lavkar Yenyasathi Upay

मेथीच्या दाण्याचा वजन कमी करण्यासाठी तुम्ही नेहमीच उपयोग करून घेऊ शकता. मात्र मासिक पाळी लवकर येण्यासाठीही तुम्ही मेथी दाण्यांचा उपयोग करून घेऊ शकता. मेथीचे दाणे तुम्ही एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. हा उपाय अनेक विशेषतज्ज्ञांनीही सांगितला आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. मेथीचे दाण्याचा गुणधर्म अत्यंत चांगले असून तुम्हाला याचा त्रासही होत नाही. तसंच मधुमेही व्यक्तींनादेखील मेथी दाण्याचा फायदा मिळू शकतो. 

जिऱ्याचा करा वापर

MC Lavkar Yenyasathi Upay

जिरे हे मुळातच उष्ण आहे. त्यामुळे नेहमीच जिरे खाताना जपून खावे असं सांगण्यात येते. मासिक पाळीचा संबंध शरीराच्या उष्णतेशी अधिक असतो. त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी लवकर यायला हवी असेल तर तुम्हा जिऱ्याच्या पाण्याचा अथवा जिऱ्याचा वापर करून घेऊ शकता. रात्रभर पाण्यात जिरे भिजवा आणि सकाळी उपाशीपोटी तुम्ही हे पाणी प्या.  

काजू

काजू हा शरीरासाठी अधिक उष्णता देण्यास फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी येत नसेल आणि लवकर मासिक पाळी यायला हवी असेल तर तुम्ही काजू खाणेही फायदेशीर ठरते. काजूची भाजी अथवा भाजलेले काजू तुम्ही खाल्ल्यास, तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो. यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत मिळते.  

आंबट फळे

लिंबू, संत्रे, किवी, आवळा अशा फळांमध्ये विटामिन सी हे अधिक प्रमाणात असते. त्यामुळे अशा फळांचे सेवन केल्याने प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ होते. मासिक पाळी लवकर येण्यास याची मदत मिळते. मासिक पाळी लवकर येण्याच्या हार्मोनमध्ये विटामिन सी च्या सेवनाने अधिक वाढ होते आणि मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.  

गरम पिशवीचा वापरही करता येतो

पोटाच्या खाली तुम्ही गरम पिशवीचा वापर केल्यास, मांसपेशींना आराम मिळतो आणि त्याशिवाय तणाव कमी करण्यासही मदत मिळते. ज्या महिलांना मासिक पाळी अनियमित येण्याचा त्रास आहे त्यांना हा उपाय उत्तम ठरतो. तुम्ही पोटाखाली गरम पिशवी ठेऊन शेक द्या. या प्रक्रियेने मासिकपाळी लवकर येण्यास मदत मिळते. याशिवाय काही हर्बल तेलांचा पाण्यात वापर करून तुम्ही गरम पाण्याने आंघोळ केल्यासही तुम्हाला उपयोग होतो. 

अंडी

Period Yenyasathi Upay

अंड्यांमध्ये सर्वाधिक उष्णता असते. हे सर्वांनाच माहीत आहे. अंड्यामध्ये प्रोटीन असते. ज्यामुळे शरीराच्या मासिक पाळीच्या संबंधित समस्यांशी लढण्याची क्षमता अधिक असते. अंड्यांमध्ये अधिक प्रमाणात उष्णता असल्याने मासिक पाळी येण्यास मदत मिळते. 

गूळ

गूळ हादेखील शरीरासाठी अधिक उष्ण ठरतो. त्यामुळे थंडीत नेहमी गुळाचे सेवन केले जाते. ज्यामुळे शरीराची उष्णता टिकून राहील. तुम्हाला मासिक पाळी लवकर हवी असेल तर गुळामध्ये जिरे, तेल आणि ओवा एकत्र मिसळून खा. यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत मिळते.

सेक्स

सेक्समुळेदेखील पाळी लवकर येऊ शकते. तुम्हाला हे वाचून नक्की आश्चर्य वाटलं असेल. पण सेक्समुळे तुमच्या शरीरातील उष्णता बाहेर पडते आणि त्यामुळे पाळी लवकर येण्यास फायदा होतो. तुम्ही आठवड्यातून एकपेक्षा अधिक वेळा सेक्स केल्यास, तुम्हाला पाळी नियमित येण्यास मदत मिळते. सेक्स करणे हादेखील चांगला उपाय आहे. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. मासिक पाळी लवकर येण्यासाठी हळदीचा उपयोग होतो का?

हळदीचं नाव वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. हळददेखील उष्ण आहे. त्यामुळे तुम्ही दिवसातून एकदा दुधातून हळद घालून घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. शिवाय हळद आणि दूध हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतं. हळद ही अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते. त्यामुळे मासिक पाळी लवकर आणण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि मुळात असं केल्याने मासिक पाळीच्या दिवसात त्रासही होत नाही. पोटात दुखणं कमी होतं. 

2. पाळी लवकर येण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतो का?

खजूर शरीरातील उष्णता वाढवतो. तुम्ही नियमित तारखेच्या आधी खजूर एका संयमित प्रमाणात खाणे सुरू करा. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होतो. 

3. अजून कोणत्या गोष्टीचा वापर मासिक पाळी येण्यासाठी करता येतो?

तुम्ही नियमित आहारात गाजराचा समावेश केल्यास, तुम्हाला फायदा मिळतो. गाजरामध्ये कॅराटिन असते. गाजराचा रस तुम्हाला मासिक पाळी लवकर आणण्यासाठी फायदेशीर ठरतो. 

Read More From Fitness