बऱ्याचदा कितीही काहीही केलं तरी दातावरील प्लाक जात नाहीत. पण तुम्हाला जर दातावरील प्लाक (teeth planks) घालवायचे असतील तर तुम्हाला काही सोप्या टिप्स आम्ही या लेखातून देत आहोत. दातांची व्यवस्थित काळजी घेतली नाही अथवा योग्य पद्धतीने ब्रश न केल्यास, दातावर प्लाक जमा होतात. पण यामुळे दातांमधून दुर्गंधी येणे आणि दात खराब होणे या गोष्टींमध्ये वाढ होते. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. पण त्यासाठी नक्की कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. कारण वेळेवर याकडे लक्ष देण्यात आले नाही तर पुढे जाऊन दात काळे पडू शकतात आणि ते दिसायला अत्यंत वाईट दिसू शकते. वास्तविक प्लाक तुम्ही 5 मिनिट्समध्येही घालवू शकता. यासाठी काही घरगुती उपाय आहेत आणि त्याची माहिती आपण या लेखातून घेऊ.
कोरफड आणि ग्लिसरीन
Shutterstock
दातावरील प्लाक घालविण्यासाठी तुम्ही कोरफड (Aloe Vera) आणि ग्लिसरीन (Glycerine) या दोन्हीचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एक कप बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये एक चमचा ताजी कोरफड जेल, 4 चमचे व्हेजिटेबल ग्लिसरीन आणि 1 चमचा लेमन इसेन्शियल ऑईल मिक्स करून घ्या. ही नैसर्गिक पेस्ट तुम्ही दातावर लावा आणि दात हाताने घासा. ब्रशने घासलेत तरीही तुम्ही हलक्या हाताने हे घासा. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, प्लाक दातावर राहणार नाहीत.
संत्र्याचे साल
Shutterstock
सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय म्हणजे संत्र्याचे साल. तुम्ही दातावरील प्लाक हटविण्यासाठी संत्र्याच्या ताज्या सालांचा उपयोग करा. सोललेल्या संत्र्याचे साल घ्या आणि तुमच्या दातावर या सालाने घासा. काही वेळ तसंच राहू द्या आणि काही वेळाने तुम्ही स्वच्छ पाण्याने हे धुवा. विटामिन सी असल्याने याने दातावरील प्लाक जाण्यास मदत मिळते. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. तसंच तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही याची पावडर करून ठेवा आणि रोज सकाळी याची पेस्ट करून तुम्ही त्याने दात घासा. यामुळेही तुमच्या दाताची स्वच्छता चांगली राहाते.
पांढऱ्या तिळांचा करा उपयोग
Shutterstock
दातांच्या स्क्रबसाठी तुम्ही पांढऱ्या तिळांच्या बियांचा वापर करू शकता. नुसते पांढरे तीळ तुम्ही चावा. पण हे गिळून टाकू नका. चाऊन झाल्यावर तुम्ही याचा चोथा थुंका आणि मग कोरड्या ब्रशने दात स्वच्छ करा. तुम्ही ब्रशने दात व्यवस्थित स्क्रब करून घ्या. यामुळे दातावरील प्लाक जाण्यास मदत मिळते आणि दात व्यवस्थित स्वच्छ होतात.
दातांसाठी नैसर्गिक मास्क
pixels
ओरल हेल्थसाठी टूथ मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. पण तो नैसर्गिक असेल अधिक चांगले. यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपा टूथ मास्क तयार करू शकता. स्ट्रॉबेरी, संत्रे आणि टॉमेटो कापून एकत्र करा आणि याची मिक्सरमधून घट्ट पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट दातावर लावा आणि याचा परिणाम पाहा. तुमचे दात अत्यंत छान होतील आणि प्लाकची समस्याही दूर होईल.
लवंगेचा करून घ्या फायदा
Shutterstock
प्लाक हटविण्यासाठी तुम्ही एक चमचा लवंगेची पावडर घ्या. त्यामध्ये काही थेंब ऑलिव्ह ऑईलचे थेंब घालून मिक्स करा आणि याची पेस्ट तयार करा. दातदुखीसाठीही लवंग घरगुती उपाय म्हणून उपयुक्त ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. लवंग हा उत्तम घरगुती उपाय आहे. त्याप्रमाणेच ही पेस्टही प्लाक काढण्यासाठी उपयोगी ठरते. ही पेस्ट दातावर लावा आणि काही वेळ तशीच राहू द्या. त्यानंतर पाण्याने नीट दात धुऊन घ्या.
रोझमेरी इसेन्शियल ऑईल
pixels
प्लाक घालविण्यासाठी आणि निरोगी दातांसाठी तुम्हाला रोझमेरी इसेन्शियल ऑईलचा खूपच उपयोग होतो. एक चमचा पाण्यात 7-8 थेंब रोझमेरी ऑईल मिक्स करून घ्या. आता हे तुम्ही तुमच्या दाताला लावा. चूळ भरून थुंकून द्या. दिवसातून दोन वेळा तुम्ही हे करा आणि दातावरील प्लाक हटवा. दातदुखीवर घरगुती उपायामध्येही याचा उपयोग होतो
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक