भविष्य

11 डिसेंबर 2019चं राशीफळ, मकर राशीला लाभाची संधी मिळण्याची शक्यता

Rama Shukla  |  Dec 8, 2019
11 डिसेंबर 2019चं राशीफळ, मकर राशीला लाभाची संधी मिळण्याची शक्यता

मेष : नवीन मित्र भेटतील
नवीन मित्र भेटतील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये समाधान आणि शांती असेल. परस्पर संबंधांमध्ये अधिक परिपक्वता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल. आपल्या उत्पन्न आणि खर्चांवर नियंत्रण ठेवा.

कुंभ : चांगली संधी गमवाल
आळशीपणामुळे चांगली संधी गमावण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार मोडण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. राजकारणातील जबाबदारी वाढू शकते. नवीन प्रेम प्रकरण कायम स्वरुपी स्थापित होण्याची शक्यता आहे.

मीन : आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका
मधुमेह आणि लठ्ठपणामुळे पीडित असलेल्या लोकांसमोर समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी एखादा वरिष्ठ मदत करून तुमची ताकद बनू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

वृषभ : सकारात्मक बातमी मिळेल
करिअरसंबंधी सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. जोडीदारासोबत संबंध सुमधुर राहतील.

मिथुन : महागडी वस्तू हरवण्याची शक्यता
आज पैशांसंबंधी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. ताळमेळ कायम ठेवा. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)

कर्क : आरोग्यात सुधारणा होईल
मधुमेहासारख्या समस्यांमध्ये सुधारणा होतील. दिनक्रम नियमित त पाळा. रोमांटिक नात्यांमध्ये दृढता राहील. प्रतिष्ठित व्यक्तींसोबत झालेली भेट फायदेशीर ठरेल. एखाद्या समारंभाची योजना आखली जाऊ शकते.

सिंह : पार्टनरमुळे तणाव येण्याची शक्यता
घराचे प्रमुख किंवा पार्टनरकडून तणाव येण्याची शक्यता आहे. कोणाचं तरी बोलणं ऐकून स्वतःच्या घरातील शांतता भंग करू नका. रागाच्या भरात काहीही बोलू नका. आरोग्य ठीक राहील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल.

कन्या : अजाणत्या भीतीमुळे मन घाबरेल
एखाद्या अजाणत्या भीतीमुळे मनात भीती निर्माण होईल. कौटुंबिक समस्या यामागील एक कारण असू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. रचनात्मक कामे वाढतील.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)

तूळ : उत्पन्नात वाढ होईल
नियमित उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून तुम्हाला मौल्यवान भेटवस्तू मिळू शकते. कुटुंबासोबत करमणुकीसाठी वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. रचनात्मक कामांमध्ये रस वाढेल.

वृश्चिक : परिवार-मित्रांची मिळेल साथ
कठीण वेळेत कुटुंब आणि मित्रांची साथ मिळेल. बिघडलेली कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सामाजिक संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता. वयोवृद्धाची प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे.

धनु : व्यावसायिक योजना अपूर्ण राहील
व्यावसायिक योजना अपूर्ण राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या असंतोषाला बळी पडण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामात आवड निर्माण होईल. नवविवाहित जोडपं आनंदित असेल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मकर : लाभाच्या संधी मिळतील
आज लाभाच्या संधी मिळतील. नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर नातेसंबंधात मधुरता येण्याची शक्यता आहे. अध्यात्मात आवड निर्माण होईल. अपत्याकडून खूशखबर मिळू शकते.

Read More From भविष्य