भविष्य

11 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, कर्क राशीच्या योजना होतील यशस्वी

Rama Shukla  |  Feb 10, 2020
11 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, कर्क राशीच्या योजना होतील यशस्वी

मेष : वरिष्ठांसोबत तणाव वाढू शकतो
आज एखाद्या नवीन कामाची सुरुवात करणं टाळा. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबाकडून भावनिक सहकार्य मिळेल. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडू शकते.

कुंभ : करार पूर्ण होण्यात अडचणी येऊ शकतात
व्यावसायिक करार पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. तत्कालिन लाभासाठी कोणतीही तडजोड करण्यास तयारी दर्शवाल. पार्टनरसोबतचे संबंध सुमधुर राहतील.

मीन : कौंटुबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. काही खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक योजना आखली जाऊ शकते. रचनात्मक कामांमध्ये वाढ होईल. विरोधक पराभूत होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रेम संबंधांमध्ये गोडवा येईल.

वृषभ : एलर्जी संबंधी अडचणी होऊ शकतात
त्वचा-एलर्जी संबंधी त्रास होण्याची शक्यता असते. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. धूर्तांपासून सतर्क राहा. जुन्या समस्यांचं समाधान होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि पैशांमध्ये वाढ होईल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : प्रेम प्रस्तावाची शक्यता
प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांच्या मार्गातील अडचणी दूर होतील. विद्यार्थ्यांनी कामे वेळेत पूर्ण करण्याची सवय लावून घेतल्यास यश मिळेल. जुन्या संपर्कांमुळे लाभ मिळतील.

कर्क : योजना यशस्वी होतील
रोजगाराच्या दिशेनं यश मिळेल. नवीन व्यावसायिक योजना सफल होतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. आत्मविश्वासात वाढ होईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मनोरंजनाच्याही संधी मिळतील.

सिंह : पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा
एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा तुटण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकते. आत्मविश्वासात कमतरता येईल. जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)

कन्या : आरोग्यात सुधारणा होईल
दीर्घ काळापासून आजारी असणाऱ्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. निश्चित केलेल्या बजेटमध्ये घराचा शोध पूर्ण होईल. व्यावसायिक कामांमध्ये सफलता मिळेल. आर्थिक स्थिती भक्कम राहील.

तूळ : कुटुंबात तणाव वाढण्याची शक्यता
तुमची एखाद्या व्यक्तीसोबतच्या जवळीकतेमुळे कुटुंबीयांना वाईट वाटू शकते. कुटुंबात तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकर्मचारी त्रास देण्याचा प्रयत्न करतील. प्रवासाचा योग आहे. आरोग्य ठीक राहील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

वृश्चिक : संपत्ती खरेदीची योजना
जंगम-स्थावर संपत्ती खरेदीची योजना आखली जाऊ शकते. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. कायदेशीर प्रकरणातून सुटका होईल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)

धनु : थकवा आणि तणाव निर्माण होऊ शकतो
आज अधिक कष्ट केल्यानं थकवा आणि तणाव निर्माण होऊ शकतो. कुटुंबात बिघडलेली प्रकरणे मार्गी लागतील. कमी पैशांमध्ये जास्त लाभ मिळवण्याच्या लालसेत अडकू नका. आर्थिक नुकसान होऊ शकते. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

मकर : अविवाहितांसाठी अनुकूल वेळ
अविवाहितांसाठी अनुकूल वेळ आहे. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. सामाजिक सन्मान वाढेल. प्रवास सामान्य पण फायदेशीर होईल. आर्थिक स्थिती चांगली होईल. राजकारणात आवड वाढेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील.

 

Read More From भविष्य