मेष – व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता
आज तुमच्या व्यवसायातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणातील रस वाढणार आहे. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. आनंदाची बातमी मिळु शकते.
कुंभ – आज तणाव वाढू शकतो
आज घरातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वातावरणात चांगले बदल होतील. घरातून बाहेर जाणे अडचणीचे होऊ शकते.
मीन- नातेसंबंधात जवळीक वाढणार आहे
आज तुमच्या जुन्या नातेसंबधात जवळीक वाढणार आहे. कौटुंबिक समस्या पूर्ण करण्यात यश मिळेल. विनाकारण खर्च करू नका. रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ – वाहन खरेदी कराल
आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. कुटुंबासोबत गाण्याच्या मैफिलीचा कार्यक्रम रंगेल. कामाच्या ठिकाणी परिवर्तन होण्याची शक्यता आहे.
मिथुन – पर्यटनाच्या व्यवसायावर संकट येण्याची शक्यता
पर्यटनाच्या व्यवसायावर संकटाचे सावट निर्माण होणार आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. विरोधक नमणार आहे. प्रवासाला जाण्याचे टाळा. मित्रांसोबत तणाव वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
कर्क – जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या
आज तुमच्या रक्तदाबावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिनक्रमात बदल होण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना सावध राहा. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. मित्रांच्या भेटीत अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रवास करणे टाळलेलेच बरे राहील.
सिंह – जुनी भांडणे सोडवणे फायद्याचे
आज मित्रांसोबत असलेले जुने वाद मिटवण्याची गरज आहे. आत्मविश्वासाने संकटाचा सामना करा. जोडीदारासोबत घरात बसून एखादा रोमॅंटिक चित्रपट पाहण्याचा योग आहे.
कन्या – शैक्षणिक समस्या दूर होतील
आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर होतील. ऑनलाईन पद्धतीने घरातून ऑफिसचे काम करावे लागेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. वाहन चालवण्यापासून सावध राहा.
तूळ – शेअर बाजारात घसरण होईल
शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घ्या. अध्यात्म आणि योगासनांची आवड निर्माण होईल.
वृश्चिक – आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता
आज तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. मन उत्साही असणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल होतील. व्यवसायासाठी प्रवास करू नका. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा विचार कराल मात्र तसे करू नका.
धनु – कोर्ट कचेरीचे सहकार्य घ्यावे लागेल
आज वडीलांच्या संपत्तीसाठी कोर्ट कचेरीचे सहकार्य घ्यावे लागेल. विनाकारण खर्च करू नका. सामाजिक कार्यातून फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासातील रस वाढणार आहे.
मकर – संपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल
आज पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. घरगुती कामातील अडचणी कमी होतील. मुलांसाठी नवीन पदार्थ तयार करण्यात वेळ जाणार आहे.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje