भविष्य

17 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीच्या आरोग्यात सुधारणा होईल

Rama Shukla  |  Feb 13, 2020
17 जानेवारी 2020चं राशीफळ, मीन राशीच्या आरोग्यात सुधारणा होईल

मेष : कौटुंबिक समस्यांमुळे अडचणी
कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांवर आज स्वाक्षरी करणं टाळा. कौटुंबिक समस्यांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. राजकारणात जबाबदारी वाढू शकतात. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील.

कुंभ : निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा
कोणीतरी तुमचा विश्वास जिंकून घात करण्याची शक्यता आहे. निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा. एखादा व्यावसायिक करार निश्चित करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. राजकारणात जबाबदारी वाढू शकतात. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

मीन : आरोग्यात सुधारणा होईल
आज आराम आणि चिंतनाची वेळ आहे. आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक ऊर्जेमध्ये वाढ होईल. व्यवसायात नवीन संपर्कांमुळे लाभ मिळतील. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल.

वृषभ : कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग आहे. व्यवसायात नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. वाहन खरेदीची योजना आखली जाऊ शकते. धार्मिक कामांमध्ये श्रद्धा वाढण्याची शक्यता आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : अपचनाची तक्रार
आज अपचनाची तक्रार निर्माण होऊ शकते. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये हलगर्जीपणा करू नका. सहकर्मचारी नुकसान पोहोचवण्याचे काम करतील. काम वेळेत पूर्ण करण्याची सवय लावून घ्या. सामाजिक सम्मान आणि भेटवस्तूंमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क : अपत्याकडून आनंदाची बातमी मिळेल
भाऊ-बहिणीच्या संवादात वाढ होईल. अपत्याकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात मौज-मजेचं वातावरण असेल. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे.

सिंह : व्यवसायात चढ-उताराची स्थिती
आज कामाच्या ठिकाणी घाईगडबड केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. व्यवसायात चढ-उताराची स्थिती कायम राहील. आत्मविश्वासात कमतरता येईल. मित्रांसोबत भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : व्यवसायात धनलाभ होईल
जोडीदाराचं सहकार्यामुळे व्यवसायात धनलभा होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. एखाद्या प्रति आकर्षण वाढू शकतं. भावनिक स्तर मजबूत होईल. तुमच्या कार्यशैलीमुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

तूळ : निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावू शकता
निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावू शकता. नोकरीमध्ये एखाद्या वरिष्ठाच्या व्यवहारामुळे अडचणी निर्माण होऊ शकता. आत्मविश्वासामध्ये कमतरता येऊ शकते. वादांपासून दूर राहा. आरोग्य ठीक राहील.

वृश्चिक : शारीरिक थकवा आणि अशक्तपणा
आज निरर्थक धावपळीमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होतील. पैशांचे व्यवहारा करताना सावधगिरी बाळगा. राजकारणात आवड वाढू शकते. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)

धनु : प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता
ज्या व्यक्तीवर तुमचं मनापासून प्रेम आहे, त्याच्याकडून सकारात्मक संकेत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभाचा योग आहे.

मकर : विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयामध्ये यश मिळेल
विद्यार्थ्यांचं अभ्यास मन लागेल. व्यवसायात गती येईल. जोडीदारासोबत सामाजिक समारंभात जाण्याची संधी मिळू शकते. रचनात्मक कामांमध्ये वाढीची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल.

Read More From भविष्य