भविष्य

18 एप्रिल 2020 चं राशीफळ, कन्या राशीला मिळेल धनलाभ

Rama Shukla  |  Apr 14, 2020
18 एप्रिल 2020 चं राशीफळ, कन्या राशीला मिळेल धनलाभ

मेष – प्रिय व्यक्तीकडून तणाव जाणवेल

आज तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून तणाव जाणवणार आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय त्रासदायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत मदभेद वाढतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ – खर्च वाढण्याची शक्यता आहे

आज मुलांवर तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागतील. विनाकारण खर्च वाढणार आहे. मुलांसोबत घरात वेळ चांगला जाईल. घराच्या सजावटीत वेळ जाईल. मुले आणि घरातील वृद्धांची विशेष काळजी घ्या. 

मीन- जुने आजार बरे होतील

आज तुम्हाला जुन्या आजारपणातून सुटका मिळणार आहे. तुमच्या चांगल्या ईच्छा आज पूर्ण होतील. बाहेर फिरायला जाणे टाळा. घरात एखाद्या खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यश मिळेल. अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ – प्रॉपर्टी मिळण्याचा योग आहे

वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळण्याचा योग आहे. व्यवसायातील योजनेत यश मिळेल. विरोधकांचा त्रास कमी होईल. मित्रांशी  भेट होणं शक्य नाही. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रेमात त्रिकोण होण्याची शक्यता आहे. 

मिथुन – आरोग्याची काळजी घ्या

आज दिवसभर तुम्हाला आरोग्याची काळजी वाटेल. सावध राहा. आत्मविश्वास कमी जाणवेल . ज्यामुळे निर्णय घेताना संकोच वाटेल. अध्यात्म आणि योगासनांमधील रस वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. 

कर्क –  समस्या सुटतील

आज भावंडांच्या मदतीने समस्या सुटतील. जोडीदारासोबत रोमॅंटिक क्षण साजरे करता येतील. कुटुंबाला प्रथम प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. 

सिंह – व्यवसाय चढ – उतार येतील

आज व्यवसायात काही चढ – उतार होण्याची शक्यता आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर जाणे रद्द करावे लागेल. विनाकारण खर्च करणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावध राहा. 

कन्या – उधारी परत मिळेल

कला आणि सिनेक्षेत्रातील लोकांना फायदा मिळणार. उधारी परत मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. प्रवासाला जाणे टाळलेलेच बरे राहील. धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. 

तूळ – व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता

आज व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता आहे. मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या वागण्याचे वाईट वाटेल. मित्रांचे सहकार्य मिळणार आहे. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल.

वृश्चिक – आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्या. आहाराबाबत सावध राहा. व्यवसायिक स्थिती आनंदाची असेल. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांच्या भेटीत अडचणी येण्याची शक्यता आहे. 

धनु – नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील

आज तुमचे एखाद्या खास व्यक्तीसोबत प्रेमसंबंध निर्माण होतील. भावंडासोबत असलेला कटूपणा दूर होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी सहकार्य देतील. आरोग्याची काळजी घ्या. अध्यात्म आणि योगाबाबत रूची वाढणार आहे. 

मकर – विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल

आज विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल. अधिकारी तुमच्या कामाच्या पद्धतीने खुश होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. प्रेमसंबंधात रोमॅंटिक क्षण घालवता येतील. 

 

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

Read More From भविष्य