मेष – भेटवस्तू मिळण्याची शक्यता
आज सासरच्या लोकांकडून धनसंपत्ती अथवा भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यावसायिक मोठी कामे मिळण्याची शक्यता आहे. घरातील सजावटीसाठी पैसे खर्च कराल. जवळचे संबंध अधइक दृढ होतील. प्रवासाचा योग आहे.
कुंभ – नाते मजबूत होईल
आज तुमच्या मनातील सर्व गैरसमज दूर होणार आहेत. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. जुन्या बिघडलेल्या कामांना सुधारण्याचा प्रयत्न करा. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मीन – विपरित परिणाम भोगावा लागण्याची शक्यता
आज विद्यार्थ्यांना विपरित परिणाम भोगावा लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. दुर्लक्षपणा केल्यामुळे कामे बिघडण्याची शक्यता आहे. अधिकारी नाराज होऊ शकतात. बोलताना सावध राहा.
वृषभ – अधिकाऱ्यांचा तणाव वाढण्याची शक्यता
आज घाईघाईत एखादे काम बिघडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे रद्द होऊ शकतात. महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या. सामाजिर कार्यक्रमात सहभाग वाढणार आहे. उत्पन्न आणि खर्चात समतोल ठेवा.
मिथुन – डोळ्यांच्या अथवा डोकेदुखीची समस्या जाणवेल
आज तुम्हाला डोळे अथवा डोकेदुखीची समस्या जाणवणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात नियोजन करा. देणी घेणी करताना सावध राहा. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
कर्क – जोडीदाराशी नाते मजबूत होईल
आज तुमचा कौटुंबिक ताण दूर होणार आहे. जोडीदाराशी नाते मजबूत होण्याची शक्यता आहे. लोकांशी झालेल्या भेटीगाठी भविष्यात फायदेशीर ठरतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
सिंह – विद्यार्थ्यांना ध्येयसाध्य करणे सोपे जाईल
आज विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय साध्य करणे सोपे जाईल. राजकारणात नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात यश मिळेल. एखाद्या सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल.
कन्या – पैशांचे नुकसान होण्याची शक्यता
आज व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. पैशांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मेहनत घ्यावी लागेल. दीर्घ काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक ओळखींचा लाभ होईल. खऱ्या प्रेमाचा शोध संपेल.
तूळ – चांगली बातमी मिळेल
आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. दिवसभर फ्रेश वाटेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. एखाद्या अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका.
वृश्चिक – कौटुंबिक ताणतणावापासून दूर राहा
आज कौटुंबिक समस्यांंमुळे मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. द्विधा मनस्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. उत्पन्न आणि खर्चात नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. जोखिमेची कामे दूर ठेवा.
धनु – तणाव वाढण्याची शक्यता आहे
आज कौटुंबिक चिंतापासून दूर रहा. कारण तुमचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळणार आहे. कोर्टकचेरीत तुमच्या बाजूने निकाल लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाण्याचा बेत आखाल.
मकर – धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल
आज तुम्हाला धनसंपत्तीबाबत एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. चल-अचल संपत्ती खरेदी करण्याची शक्यता आहे. मवीन व्यावसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत सावध राहा.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje