भविष्य

25 जुलै 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ

Rama Shukla  |  Jul 24, 2019
25 जुलै 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ

मेष – वडिलधाऱ्यांच्या मदतीने वाद मिटतील

आज वडिलधाऱ्यांच्या मदतीने तुमचे वाद कमी होतील. आज तुम्ही इतरांची मनं जिंकण्यात यशस्वी होणार आहे. प्रतिष्ठा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांना खेळात रस वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल.

कुंभ – इनफेक्शन होण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला संसर्गजन्य आजाराचा त्रास होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळेल. मुलांकडून चांगली वार्ता  समजेल. कामाच्या ठिकाणी सहकारी साथ देतील.

मीन- व्यवसायात फायदा होईल

आज व्यवसायासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. एखादे महत्त्वाचे काम मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ कौतुक करतील. एखादी कामानिमित्त केलेली योजना सफळ होईल. जोडीदाराची मजबूत साथ मिळेल.

वृषभ – अधिकाऱ्यांकडून तणाव वाढेल

आज कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. वाद-विवाद करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. कोर्ट कचेरीत जावे लागेल. अचानक धनसंपत्ती मिळू शकते.

मिथुन – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे

आज तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. वाहन चालवताना सावध रहा. जोडीदारासोबत नात्यात दूरावा येण्याची शक्यता आहे. परदेशी जाण्याचा योग आहे. 

कर्क – कामाच्या ठिकाणी आव्हाने वाढतील

आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हांनाना समोर जावे लागेल. विद्यार्थ्यांना आज आळस करू नये. मनाविरूद्ध प्रवास करावा लागेल. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक कार्यात सहभाग घ्याल.

सिंह – मुलांची तब्येत बिघडण्याची शक्यता

आज तुमच्या मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध रहा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. विरोधक नमतील. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात रस वाढेल. देणी घेणी सांभाळून करा. 

कन्या – प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील

आज प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. विरोधक सहकार्य करतील. मुलांना मदत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. पदोन्नती होऊ शकते. मित्रांच्या मदतीने प्रवासाचा  बेत आखाल.

तूळ – नवीन योजना आखाल

आज तुम्ही व्यवसायात एखादी नवी योजना आखाल. उच्च शिक्षणासाठी परेदशी जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. जोडीदारासोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक – मौल्यवान वस्तू तुटण्याची शक्यता

आज तुमचे एखादे मौल्यवान सामान खराब होणार आहे. कदाचित चोरी होऊ शकते. आज मेहनत जास्त आणि फळ कमी मिळेल. कुटुंबाच्या मदतीने कठीण कामे पूर्ण कराल. एखाद्या मित्राच्या घरी पार्टीला जाण्याची शक्यता आहे.

धनु – आरोग्य सुधारेल

आज तुमचे आरोग्य सुधारणार आहे. गरोदर महिलांनी सावध रहा. वेगवेगळ्या कामात यश मिळेल. मित्रांची मदत मिळू शकेल. परदेशी जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. 

मकर- जोडीदारासोबत तणाव वाढेल

आज तुमच्या जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. विनाकारण दगदग  करावी लागेल. रखडलेले पैसे मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात रस वाढेल.

 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

Read More From भविष्य