भविष्य

31 मार्च 2020 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना मिळणार नवीन नोकरी

Rama Shukla  |  Mar 26, 2020
31 मार्च 2020 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना मिळणार नवीन नोकरी

मेष –  दुर्लक्षपणामुळे नुकसान होण्याची शक्यता

आज तुम्हाला आळस आणि दुर्लक्षपणाचा परिणाम भोगावा लागणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून तणाव वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या जवळच्या मित्रांच्या मदतीने बिघडलेले काम सुधाराल. मनाविरूद्ध प्रवास करावा लागेल. नात्यातील गोडवा वाढणार आहे. 

कुंभ –  मनाप्रमाणे नोकरीसाठी दगदग होईल

मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी दगदग होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील गोष्टी सावधपणे करा. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामातील रस वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. 

मीन- मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आयात – निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. धुर्त लोकांपासून  सावध राहा. 

वृषभ – खांदा अथवा डोकेदुखी जाणवेल

आज तुम्हाला खांदा अथवा डोकेदुखीचा त्रास होणार आहे. स्वभावात चिडचिड होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल. जोडीदाराचा राग घालवणं सोपे जाईल. विरोधकांचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. 

मिथुन – कौटुंबिक वाद कमी होतील

आज कौटुंबिक वाद कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वेळ मजेत जाईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वाहन चालवताना सावध राहा. सामाजिक कार्यात प्रसिद्धी मिळेल. 

कर्क – नोकरीचा शोध संपणार आहे

नोकरीचा शोध संपणार आहे. लवकरच मनाप्रमाणे नोकरी मिळेल. सहकार्यांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. कौटुंबिक वातावरण तणावाचे असेल. 

सिंह – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज तुमचे पैसे विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळा. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. वाहन चालवताना सावध राहा. राजकारणातील रस वाढण्याची शक्यता आहे. 

कन्या – आरोग्य उत्तम राहणार आहे

आज तुमचे आरोग्य उत्तम असेल. रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. सामाजिक कार्यातील रस वाढणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा.

तूळ- शेजाऱ्यांशी भांडण होण्याची शक्यता

आज तुमचे शेजाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. घरगुती कामे टाळल्याने समस्या निर्माण होतील. आध्यात्मिक भावनांमुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायातील प्रवास यशस्वी होईल. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे. 

वृश्चिक – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. 

उत्पन्नात वाढ होऊ शकते. एखाद्या संस्थेद्वारा मानसन्मान मिळेल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. 

धनु – जुने आजार पुन्हा होण्याची शक्यता

आज तुमच्या जोडीदाराला पुन्हा पूर्वीच्या आजाराचा त्रास होऊ शकतो. तुमचा मानसन्मान कमी होईल असे कोणतेही काम करणे टाळा. रचनात्मक कार्यातून प्रगती होईल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. 

मकर – प्रिय व्यक्तीशी भेट होईल

आज तुमची तुमच्या जुन्या प्रिय व्यक्तीसोबत पुन्हा भेट होणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. सामाजिक कार्यातील सक्रीयता वाढेल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल.  

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

Read More From भविष्य