भविष्य

4 एप्रिल 2020 चं राशीफळ, मकर राशीच्या लोकांसाठी दिवस उत्साहाचा

Rama Shukla  |  Apr 1, 2020
4 एप्रिल 2020 चं राशीफळ, मकर राशीच्या लोकांसाठी दिवस उत्साहाचा

मेष –  कंबरदुखी जाणवण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला पाठ आणि कंबरेच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. आहाराची काळजी घ्या. स्वच्छता बाळगा. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. प्रवासाला जाण्याचा विचार करू नका. वाहन चालवणे टाळा. ध्यान आणि योगामधील रस वाढेल. 

कुंभ –  प्रेमसंबंधांमध्ये दूरावा येण्याची शक्यता

आज प्रेमसंबधामध्ये दूरावा येण्याची शक्यता आहे. घरात राहून ऑफिसचे काम करावे लागेल. आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. 

मीन-  गुंतवणूकीचा फायदा होण्याची शक्यता

आज तुम्हाला गुंतवणूकीत नफा मिळणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कराल. वाहन चालवताना सावध राहा. आरोग्याची  काळजी घ्या. स्वच्छता राखा. सामाजिक कार्यापासून सध्या दूरच राहा. 

वृषभ –  जोडीदाराचे नाते मजबूत होईल

आज तुमच्यासोबत जोडीदाराचे नाते मजबूत होणार आहे. दुरच्या नातेवाईकांसोबत व्हिडिओ कॉलमुळे संवाद साधल्यामुळे बरे वाटेल. राजकारणात व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

मिथुन – करिअरमध्ये नुकसान

आज करिअरमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. तणाव वाढण्याची शक्यता आहे. विवादापासून दूर राहा. देणी घेणी सांभाळून करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क –  नवीन संपत्ती खरेदी कराल

आज व्हिडिओ कॉलद्वारे व्यवसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे. चल अचल संपत्ती खरेदी कराल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. वाहन चालवताना सावध राहा. वादविवाद करणे सध्या टाळा. 

सिंह –  शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता

आज तुम्हाला शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद केल्यामुळे वेळ आणि पैशांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांकडून शुभवार्ता मिळणार आहेत. नात्यातील गोडवा वाढण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाणे टाळलेलेच बरे राहील. 

कन्या – मानसिक तणाव वाढेल

आज तुमचा मानसिक तणाव वाढणार आहे. स्वभावात चिडचिडेपणा येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. अध्यात्म आणि योगासने यातील रस वाढणार आहे. रचनात्मक कार्यात मन रमवा. 

तूळ –  कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल

आज एखाद्या जुन्या व्यक्तीबद्दल भावना जाणवतील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे आणि उत्साहाचे असेल. जुन्या मित्रांच्या सहकार्याने बिघडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिक भागिदारीचा फायदा होईल. 

वृश्चिक – विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव मिळेल 

आज विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळेल. घरात नवीन कार्यशैलीमुळे तुमची कामे लवकर पूर्ण होतील. जोडीदारासोबत प्रवासाला जाणे रद्द करावे लागेल. अचानक एखाद्याची मदत करावी लागेल.  

धनु –  व्यावसायिक तोटा होण्याची शक्यता

आज लॉकडाऊनमुळे तुम्हाला व्यावसायिक तोटा होण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा. विनाकारण खर्च वाढल्यामुळे बजेट बिघडणार आहे. कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करण्यात यश मिळेल. 

मकर – उत्साह जाणवेल

आज तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक उत्साही आणि फ्रेश वाटेल. राजकारणातील जबाबदारी वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढेल. 

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

Read More From भविष्य