भविष्य

7 एप्रिल 2020चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक गुंतवणूकीसाठी योग्य काळ

Rama Shukla  |  Apr 5, 2020
7 एप्रिल 2020चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक गुंतवणूकीसाठी योग्य काळ

मेष – आनंदी आणि फ्रेश वाटेल

आज तुमचे आरोग्य उत्तम असेल. दिवसभर आनंदी आणि फ्रेश वाटेल. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी प्रभावित होऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आहे.

कुंभ – प्रतिभा आणि कष्टाने ध्येय साध्य होईल

आज तुमच्या प्रतिभाशक्ती आणि अविरत कष्टामुळे तुम्हाला यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होणार आहे. सामाजिक उत्सवांपासून दूर राहा. घरात धनवृद्धी होणार आहे. शुभसंदेश मिळणाल्याने आनंद वाढेल. 

मीन- आज उधारी देऊ नका

आज कोणालाही उधारी देऊ नका परत मिळणार नाही. धार्मिक कार्यात मन रमेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. घरात राहून कौटुंबिक नाती जपण्याचा प्रयत्न करा.

वृषभ –  कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात

आज तुम्हाला कौटुंबिक समस्या जाणवण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून तुमच्या कामाला विरोध होण्याची शक्यता आहे. कोणताही कठीण निर्णय घेणे सध्या टाळा. आत्मविश्वास कमी जाणवण्याची शक्यता आहे. मुले आणि घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन – पैशांची गुंतवणूक करण्यास उत्तम काळ

आज दीर्घ काळासाठी एखादी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी योग्य काळ आहे. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. इतरांना मदत केल्यामुळे आनंद मिळेल. 

कर्क – गुडघेदुखी जाणवेल

आज तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. घरात राहून मुलांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. संगीतामधील रस वाढणार आहे. 

सिंह – नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात

आज एखाद्या खास व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉलने संपर्क साधाल. नवीन प्रेमसंबध निर्माण होणार आहे. कामाच्या ठिकाणा अधिकारी वर्गाकडून तुमचे कौतूक होईल. व्यवसायात राजकारणाचा लाभ मिळेल. आरोग्याची  काळजी घ्या. 

कन्या – कामाच्या ठिकाणी सावध राहा

आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. व्यवसायात जोखिम घेणे टाळा. मित्रांसोबत असलेले मतभेद कमी होतील. अर्धवट राहीलेली कामे पूर्ण होतील. आईवडीलांची साथ मिळेल. 

तूळ-  मौल्यवान वस्तू अचानक मिळतील

आज चार-पाच महिन्यांपूर्वी हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू तुम्हाला अचानक मिळणार आहे. राजकारणात व्यस्त राहाल. मित्रांसोबत भेट होणं शक्य नाही. प्रवासाला जाणे टाळा. घरात आनंदाचे वातावरण असेल. 

वृश्चिक –  पर्यटन व्यवसायाला उतरती कळा

पर्यटन व्यवसायात मंदी येण्याची शक्यता आहे. पूजाअर्चा आणि आध्यात्मिक मार्गात मन रमवा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. 

धनु – खांदा दुखण्याची शक्यता आहे

आज तुमच्या खांद्याचे दुखणे वर येण्याची शक्यता आहे. जुन्या समस्या वर येऊ शकतात. पैशांबाबत एखादी आनंदाची बातमी मिळेल. घरातील लोकांशी जवळीक निर्माण होईल. आज घराबाहेर जाणे टाळा. 

मकर – नातेसंबंध मजबूत होण्याची शक्यता

आज घरात राहून तुमचे कौटुंबिक संबध मजबूत करा. आज तुमच्या घरी राहण्याममुळे घरातील वृद्धांना कौटुंबिक साथ मिळणार आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. सोशल मीडियावरील चुकीच्या बातम्यांमुळे मन निराश होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

 

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो तुमचा आवडता ‘रंग’

 

Read More From भविष्य