भविष्य

7 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, वृश्चिक राशीला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

Rama Shukla  |  Feb 5, 2020
7 फेब्रुवारी 2020चं राशीफळ, वृश्चिक राशीला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

मेष : महागडी वस्तू खरेदी करू नका
आयात-निर्यातशी संबंधित लोकांना आर्थिक आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. महागडी वस्तू खरेदी करू नका. संपत्ती प्रकरणात कुटुंबातील माणसं काही अडचणी निर्माण करू शकतात. आरोग्यासंबंधी सावधगिरी बाळगा.

कुंभ : नव्या प्रेम संबंधाची शक्यता
नव्या प्रेम संबंधाची सुरुवात होऊ शकते. एखाद्या आदर्श व्यक्तीसोबत मनातील गोष्टी शेअर करू शकता. भावनिक पातळीवर सुधारणा होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. सामाजिक संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे.

मीन : विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांमुळे आपल्या ध्येयामध्ये यश मिळेल. व्यवसायात गती येईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. रोजगारासंबंधी प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रियकरासोबत झालेली भेट सुखद असेल.

वृषभ : उत्साहित असाल
आज बऱ्याच दिवसांनंतर तुम्हाला उत्साह जाणवेल. पार्टनरसोबत लाँग ड्राईव्हचा आनंद लुटाल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : प्रियकरासोबत तणावाची शक्यता
जोडीदार किंवा प्रियकरासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात येणाऱ्या पण तुम्हाला माहिती नसलेल्या अडचणीप्रति सतर्क राहा. प्रतिस्पर्धी त्रास देतील. व्यावसायिक महत्त्वपूर्ण निर्णय तर्काच्या आधार घ्या. वादांपासून दूर राहा.

कर्क : व्यवसायात नवीन करार मिळतील
व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. काही नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यशैलीमुळे कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण कामे आधी पूर्ण करून घ्या. राजकारणात आवड वाढेल. धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल.

सिंह : अपचनाची तक्रार
खाण्या-पिण्याच्या सवयीमध्ये निष्काळजीपणा करू नका. अपचनाची तक्रार उद्भवू शकते. व्यापाराच्या प्रकरणात दिवस चांगले असतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. विरोधकांचा पराभव होईल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)

कन्या : अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते
आज तुम्हाला अपत्याकडून आनंदाची बातमी मिळून शकते. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. व्यवसायासाठी आखलेल्या नवीन योजनांना यश मिळेल. जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

तूळ : व्यावसायिक करार रखडतील
व्यावसायिक करार पूर्ण होता-होता रखडतील.कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळाल्यानं व्यस्तता वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण रखडलेली कामे पूर्ण होण्यात यश मिळेल. जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल.

वृश्चिक : कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
कौटुंबिक संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. काही खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक योजना आखल्या जातील. नवीन संपर्कांमुळे लाभ मिळतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. वाहन खरेदीची योजना आखली जाईल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)

धनु : निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमवाल
निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावल्या जाण्याची शक्यता आहे.कामाच्या ठिकाणी एखाद्या वरिष्ठांच्या व्यवहारामुळे तुम्ही त्रस्त होण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. पैशांसंबंधी आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य ठीक राहील.

मकर : वडिलांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता
वडिलांचं आरोग्य अचानक बिघडण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. कामाच्या ठिकाणी वैचारिक म तभेद दूर होतील. धार्मिक कामांमध्ये आवड वाढू शकते. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील.

 

Read More From भविष्य