जेवणाच्या पदार्थांमध्ये जर स्वाद योग्य नसेल तर जेवण फिके वाटते. जर तुम्ही रोज जेवण बनवत असाल तर तुम्हाला रोजच्या जेवणात तेल आणि मसाल्याचा अंदाज नक्कीच असतो. पण ज्यांना जेवण बनवता येत नाही त्यांना मसाल्याचा योग्य अंदाज येत नाही. भारतीय पदार्थ हे योग्य मसाले आणि तेलाचा वापर करूनच बनविण्यात येतात. कधी कधी आपल्याला योग्य अंदाज असूनही जेवणात तेल आणि मसाले कमी जास्त होतात. अशावेळी नक्की काय सोप्या किचन हॅक्स वापरायच्या याबाबत माहिती. तुम्ही नुकतेच जेवण बनवायला शिकत असाल तर तुम्हाला या टिप्स नक्कीच वापरता येतील.
कापलेल्या मिरचीऐवजी ठेचलेली मिरची वापरा
आपल्या पदार्थांमध्ये योग्य फ्लेवर आणि तिखटपणा हवा असेल तर तुम्ही सुक्या मिरचीचा वापर करा. ही सुकी मिरची तुम्ही ठेचून पदार्थांमध्ये घाला. डाळीला जेव्हा तुम्ही फोडणी देत असाल अथवा भाजीमध्ये तिखटाचा वापर करायचा असेल तेव्हा अशा पद्धतीने करा. असाच वापर तुम्ही हिरव्या मिरचीचादेखील करू शकता. तुम्हाला मिरचीचा स्वाद वेगळ्या पद्धतीने हवा असेल तर अशाप्रकारे वापरून पाहा. कारण कापलेल्या मिरचीपेक्षा ठेचलेल्या मिरचीचा स्वाद अधिक येतो. असे तुम्ही काळ्या मिरीसहदेखील करू शकता. काळी मिरी ठेचून जेवणाच्या पदार्थांमध्ये घातली तर अधिक स्वाद मिळतो. फक्त तुम्ही मिरची ठेचून घालणार असाल तर त्याचे प्रमाण कमी ठेवा.
मीठ नेहमी हातानेच घाला
तुम्ही कधी प्रोफेशनल शेफना मीठ पदार्थांमध्ये घालताना पाहीलं आहे का? हाताने नेहमी मीठाचा वापर केला जातो. यामुळे पदार्थामध्ये मीठाचे योग्य प्रमाण मिसळते. चमच्याने मीठ घातल्यास ते नेहमीच पदार्थांमध्ये जास्त पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अंदाज चुकतो. तसंच पदार्थांमध्ये मीठ तेव्हाच घाला जेव्हा पदार्थ शिजत आले असतील. काही जण भाजी शिजत असतानाच मीठ घालतात आणि मग भाजीचा स्वाद व्यवस्थित लागत नाही. तसंच तुम्ही जेवणात नेहमीच्या मिठासह रॉक सॉल्ट घातले तर त्याचा स्वाद अधिक चांगला होतो. मात्र याचे प्रमाण तुम्हाला नियमित जेवणाच्या सवयीनेच येईल.
ठेचलेले जिरे देते अधिक चांगला स्वाद
जेवण बनवताना तेल अथवा मसाला कमी जास्त झाला असेल तर तुम्ही जेवण बनवताना अख्खे जिरे वापरता, तसं न वापरता जिरे थोडेसे भाजून ते ठेचा आणि मग या पदार्थांमध्ये मिक्स करा. हे करण्यासाठी थोडा एक – दोन मिनिट्स जास्त वेळ लागतो. मात्र यामुळे तुमच्या बिघडलेल्या पदार्थामध्ये अधिक चांगला स्वाद येतो अथवा तुम्ही भाजी करत असताना अशी पद्धत वापरली तर उत्तम. यामुळे जिऱ्याचा सुगंध पदार्थाला योग्य पद्धतीने लागतो.
भाजीचा रंग आणि तिखटपणा आणण्यासाठी वापरा लाल मिरची
बरेचदा अनेकजणी भाजीमध्ये लाल तिखट वरून घालतात ज्यामुळे भाजी अधिक तिखट होते. सुके मसाले जर तुम्ही भाजीमध्ये घालणार असाल तर भाजीला रंग आणि स्वाद येण्यासाठी जास्त वेळ लागतो. अशावेळी गरम मोहरीच्या तेलामध्ये लाल मिरची वा लाल मिरची तिखट आणि हळद घालून गरम करा आणि त्यात लगेच भाजी, कांदा, टॉमेटो घालून परता. त्यामुळे भाजीला उत्तम स्वाद मिळतो.
सुके मसाले जळणार नाहीत यासाठी सोपी हॅक
सुकी भाजी बनवताना त्यात घातलेले मसाले जळतात असा अनेकांचा सूर असता. सुके मसाला कढईत घातल्यावर जळतात पण हे टाळण्यासाठी तुम्ही सुके मसाले एकत्र करून त्यात अगदी जरासे पाणी मिक्स करा. त्यानंतर हा पाण्याचा मसाला तुम्ही भाजीत टाका. जेणेकरून मसाले जळणार नाहीत.
हे सर्व हॅक्स तुम्हाला फायदेशीर ठरतीलच. याशिवाय या हॅक्सचा वापर करून सर्व मसाले योग्य पद्धतीने भाजीत मिक्स होतील.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade