Care

हेअरस्टाईल करताना हेअर स्टायलिंग स्प्रे वापरताय, मग वाचाच

Leenal Gawade  |  Mar 30, 2020
हेअरस्टाईल करताना हेअर स्टायलिंग स्प्रे वापरताय, मग वाचाच

हेअरस्टाईल करण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी अनेकदा स्टायलिस्ट हेअर स्टायलिंग स्प्रे वापरतात. विशेषत: लग्नामध्ये केल्या जाणाऱ्या हेअरस्टाईल टिकवण्यासाठी हेअर स्टायलिंग स्प्रे वापरला जातो. पण अगदी क्षुल्लक आणि साध्या प्रसंगीही तुम्ही केसांना असा स्टायलिंग स्प्रे वापरणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे फारच आवश्यक आहे.जर तुम्ही असा स्प्रे वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया याच काही गोष्टी

घरच्या घरी कोणत्याही मशीनशिवाय केस असे करा सरळ

केस तुटतात

shutterstock

हेअर स्टायलिंग केल्यानंतर आपण साधारण  5 ते 6 तास तरी ती हेअरस्टाईल आपण ठेवतो. त्यानंतर मोठ्या मेहनतीने आपण केसांमध्ये लावलेल्या हेअर पीन काढतो. या हेअर पीन काढल्यानंतर तुमचे केस कधी कधी तसेच उभे राहतात हे तुम्हाला देखील जाणवले असेल. अशावेळी केस सरळ करण्यासाठी तुम्ही थेट कंगवा तुमच्या केसांना लावत असाल आणि केसांचा झालेला गुंता सोडवू पाहात असाल तर मात्र तुमचे केस गळण्याची शक्यता आहे. कारण केसांचा गुंता सुटला नाही की, आपण कोणताही विचार करता केस घाईघाईने मोकळे करायला जातो आणि त्यामुळे केस तुटतात.

केसात होतो कोंडा

हेअर स्टायलिंग स्प्रे वापरत असाल तर तुम्हाला दुसरा त्रास होतो तो म्हणजे कोंड्याचा. हेअर स्प्रे तुमच्या केसांना आणि स्काल्पला असा काय चिकटतो की, तो जर योग्यवेळी काढला नाही तर तुम्हाला कोंडा होण्याचा त्रास होतो. एकदा तुम्हाला कोंडा झाला की, तो योग्यवेळी काढणे गरजेचे असते. म्हणून तुम्ही केसांमधून कोंडा काढून टाकण्यासाठी  स्टायलिंग केल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या आणि केस चांगले वाळवा. तुमच्या केसांना सीरम लावायला विसरु नका. म्हणजे तुमचे केस सिल्की दिसतील.

केसांसाठी केरेटीन (keratin) करण्याच्या विचार करताय.. तर मग वाचा

केस होतात रुक्ष

केसांना हेअर स्टायलिंग स्प्रे लावण्याआधी तुमच्या केसांना हेअर क्रिम्पिंग केले जाते.खूप वेळा बॅक कोबिंगही केले जाते. हेअर क्रिम्पिंग आणि बॅक कोंबिंग करुन तुमचे केस रुक्ष होतात. केस ड्राय करण्यासाठीच या गोष्टी केल्या जातात. तुमच्या केसांचे स्टायलिंग करुन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या केसांना मस्त तेल लावा. तेलाने छान केसांची मालिश करा. त्यामुळे तुमच्या केसांना आराम मिळतो. त्यामुळे केसांना स्टायलिंग केल्यानंतर तुम्ही हॉट ऑईलने मसाज करा

उवा होण्याची शक्यता

shutterstock

हेअर स्टायलिंग स्प्रेचा तुम्ही जर सुगंध पाहिला असेल तर तो छान गोड असतो. स्टायलिंग केल्यानंतर तुमच्या केसांमध्ये घाम येतो. हे केस तुम्ही स्वच्छ केले नाही तर तुम्हाला उवा होण्याची शक्यता असते. हा त्रास व्हावा असे तुम्हाला नक्कीच कधी वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही चांगला शॅम्पू वापरुन केस छान धुवा. केस कोरडे करा. केस ओले ठेवू नका. काही दिवस केसांची अधिक काळजी घ्या.

आता केसांना हेअर स्टायलिंग स्प्रे वापरत असाल तर या गोष्टींची माहिती असू द्या आणि केस स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या केसांना कोणतीही इजा पोहोचणार नाही.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From Care