त्वचेची काळजी

जड पाण्यामुळे होते त्वचेचे नुकसान, यासाठी करा हे सोपे उपाय

Trupti Paradkar  |  Jun 13, 2021
जड पाण्यामुळे होते त्वचेचे नुकसान, यासाठी करा हे सोपे उपाय

सुंदर दिसण्यासाठी आपण त्वचेची खास निगा राखत असतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रॉडक्टपासून घरगुती उपचारांपर्यंत सर्व काही करतो. ब्युटी पार्लर अथव सलॉनमध्ये तासनतास आणि भरपूर पैसे खर्च करतो. मात्र एवढं सगळं करूनही कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सौंदर्यात बाधा आणू शकतात. जर तुमच्या घरातील वापराचे  पाणी जड असेल (Hard Water) तर त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. कारण जड पाणी त्वचेसाठी मुळीच हिताचं नाही. जड पाण्यामुळे अनेक त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर जड पाण्यामुळे तुमच्या केसांचेही नुकसान होते. यासाठीच या समस्येवर असा करा उपाय ज्यामुळे तुम्ही कायम दिसाल सुंदर आणि टवटवीत

जड पाण्यामुळे त्वचेचं नुकसान का होतं

समुद्र किनारी अथवा खाडीजवळ राहणाऱ्या लोकांच्या घरात जड पाणी (Hard Water) असण्याची शक्यता असते. अशाा पाण्यात मॅग्नेशिअम, लोह, कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे फ्री रेडिकल्स निर्माण होण्यास चालना मिळते. पाण्यातील फ्री रेडिकल्स तुमच्या  त्वचेतील कोलेजीनच्या थराचे नुकसान करते. कोलेजीनमुळे तुमच्या त्वचेचं आतून संरक्षण होत असतं. शिवाय यामुळे तुमची त्वचा तरूण आणि टवटवीत राहते. मात्र जड पाण्यामुळे तुमच्या  त्वचेतील कोलेजीन कमी होते आणि तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. नियमित जड पाण्याने चेहरा धुतल्यामुळे तुमच्या त्वचेवर पिंपल्स, रॅशेस, ब्रेकआऊट, कोरडेपणा, खाज अशा समस्या  दिसू  लागतात. जड पाण्यामुळे तुमचे केस गळून पातळ होतात. केस कोरडे आणि फ्रिझी दिसू लागतात. 

घरातील पाणी जड आहे हे कसं ओळखाल

समुद्र तटाजवळील विभागातील पाण्यात खनिज पदार्थ असल्यामुळे ते पाणी जड असते. अशा ठिकाणी वॉटर प्युरिफायरच्या मदतीने पिण्याचे पाणी चांगल्या दर्जाचे पुरवले जाते. मात्र वापरासाठी असलेले पाणी मात्र जडच असते. जर तुम्हाला तुमच्या घरातील पाण्याची टेस्ट करायची असेल तर तुम्ही ही टेस्ट करू शकता. एका साडे तीनशे लीटर पाण्याच्या पारदर्शक बाटलीमध्ये तुमच्या घरातील नळाचे पाणी भरा आणि त्यामध्ये काही थेंब लिक्विड हॅंडवॉश मिसळा. ही बाटली चांगली घुसळून घ्या जर त्यामध्ये कमी प्रमाणात बुडबुडे निर्माण झाले तर याचा अर्थ तुमच्या घरातील पाणी जड आहे.

shutterstock

जड पाणी असेल तर त्वचेची कशी राखाल निगा

समजा तुमच्या घरातील पाणी जड असेल तर त्वचेची निगा राखण्यासाठी या गोष्टी फॉलो करा.

फोटोसौजन्य – shutterstock

अधिक वाचा –

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी डेली स्किन केअर रूटिनमध्ये असं वापरा ग्लिसरीन

फक्त केसांसाठीच नाही तर असाही करा हेअर कंडिशनरचा वापर

सैल पडलेली त्वचा होईल टाईट, ट्राय करा जुही परमारचं ब्युटी सिक्रेट

Read More From त्वचेची काळजी