नखं

नखांशिवाय नेलपेंटचा असाही होऊ शकतो वापर

Dipali Naphade  |  Mar 21, 2019
नखांशिवाय नेलपेंटचा असाही होऊ शकतो वापर

नेलपेंटचा वापर आपण आपली नखं सुंदर दिसण्यासाठी करतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, रोजच्या वापरात नेलपेंटचे अनेक वापर आहेत. आपण घरातल्या बऱ्याचशा गोष्टींचा पुनर्वापर करत असतो. आपल्याला अगदी लहानपणापासून प्रत्येक घरामध्ये काही ना काही उपाय दाखवण्यात आलेले असतात जेणेकरून आपण तुटलेली वस्तू पुन्हा जोडून त्याचा योग्य वापर करू शकतो. अशा कामांमध्ये नेलपेंटचा वापरदेखील होतो. बऱ्याचदा नेलपेंट जुनं झाल्यावर आपण वापरत नाही. असंच उरलेलं फेकून देतो. पण तुम्ही तसं आता करू नका. याचे नक्की काय फायदे आहेत, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला नेलपेंटचा खास वापर कसा करायचा ते सांगणार आहोत. हे उपयोग वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल थँक्स POPxo Marathi….arn More

1 – फेव्हिकॉलऐवजी वापरू शकता नेलपेंट

तुम्हाला अचानक तुमच्या कोणत्या कपडे, कागद, दोरा यासारख्या गोष्टी चिकवण्याची गरज भासली आणि घरामध्ये तुम्हाला आयत्यावेळी फेव्हिकॉल सापडत नसेल आणि दुकानंही बंद असतील तर घाबरून जाऊ नका. चिंताही करू नका. तुम्ही त्या जागी नेलपेंटचा वापर करू शकता. तुमच्याकडे इतर गोष्टींसाठी असणारे रंगीत नेलपेंट वापरा आणि कपड्यांसाठी तुमच्याकडे असणारे पारदर्शक नेलपेंट तुम्ही वापरू शकता. अगदी तुम्ही गिफ्ट कार्ड चिकटवायलादेखील याचा वापर करू शकता. हा प्रयोग नक्की करून बघा.

2 – कपड्यांना मजबूती आणतं

आपण नेहमी पाहतो की, लेगिंग्ज असो वा कोणता ड्रेस यामधून बऱ्याचदा धागे बाहेर येत असतात. हे धागे खेचले तर तो ड्रेस फाटण्याची शक्यता असते. अशावेली तुम्ही त्या कपड्याच्या रंगांच्या नेलपेंटचा वापर करून कोटिंग करू शकता. त्यामुळे तो धागा त्या ड्रेसला चिकटून राहील आणि अजिबात खेचलाही जाणार नाही.

3 – फर्स्ट-एड म्हणूनदेखील वापरू शकता

तुम्हाला जर अचानक लागलं आणि रक्त येऊ लागलं तर क्लिअर नेलपेंटचा एक लेअर त्याठिकाणी तुम्ही लावा. रक्त लगेच थांबेल. तुम्हाला जर तुमच्या त्वचेवर अगदी जोरात खाज येत असेल तरीदेखील तुम्ही हा नेलपेंटचा उपाय करून पाहू शकता. अशा ठिकाणी नेलपेंट एखाद्या फर्स्ट-एड प्रमाणे काम करतं.

Also Read About फ्रेंच नखे

4 – आर्टिफिशियल दागिन्यांचे रॅश थांबवू शकता

हल्ली फॅशन करताना जास्तीत जास्त आर्टिफिशियल दागिन्यांचा वापर करण्यात येतो.  पण हे दागिने सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या व्यक्तींना चालत नाहीत. काही मुली तर रोज असे दागिने वापरतात आणि मग त्यांच्या अंगावर रॅश यायला लागते. तुम्हालादेखील अशी समस्या असेल तर, आम्ही तुम्हाला एक उपाय सांगतो. अगदी डोळे मिटून तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे क्लिअर नेलपेंट असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आर्टिफिशियल दागिन्याच्या मागच्या बाजूला क्लिअर नेलपेंट लावून सुकू द्या. त्यानंतर तुम्ही हे दागिने घातल्यास तुम्हाला अजिबात रॅश येणार नाहीत.

5 – रंगांचा डाग एक मिनिटात काढू शकता

तुमच्या कपड्यांवर कोणत्याही रंगाचा डाग लागला असेल तर तुम्ही चिंता करू नका. त्यासाठीदेखील तुम्हाला क्लिअर नेलपेंटचा वापर करता येतो. जिथे डाग आहे त्या भागावर हे नेलपेंट लावा. हा डाग काही मिनिटात निघून जाईल.

6 –  कोणती चावी कशाची आहे? ओळखणं होईल सोपं

बऱ्याचदा आपल्याकडे वेगवेगळ्या किल्ल्या अर्थात चाव्या असतात त्या आपण एका रिंगमध्ये ठेवतो.  पण जेव्हा लॉक उघडायची वेळ येते तेव्हा नक्की कोणती चावी कोणत्या ठिकाणची आहे हेच कळत नाही. अशावेळी एक युक्ती नेहमी उपयोगी पडते. तुमच्याजवळ जास्त चाव्या असतील तर, प्रत्येक चावीवर वेगवेगळ्या रंगाचं नेल पॉलिश लावून एखादी निशाणी बनवून ठेवा. त्यामुळे चावी ओळखणंं सोपं होऊन जाईल.

7 – बटण तुटणार नाहीत

सर्वांच्या समोर जर शर्टाचं बटण तुटलं तर अर्थातच लाज वाटते. पण असं होऊ नये असं वाटत असेल तर याची तयारी आधीच करायला हवी. बटणांचा शर्ट घालण्यापूर्वी बटणांवर क्लिअर नेलपेंट लावा. त्यामुळे बटण घट्ट होतील आणि तुटणार नाहीत.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा –

नेलपेंटसचे हे १० शेड तुमच्याकडे असायलाच हवेत

नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

नखांची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स

Read More From नखं