नखं

नखांचे आरोग्य राखण्यासाठी नेलपेंट लावताना करू नका ही चूक

Trupti Paradkar  |  Jul 19, 2022
Tips to Avoid Common Nail Polish Mistakes in Marathi

हात आणि बोटं सुंदर दिसण्यासाठी महिला नखांवर नेलपेंट लावतात. नेलपॉलिश अनेक प्रकार आजकाल बाजारात मिळतात.  निरनिराळ्या प्रकारच्या, टेक्चरच्या, रंगाच्या नेलपेंट नखांवर ट्राय केल्या जातात. मात्र बऱ्याचदा नेलपेंट चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे नखांचे आरोग्य बिघडते. कारण बऱ्यादचा नेलपेंटमध्ये हानिकारक केमिकल्स असतात ज्यामुळे नखांचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी जाणून घ्या नेलपेंट लावताना काय लक्षात ठेवावं. कोणत्या चुका करू नयेत ज्यामुळे नखं खराब होण्याची शक्यता वाढेल. नखं वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi), सुंदर लांब, नखं आवडतात.. मग नक्की करुन पाहा नेल एक्सेंटेन्शन, नेलपेंटसचे १० शेड तुमच्याकडे असायलाच हवेत – Nail Paint Shades In Marathi

जुन्या नेलपेंटवर नवा कोट देणं

नेलपेंट लावण्याची हौस असुनही बऱ्याचजणींना यासाठी पुरेसा वेळ काढता येत नाही. जुनी नेलपेंट काढून पुन्हा नवीन कोट लावण्यासाठी वेळ नसेल, तर काही जणी जुन्या नेलपेंटवरच नवा कोट लावतात. असं करणं नखांसाठी मुळीच चांगलं नाही.कारण त्यामुळे नखांचे पोषण होत नाही. यासाठी नखं आणि रिमूव्हरने स्वच्छ करावीत आणि मगच नवीन नेलपेंट लावावी.

नेलपेंट स्क्रॅच करून काढणे

नेलपेंट काढण्यासाठी नेहमी चांगल्या रिमूव्हरचा वापर करावा. कारण जर तुम्ही नखांवरील नेलपेंट नखांनीच स्क्रॅच करून काढली तर यामुळे नखांवर ओरखडे उठतात. नखांचे सौंदर्य यामुळे खराब होतेच पण नखांची वाढही खुंटते. नखे कायम निरोगी राहण्याची ही चूक कधीच करू नका. 

नेलपेंट सुकण्याची वाट न पाहणे

नेलपेंट लावण्यानंतर कमीत कमी अर्धा तास कोणतेही काम करू नये. जरी तुमची नेलपेंट लगेच सुकली तरीही काही मीनिटे हात तसेच ठेवावे. कारण असं न केल्यास नेलपेंट व्यवस्थित सुकत नाही आणि रंग नखांमध्ये आणि क्युटिकल्समध्ये परसतो. रंगामधील केमिकल्स तुमच्या नखं आणि क्युटिकल्सचे नुकसान करतात. यासाठी नेलपेंट सुकण्याची वाट पाहा.

नखांवर जास्त कोट लावणे

नखांवर नेलपेंट शोभून दिसण्यासाठी जास्तीत जास्त दोन कोट लावावे. हवं असल्यास शेवटी ट्रान्सफरंट नेलपेंटचा कोट लावावा. मात्र रंग गडद करण्यासाठी अति प्रमाणात कोट नखांवर लावू नये. कारण असं केल्याने नेलपेंट लवकर सुकत नाही आणि ती लवकर निघूनही जाते. यासाठी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

सतत नेलपेंट लावणे

तुम्हाला सतत नखांवर नेलपेंट लावण्याची सवय असेल तर ती सवय तुम्ही बदलणं गरजेचं आहे. कारण असं केल्यामुळे तुमच्या नखांचे आरोग्य बिघडू शकतं. नखांना पोषण आणि ऑक्सिजनची गरज असते. नेलपेंटच्या कोटमुळे नखांचे पुरेसे पोषण होत नाही. यासाठी काही दिवस नखांना नेलपेंट शिवाय ठेवावे. नखांना तेल अथवा क्रीमने मसाज करून पोषण द्यावे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From नखं