प्रत्येकाचा चेहऱ्याचा आकार आणि ओठांचा आकार निरनिराळा असतो. कधी कधी काही लोकांना त्यांच्या ओठांचा आकार मुळीच आवडत नाही. पण लिपस्टिक लावताना तुम्ही काही टिप्स वापरून चक्क तुमच्या ओठांचा शेप बदलू शकता. अशा पद्धतीने लिपस्टिक लावली तर तुम्ही तुमच्या ओठांचा आकार कसाही असला तरी तुमच्या मनासारखा करू शकता. यासाठी आधी प्रत्येकाला त्यांच्या ओठांचा शेप कसा आहे आणि त्याला हवा तो आकार देण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्या हे माहीत असायला हवे.
ओठांच्या काळजीसाठी घरगुती उपाय | Lip Care Tips For Winter In Marathi
वरचे ओठ मोठे असणे
बऱ्याच जणींचे फक्त वरचे ओठ मोठे असतात. अशा वेळी जर ओठांना योग्य शेप नाही दिला तर तुमचे ओठ बेढब दिसू शकतात. ज्यांचे वरचे ओठ मोठे आहेत त्यांनी खालच्या ओठांना शेप देण्यासाठी जास्त मेहनत घ्यायला हवी. बॉटम लिप्स शेपमध्ये येण्यासाठी त्यावर एखादी ब्राइट लिपस्टिक लावा आणि त्याच शेडमध्ये डार्क शेड तुमच्या वरच्या ओठांसाठी निवडा. ओठांच्या मधल्या भागावर थोडं न्यूड अथवा पांढरं आयशॅडो डॅब करा ज्यामुळे दोन्ही ओठांचा आकार एकसमान दिसू लागेल.
खालचे ओठ मोठे असणे
काही लोकांचे खालचे ओठ मोठे असतात. अशा मुली दोन पद्धतीने ओठांना शेप देऊ शकतात.पण सर्वांत महत्त्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या ओठांचा शेप नेमका कसा हवा आहे. जर तुम्हाला फुलर लिप्स हवे असतील तर वरच्या ओठांना आउटलाईन करा आणि योग्य लिपग्लॉसचा वापर करा. पण जर तुम्हाला नॅरो पाऊट हवा असेल तर खालच्या ओठांना अंडर आउट लाईन करा आणि एखादी डार्क शेडची लिपस्टिक लावा.
पातळ ओठ
काही जणींचे ओठ मुळातच खूप पातळ असतात. अशा मुलींनी वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही ओठांवर वर आणि खाली आउटलाइन करायला हवी. ज्यामुळे तुमचे ओठ राऊंड शेपप्रमाणे दिसू शकतील. लिपस्टिक लावताना खालच्या ओठांना डार्क शेड आणि वरच्या ओठांवर लाईट शेड लावा. त्यानंतर लिप ब्रशने दोन्ही शेड मर्ज करा. ज्यामुळे तुमचे ओठ मोठे आणि पाऊट केल्याप्रमाणे दिसू शकतील.10 बेस्ट लिपग्लॉस ज्यामुळे तुमचे ओठ दिसतील अधिक सुंदर (Best Lip Gloss In Marathi)
मोठे ओठ
जर नैसर्गिक पद्धतीने तुमचे ओठ चेहऱ्याच्या मानाने जरा जास्तच मोठे असतील तर तुम्हाला नेहमी हलक्या आणि मॅट फिनिश वाल्या लिपस्टिक शोभून दिसतात. कारण अशा शेड आणि मॅट फिनिशमुळे तुमचे ओठ मऊ आणि एकसमान दिसतात. जर तुमचे ओठांवर सर्वांची पटकन नजर जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर शक्य तितकी हलकी शेड आणि न्यूड शेड ओठांसाठी वापरा.
लहान ओठ
जर तुमचे ओठ खूपच बारीक आणि लहान आकाराचे असतील तर तुम्हाला ओठांना हव्या त्या शेपची आऊटलाईन करून फुलर लुक देण्याची गरज आहे. तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार तुमच्या ओठांना योग्य तो शेप द्या आणि स्किन टोननुसार निवडा तुमच्यासाठी योग्य आकाराची लिपस्टिक तसंच वाचा तुमच्यासाठी ही लिपस्टिकची शेड आहे परफेक्ट Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi