दागिने हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दागिने जसं घेताना आपल्याला आनंद होतो तसंच ते जतन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यातही मोत्याचे दागिने प्रत्येकीकडे असतातच. खासकरून महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये तर मोत्याचे दागिने आवर्जून घातले जातात. पण मोत्याच्या दागिन्यांची काळजीही तेवढीच घ्यावी लागते. कारण ते जसे दिसायला नाजूक असतात तसेच टिकण्याच्या बाबतीतही. याच विषयावर #POPxoमराठीवर आम्ही काल म्हणजे गुरूवारच्या Live@5 मध्ये माहिती दिली होती. पण तुमच्याकडून ते मिस झालं असेल तर हा लेख नक्की वाचा.
मोत्यांच्या दागिन्यांची काळजी घेताना या गोष्टी लक्षात घ्या How to take care of Pearl Jewellery
- दागिन्यांच्या बाबतीतला महत्त्वाचा नियम म्हणजे दागिने घालताना सर्वात शेवटी घाला आणि बाहेरून आल्यावर सर्वात आधी काढून ठेवा. कारण सर्वात शेवटी घातल्याने तुमचा मेकअप किंवा परफ्युम त्या दागिन्यांना लागत नाही आणि वापरून झाल्यावर सर्वात आधी काढल्यानेही ते खराब होत नाहीत.
- मोत्यांचे दागिने काढल्यावर बॉक्समध्ये ठेवण्याआधी मऊ कापडाने पुसून घ्या. यामुळे त्यावर लागलेला घाम किंवा धूळ निघून जाईल.
- मोत्याच्या दागिन्यांवरील कलाकुसर खूपच नाजूक असते. त्यामुळे ते साफ करणं बरेचदा कठीण जातं. दागिन्यांच्या साफसफाईसाठी तुम्ही सौम्य कंगोऱ्यांचा (ब्रिसल्स) बेबी टूथब्रश वापरू शकता. तसंच कापूस किंवा मलमलच्या कापडानेही ते स्वच्छ करू शकता.
- प्रवास करतानाही मोत्याचे दागिने व्यवस्थित कॅरी करा. एखाद्या चांगल्या पाऊचमध्ये तुम्ही ते ठेवून मगच कॅरी करा.
मोत्यांचे दागिने अगदीही हवाबंद डबीत ठेवू नयेत. कारण जर ते मोती खरे असतील तर ते डीहायड्रेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी खऱ्या मोत्यांच्या दागिन्यांना हवा दाखवावी. - मोत्यांचे दागिने कधीही आंघोळ करताना किंवा स्विमिंग करताना घालू नयेत. यामुळे ते खराब होऊ शकतात.
Also Read Pearl Jewellery Design In Marathi
मोत्यांचे दागिने ठेवताना How to store Pearl Jewellery
मोत्याचे दागिने खरेदी केल्यावर आणि घालून झाल्यावर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते व्यवस्थित ठेवणं. तुम्हाला माहीत हवे की, हे दागिने नक्की कसे ठेवावेत.
- आपल्याकडे जसा मंगळसूत्र ठेवण्यासाठी बॉक्स असतो. तसाच बॉक्स तुम्ही मोत्यांच्या माळ किंवा हार ठेवण्यासाठी आवर्जून वापरा.
- मोत्याचे दागिने इतर दागिन्यांसोबत ठेवू नका. कारण त्यामुळे मोत्यांना ओरखडे पडण्याची भीती असते.
वेगवेगळे कप्पे असलेल्या ज्वेलरी बॉक्समध्ये मोत्यांचे दागिने ठेवणे उत्तम. मोत्याचे दागिने डबी किंवा कोणत्याही पाकिटात कोंबून ठेऊ नका. मोत्याचे दागिने मोकळे राहतील, असेच ठेवा. - तुम्ही एखाद्या डबीत कापूस घालून त्यात मोत्याचे दागिने ठेवल्यास उत्तम, सिल्क किंवा मलमलच्या कपड्यात ही मोत्याचे दागिने तुम्ही ठेवू शकता.
- प्लास्टीकच्या पिशवीत कधीही मोत्याचे दागिने ठेवू नयेत.
Also Read Jewellery Trends In Marathi
हेही वाचा –
सणासुदीसाठी आले तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’
मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर
सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी
साजशृंगार ‘नथी’चा, महाराष्ट्रीयन नथीचा बदलता ट्रेंड
Read More From Jewellery
पायांत चांदीचे पैंजण घालणे ही केवळ जुनी परंपरा नव्हे, त्यामागे आहे वैज्ञानिक कारण
Vaidehi Raje