चेहऱ्याबरोबरच शरीराची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या बाजारात शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी नैसर्गिक शॉवर जेल, फोम आणि बॉडी वॉश असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. बऱ्याच घरांमध्ये साबण कमी प्रमाणात वापरला जातो. साबणाच्या वापराने त्वचा कोरडी पडत असल्यामुळे बऱ्याच घरांमध्ये आता साबणापेक्षाही इतर पर्यायी गोष्टींचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. जेल, फोम आणि बॉडी वॉश याच्या वापरात आता वाढ झाली आहे. पण खरं तर साबणामुळे त्वचा कोरडी होत नाही. तुम्ही जर तुमच्या स्किन टोननुसार अर्थात तुमच्या त्वचेनुसार तुमचा साबण निवडला तर तुम्हाला साबणाचा त्रास होत नाही. कोणत्या त्वचेसाठी कोणता साबण योग्य आहे ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.
कोरडी त्वचा
Shutterstock
ज्यांची त्वचा अतिशय कोरडी आहे त्यांना मॉईस्चराईज असणाऱ्या साबणाची आवश्यकता असते. त्या व्यक्तींनी ज्या साबणामध्ये मॉईस्चराईजर आहे तो साबण निवडावा. त्यामुळे कोरडी त्वचा अधिक कोरडी होणार नाही आणि त्वचा मुलायम आणि मऊ राहील. यामुळे त्वचेमधील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. त्यामुळे आपली त्वचा कशी आहे त्यानुसारच आपण साबण निवडावा. बाजारात मॉईस्चराईजयुक्त अनेक साबण मिळतात. त्यामुळे त्याचा वापर करावा. कोरडी त्वचा बरेचदा हिवाळ्यात जास्त त्रासदायक ठरते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात या त्वचेची खूपच काळजी घ्यावी लागते. अशावेळी त्वचेला मॉईस्चराईज करण्याची गरज भासते. त्यामुळे अशावेळी मॉईस्चराईजयुक्त साबणच वापरावा.
गव्हाच्या पिठाच्या या तीन फेसपॅकमुळे त्वचा होईल अधिक चमकदार
सामान्य त्वचा
Shutterstock
तुमची त्वचा सामान्य अर्थात अगदी नॉर्मल असेल काहीही समस्या नसतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा साबण वापरू शकता. सामान्य त्वचेवर कोणत्याही प्रकारचा साबण सूट करतो. पण अशा व्यक्तींनीही मॉईस्चराईजर असणारा साबण वापरल्यास, त्वचा अधिक मुलायम राहण्यास मदत मिळते. पण इतर साबणांमुळे मात्र यांना त्वचेला त्रास होत नाही. असे असले तरीही सामान्य त्वचा असणाऱ्या व्यक्तींंनी सतत साबण बदलू नयेत. आपण कोणता साबण वापरतोय आणि किती महिने वापरतोय हेदेखील नीट बघणे गरजेचे आहे.
हात नेहमी मऊ ठेवायचे असतील तर वापरा 10 टिप्स
तेलकट अर्थात ऑईली स्किन
Shutterstock
तुमची त्वचा तेलकट अर्थात जर खूप ऑईली असेल तर तुम्हाला नॉर्मल साबण वापरायला हवा. तुमची त्वचा कोरडी न पडू देईल असा साबण तुम्हाला निवडायला हवा. बाजारामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप साबण असतात. त्यापैकी तुम्ही कोणताही साबण त्यावरील घटक वाचून घेऊ शकता. तसंच तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही लिंबू अथवा ग्लिसरीन असणारा साबण वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा अधिक मऊ राहण्यास आणि तेलकटपणा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
कोरोनापासून बचावासाठी सॅनिटाईजर नाही साबणच उत्तम
अँटिबॅक्टेरियल साबण
त्वचेची काळजी तुम्हाला नीट घ्यायची असेल तर तुम्ही अँटिबॅक्टेरियल साबण वापरू शकता. अँटिबॅक्टेरियल साबण वापरल्याने शरीरावर कोणत्याही प्रकारच्या पुळ्या आणि रॅशेस येत नाहीत. तसंच तुमची त्वचा जर तेलकट असेल तर असा साबण नक्की वापरा. यामुळे तुमची तेलकट त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते. बऱ्याच जणांना साबणाची अलर्जीदेखील असते. पण त्यांच्यासाठीदेखील असे अँटिबॅक्टेरियल साबण उपयुक्त ठरतात. मुळात हे साबण संवेदनशील त्वचेसाठीच बनविण्यात येतात. त्यामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तीदेखील अँटिबॅक्टेरियल साबण वापरू शकतात.
Read More From Bath and Body Products
बॉडी मिस्ट आणि बॉडी परफ्युममध्ये काय आहे फरक
Leenal Gawade
त्वचेचे सौंदर्य खुलवेल सी सॉल्ट स्क्रब (Sea Salt Scrub For Skin In Marathi)
Leenal Gawade
निसर्गाच्या खजिन्यांपासून साधलेलं ‘प्रकृती सूत्र’
Aaditi Datar
आंघोळ करताना या गोष्टींचा वापर कराल तर त्वचेच्या विकारांपासून होईल सुटका
Leenal Gawade