जेवण बनवताना कढई जळते असा अनुभव प्रत्येकाला तर नेहमीच येत असेल. तेदेखील अल्युमिनिअमची भांडी असतील तर असा अनुभव वरचेवर येत असतो. पण मग नंतर भांडी धुताना मात्र आपला जीव जातो. पण तुमची अल्युमिनअमची भांडी आणि जळलेली कढई घासायला आता तुम्हाला जास्त जोर काढावा लागणार नाही. काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुमची काळी झालेली भांडी आता 15 मिनिट्समध्ये स्वच्छ आणि चकचकीत दिसू लागतील. पण त्यासाठी नक्की काय करायचं ते आता आपण जाणून घेऊया. यासाठी आपण सोपी पद्धत वापरू शकतो आणि ते कसं करायचं याचं स्पष्टीकरण आम्ही तुम्हाला इथे देत आहोत.
मातीच्या भांड्यात शिजवा जेवण आणि मिळतील आरोग्याला फायदे
जळलेली काळी कढई अथवा अल्युमिनिअमची भांडी स्वच्छ करण्याची पद्धत
Shutterstock
स्टेप 1 – यासाठी तुम्हाला जळलेले अथवा काळे पडलेले कोणतेही अल्युमिनिअमचे भांडे अथवा कढई घ्यायची आहे. त्यामध्ये तीन ग्लास पाणी घाला. त्यानंतर त्यात कोणतीही डिटर्जंट पावडर 2 चमचे घाला आणि 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला. आता हे पाणी 5 मिनिट्स तुम्ही गॅसवर तसंच उकळू द्या. फ्लेम हाय करून पाणी इतकं उकळवा की, उकळून ते पाणी भांड्याच्या वरच्या बाजूपर्यंत यायला हवं. त्यामुळे अगदी कोपऱ्यात पसरलेली घाणही साफ होईल.
स्टेप 2 – आता हे पाणी एका वेगळ्या मोठ्या भांड्यात काढा आणि त्यात पुन्हा तुमचे जळलेले अथवा काळे झालेले भांडे बुडवून ठेवा. म्हणजे बाहेरच्या बाजूनेही झालेला काळेपणा निघून जाण्यास मदत होईल. 10-15 मिनिट्स हे भांडे असंच त्यात राहू द्या म्हणजे त्याचा काळेपणा निघायला मदत होईल.
स्टेप 3 – आता भांडे पाण्याबाहेर काढा आणि एक चमचा बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पावडर मिक्स करा. बेकिंग सोडा हे नैसर्गिक क्लिन्झर आहे. आता वाचलेले गरम पाणी एका बाऊलमध्ये काढा. आता घासणीने बेकिंग सोडा घेऊन साफ करा. मध्ये मध्ये डिटर्जंटच्या पाण्याचा आणि गरम पाण्याचा वापर करा. सँड पेपर असेल तर उत्कृष्ट. यामुळे घाण लवकर स्वच्छ होते. नसेल तर तुम्ही नॉर्मल स्क्रबरनेही साफ केल्यास हरकत नाही.
स्टेप 4 – तरीही थोडासा काळेपणा राहिला असेल तर तो भाग गॅसवर गरम करून घ्या आणि वर दिलेल्या पद्धतीने पुन्हा साफ करा. तुम्हाला तुमची अल्युमिनिअमचे भांडे अगदी नवेकोरे दिसून येईल.
अॅल्युमिनिअमच्या भांड्यात जेवण करताय, मग एकदा वाचाच
जळलेली भांडी साफ करण्याच्या काही वेगळ्या पद्धती
- याशिवाय काही वेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही काही वेळ जळलेली ही कढई फ्रिजमध्ये ठेवा. साधारण 2-3 तास झाल्यानंतर त्याला लागलेले जेवण हे पापुद्रे होऊन निघेल आणि त्यानंतर तुम्ही अगदी सहजतेने कढई अथवा अल्युमिनिअमचे भांडे घासू शकता
- मटारचा रस लावून तुम्ही अशी जळलेली भांडी स्वच्छ करू शकता
- त्याशिवाय टॉमेटोचा रसही यावर प्रभावशाली आहे. तुम्ही जळलेल्या भांड्याना टॉमेटोचा रस लावा आणि त्यामध्ये गरम पाणी मिळवा. त्यानंतर स्क्रबरने साफ करा
- लिंबू आणि बेकिंग सोडा मिक्स करून जळलेल्या भांड्यांमध्ये लावा. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा 2 चमचे लिंबाचा रस आणि 2 कप गरम पाणी घाला. त्यानंतर स्टील स्क्रबरने घासा. यामुळे भांडी पुन्हा नव्यासारखी चमकू लागतील.
जाणून घ्या घरातील देवपूजेची भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.