मासिक पाळी

पिरेड्स पँटीची स्वच्छता आणि बरेच काही

Leenal Gawade  |  May 15, 2022
पिरेड्स पँटी

पिरेड्ससंदर्भातील अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतील. मासिक पाळी आणि पोटदुखी, मासिक पाळी आणि रॅशेश, मासिक पाळी आणि पिंपल्स असे अनेक विषय आम्ही आतापर्यंत तुमच्यासोबत शेअर केले आहेत. आज आपण त्यातील एक महत्वाचा विषयाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. चांगले सॅनिटरी पॅड या दिवसात वापरायला हवे हे आपण जाणतोच. पण मासिक पाळी दरम्याच्या पँटी यादेखील स्वच्छ आणि चांगल्या असायला हव्यात. या पँटीची स्वच्छता नेमकी कशी राखायला हवी हे जाणून घेऊया. 

पँटी वापरताना

पिरेड्स पँटी

सीझन कोणताही असो पिरेड्सच्या दिवसात तुम्ही कॉटनच्या सीमलेस पँटी वापरणे हे सर्वात जास्त चांगले असते. तुम्ही वापरत असलेल्या पँटीचे रबर हे तुमच्या मांड्यांना आणि कंबरेला लागणारे असतील तर ते या दिवसात खूपच जास्त त्रास देतात. हल्ली बाजारात सीमलेस प्रकारातील पँटी मिळतात. त्या तुम्हाला अजिबात गच्च बसत नाही. जर तुम्ही अशा पँटी वापरत नसाल तर अशा पँटी या दिवसांसाठी नक्की घ्या. म्हणजे तुम्हाला पँटीचा त्रास होणार नाही. 

पँटीची स्वच्छता का महत्वाची

सॅनिटरी पॅड दर दोन -तीन तासांनी बदलणे फारच जास्त गरजेचे असते.पण काही जणांना सॅनिटरी पॅड बदलणे जमतेच असे नाही. कधी कधी सॅनिटरी पॅड बदलायला वेळ होतो. अशावेळी पँटीच्या कडांना डाग लागू शकतात. हे डाग साफ करणे मग डोक्याला ताप होऊन जाते. रक्ताचे डाग हे काही केल्या जात नाहीत. शिवाय ज्यांचे नाक कोणताही वास घेऊ शकण्यास सक्षम असेल तर अशांना सतत त्या रक्ताचा वास येत राहतो. अशावेळी पॅड आणि पँटी दोन्ही बदलणे गरजेचे असते. हे शक्य नसेल तर काही सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही पँटीची स्वच्छता ठेवू शकता.

 अशी ठेवा तुमच्या पँटीची स्वच्छता

तुम्हाला तुमच्या पँटीची स्वच्छता राखायची असेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करा. 

  1. पँटी अँटीसेप्टीक लिक्विडमध्ये घालून तुम्हाला धुता येतील. हे सगळ्यात सुरक्षित आहे. यामुळे तुमच्या पँटीचे डाग जाणार नाहीत. पण यामुळे पँटीला येणारा वास निघून जाईल. 
  2. पँटीला डाग लागले असतील. तुमची पँटी लाईट रंगाची असेल तर तुम्ही थोडेसे लिक्विड डिटर्जंट घेऊन त्यावर लावून तेवढाच भाग घासा. त्यामुळे हे डाग जाण्यास मदत मिळते. 
  3. ज्यावेळी अचानक पिरेड्स येतात. त्यावेळी पँटीला लागणारे डाग हे जास्त असतात. अशावेळी कोमट पाणी घेऊन त्यामध्ये डिटर्जंट टाकून तुम्ही काही मिनिटांसाठी पँटी भिजवून ठेवावी. त्यामुळेही डाग जाण्यास मदत मिळते. 
  4. अनेकदा सॲनिटरी पॅडला विंग्ज नसले की पँटीच्या कडा या खराब होण्याची भीती असते. रक्ताचे डाग काही काळासाठी तसेच राहिले की, त्यामुळे पँटी जाघांना लागण्याची शक्यता असते. प्रवासात असताना किंवा तुम्हाला सॅनिटरी पॅड बदलणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या बनियनचा कपडा किंवा पातळ टिशर्टचा कपडा पँटी भोवती गुंडाळून त्यावर सॅनिटरी पॅड लावावे. त्यामुळे पँटीच्या कडा ही लागत नाहीत. 

आता पिरेड्समध्ये पँटीची स्वच्छता राखा आणि निरोगी राहा.

Read More From मासिक पाळी