आरोग्य

नैसर्गिक पद्धतीने रक्तातील साखर कशी आणाल नियंत्रणात, सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Aug 4, 2021
control blood suger

आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे सध्या रक्तातील साखरवाढ तरूणांमध्येही सर्वात मोठी समस्या होत चालली आहे. मधुमेह हा केवळ भारतातीलच नाही तर संपूर्ण देशातील काळजीचा विषय आहे. रक्तातील साखर ही अनेक कारणांनी वाढते आणि वेळेत यावर उपाय करण्यात आला नाही तर अनेक आजारांना यामुळे आमंत्रण मिळते. जेव्हा तुम्हाला मधुमेह (Diabetes) होतो तेव्हा तुमच्या रक्तातील साखर ही सतत वाढू लागते आणि त्यामुळे तुमचे शरीरही पोखरले जाते. मग अनेक औषधे अगदी जन्मभर तुम्हाला खावी लागतात. पण तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने जर रक्तातील साखर नियंत्रणात आणायची असेल तर तुम्ही काही सोप्या टिप्स नक्कीच फॉलो करू शकता. काही डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला या सोप्या टिप्स सांगत आहोत. तुम्हीही याचा वापर नक्कीच करून घेऊ शकता. पण त्याआधी साखरेची पातळी नक्की किती हवी हेदेखील जाणून घ्यायला हवे. 

साखरेची नॉर्मल पातळी नक्की किती?

100 mg/dL पेक्षा कमी (8 तासाच्या उपवासानंतर) आणि 140mg/dL पेक्षा कमी (जेवल्यानंतर दोन तासानंतर) जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी असेल तर ती नॉर्मल आहे असे समजण्यात येते. तुमच्या शरीरातील साखरेची पातळी जर अधिक वाढली असेल तर तुमच्या रक्तवाहिन्या खराब होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अनेक आजार आणि समस्याही उद्भवतात. त्यामुळे वेळीच याकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे नक्की कोणत्या समस्या उद्धवतात हे जाणून घ्या 

नैसर्गिकरित्या कशी आणायची साखर नियंत्रणात 

Freepik

केवळ औषधे खाऊनच नाही तर तुम्ही नैसर्गिकरित्याही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात आणू शकता. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्ही नैसर्गिक घरगुती उपाय सगळे एकत्रच करायला घेऊ नका. कारण यामुळे हायपोग्लायसिमिया (साखरेची पातळी कमी होणे) होऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये बदल करण्याआधी तुमच्या नियमित डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. नैसर्गिक उपाय काय आहेत ते पाहूया. 

कोणते दूध प्यावे 

दूध प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे तुम्ही नेहमीच्या दुधाऐवजी स्किम्ड मिल्क (फॅट 0.5% पेक्षा कमी), नट मिल्क (बदामाचे दूध सर्वात चांगले) अथवा उंटाचे दूध (नैसर्गिक इन्शुलिन यामध्ये असते) पिणे सोयीस्कर ठरते. काही दिवस गाय अथवा म्हशीचे दूध पिणे बंद करा. 

भाज्या आणि फळांचा करा आहारात समावेश 

Freepik

दिवसातून तुम्ही 2 वेगवेगळी फळे आणि आहारात भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करून घ्या. मधुमेही व्यक्तींचा आहार ठरलेला असतो. विशेषतः पालेभाज्या. पालेभाज्यांमुळे तुमच्या शरीरामधील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय तुम्ही नैसर्गिक साखर, गूळ, खजूर याचा वापरही कमी करावा. 

सूचना – हे सर्व नैसर्गिक उपाय अत्यंत सोपे आणि तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की, तुम्ही याचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा. तसंच तुमची जी औषधे चालू आहेत ती सोडून घरगुती उपाय स्वतःच्या मनाने करू नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य