आकर्षक दिसण्यासाठी तसेच आपले सौंदर्य आणखी हायलाईट करण्यासाठी आपण मेकअप करतो. चेहेऱ्याचा मेकअप करताना आपण डोळ्यांच्या मेकअप कडे दुर्लक्ष करू शकत नाही. सुंदर डोळे इतरांचे लक्ष वेधून घेतात आणि आपल्या लूकमध्ये चांगला बदल घडवून आणतात. डोळ्यांचे सौंदर्य आपल्याला आत्मविश्वास देऊ शकते. योग्य आय-मेकअप आपल्या आकर्षक लूकमध्ये भर घालतो. पण डोळ्यांचा मेकअप करणे हे एक कठीण काम आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आय मेक-अप करताना घाई गडबड करून चालत नाही. हे काम करतानाा आपल्याला शांतता आणि संयम आवश्यक असतो आणि आपण काय करतोय याची समज असणे आवश्यक आहे. तसेच कोणता आयशॅडो आणि कोणत्या प्रकारचे आयलायनर आपल्या डोळ्यांना शोभेल हे देखील आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
हे तर झाले नॉर्मल डोळ्यांसाठी पण जेव्हा एखादीला चष्मा असतो तेव्हा कितीही चांगला आय मेक-अप केला तरी तो चष्म्याच्या आड लपतो. अशा वेळी आपण कॉन्टॅक्ट लेन्सेसचा आधार घेतो.
एक तर कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यांना लावणे हेच एक टास्क असते. त्यात जर कॉन्टॅक्ट लेन्सेस लावल्यावर त्यावर आय मेक-अप करायचा असेल तर आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण आपले डोळे खूप नाजूक असतात आणि आधीच कॉन्टॅक्ट लेन्सेस लावल्याने आपले डोळे थोडे सेन्सिटिव्ह होतात. त्यामुळे जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर आय मेक-अप करताना पुढील काळजी नक्की घ्या.
प्रायमर
सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे म्हणजे मेकअप किंवा मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी आपले हात आधी स्वच्छ धुवा आणि त्यानंतरच डोळ्यांत कॉन्टॅक्ट लेन्स लावून घ्या. त्यानंतर तुम्ही प्राइमर लावा कारण ते आयशॅडो आणि लाइनर नीट ठेवण्यास मदत करेल.
आय-शॅडो
जेव्हा आपण कॉन्टॅक्ट लेन्स खरेदी करतो तेव्हा आपण त्या सर्वोत्तम दर्जाच्या असतील याची काळजी घेतो. त्याचप्रमाणे मेकअपची निवड करताना ते प्रीमियम दर्जाचे असल्याची काळजी घेतली पाहिजे. आयशॅडो घेताना पावडर शॅडो पेक्षा क्रीम शॅडो निवडणे हा एक सुरक्षित पर्याय आहे कारण पावडर शॅडोचे कण डोळ्यात जाण्याची शक्यता असते. ते कण डोळ्यांत गेले तर त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स दूषित होऊ शकतात. तसेच, ऑइल बेस्ड शॅडो ऐवजी वॉटर-बेस्ड आय शॅडो घ्यावे कारण क्रीम बेस्ड मेकअपवर बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते.
अधिक वाचा – सुंदर डोळे दिसण्यासाठी घरगुती उपायांनी कमी करा अंडरआय बॅग
आयलायनर
सामान्यपणे आय मेक-अप करताना आपण पापण्यांच्या आतल्या बाजूला आयलाइनर लावतो. पण जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर पापण्यांच्या जास्त जवळ लायनर लावू नका. कारण आयलायनर लेन्सच्या संपर्कात येऊ शकते आणि डोळ्यांच्या आत जाऊ शकते. तसेच लायनरमुळे पापण्यांच्या अस्तरांवर असलेल्या ग्रंथी ब्लॉक होऊ शकतात. हे टाळण्यासाठी जेल किंवा क्रीम लाइनरऐवजी पेन्सिल आयलाइनर वापरावे, लिक्विड आयलायनर सुकल्यानंतर त्याचे कण डोळ्यांत जाऊ शकतात. तसेच Kohl पेन्सिल देखील वापरू नये कारण त्यामध्ये लीड सारख्या धातूंचा समावेश असतो. ह्या गोष्टी डोळ्यांसाठी अजिबात चांगल्या नाहीत.
तुम्हाला जर आय मेक-अप आणखी पुढच्या लेव्हलला न्यायचा असेल तर तुम्ही युझ अँड थ्रो कलर कॉन्टॅक्ट लेन्सेस देखील वापरू शकता. याने तुमचा लूक आणखी आकर्षक होण्यास मदत होईल. पण जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी मेक-अपच्या वस्तूंची खरेदी कराल तेव्हा ती उत्पादने कॉन्टॅक्ट लेन्स घालणार्यांसाठी सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या. जर तुम्ही सातत्याने मेकअप करत असाल तर दररोज डिस्पोजेबल कॉन्टॅक्ट लेन्स वापरले तर ते तुमच्या डोळ्यांसाठी देखील चांगले असेल.
अधिक वाचा – डोळे जळजळ उपाय, करा सोप्या पद्धतीने
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From Eye Make Up
आयब्रो दाट होण्यासाठी आणि जलद वाढीसाठी टिप्स | Eyebrow Growth Tips In Marathi
Vaidehi Raje