पालकत्व

मुलीला पहिल्यांदा पिरेड्स आलेत,असा साधा संवाद

Leenal Gawade  |  Jun 13, 2021
मुलीला पहिल्यांदा पिरेड्स आलेत,असा साधा संवाद

तुम्हाला पहिल्यांदा पिरेड्स आलेत तेव्हा तुम्ही काय केलं होतं? आठवतं का? पहिल्या पिरेड्सची प्रत्येकाची अशी काहीना काही आठवण असतेच. साधारण वयात आल्यानंतर घरीच आई आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने याबद्दल सांगायला सुरुवात करते. कावळा शिवला, बाहेरची झाले असे शब्द खूप जणींनी त्यांच्या लहानपणी नक्कीच ऐकले असतील. असा शब्द कानांवर पडल्यानंतर आई तुला वेळ आल्यावर सांगेन असं म्हणते. ती योग्य वेळ आल्यानंतर हे याच्यासाठी एवढे सिक्रेट ठेवले असे वाटू लागते. आता तुम्हालाही लेक असेल आणि ती वयात आली असेल तर तुम्ही पिरेड्सचा संवाद टाळण्यापेक्षा योग्य असा संवाद साधायला हवा. हा संवाद साधायचा कसा हे तुम्हाला कळत नसेल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स

तुम्हाला ‘पिरेड्स पिंपल्स’ म्हणजे काय ते माहीत आहे का?

पिरेड्स म्हणजे पिरेड्स… कावळा शिवला नाही

पूर्वीच्या काळी मासिक पाळीबद्दल तितकी सजगता नव्हती. याबद्दल उघडपणाने बोलणेच खूप जणांना नकोसे व्हायचे अशावेळी पालक मुलींना कावळा शिवला असे सांगून वेळ मारुन नेत होत्या. पण आता असे करायची काहीच गरज नाही कारण आता टीव्हीवर किंवा फोनवर सॅनिटरी पॅड्सच्या इतक्या जाहिराती दिसू लागल्या आहेत की या गोष्टींची तशी गरज सहसा आता भासत नाही. त्यामुळे तुम्ही पिरेड्स काय आहेत. ते त्यांना नीट समजवून सांगा. शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर पडण्यासाठी महिन्यातील पाच दिवस शरीरातून लघवीच्या वाटे रक्त जाते. त्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही असे सांगून त्यांना याची माहिती द्या.

म्हणजे तुमचे पिरेड्स आलेत जवळ, जाणून घ्या पिरेड्सची लक्षणं

पिरेड्स आणि सॅनिटरी पॅड

सॅनिटरी पॅड हे कशासाठी वापरले जातात याची माहिती मुलींना योग्यवेळी द्यायला हवी. पिरेड्स आल्यानंतर सॅनिटरी पॅड का लावायचे हे देखील माहीत असणे गरजेचे असते.कारण खूप मुलींना हल्ली अगदी 4 ते 5 वीत असतानाच पिरेड्स येतात. या वयात पँटीला सॅनिटरी पॅड लावण्याचा कंटाळा असतो. पण याची नितांत गरज का ते सांगून द्या. सॅनिटरी पॅड कधी बदलायचे, ते वापरुन झाल्यानंतर कसे टाकायचे याची माहिती देखील मुलींना द्या. त्यामुळे त्यांना पिरेड्स आल्यानंतर नक्की काय करायचे हे कळेल. 

मोकळा संवाद महत्वाचा

खूप पालक मुलींच्या शरीरात बदल होऊ लागले की, त्यांना थोडी थोडी माहिती द्यायला सुरुवात करतात. मुलींना मुक्त वावरु देणे हे चांगले असले तरी मुलगी वयात येताना तिच्या शरीरात अनेक बदल व्हायला सुरुवात होते. छाती दिसू लागते. शरीर स्त्रीप्रमाणे आकार घेऊ लागते. काखेत केस येऊ लागतात. मुलींच्या शरीरात असे बदल दिसू लागले की, त्यांना योग्य कपडे घालण्यास सुरुवात करावी. नुसता पेटीकोट न घालता त्यांना योग्य कपडे घालण्यास द्यावे. तुम्ही हळुहळू हे बदल केले तर त्याचा त्रास होणार नाही. पण तु्म्ही त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये अचानक बदल करु लागाल तर मात्र त्यांना हा बदल नकोसा होऊ लागतो. अशावेळी मुली ऐकत नाही. पण तुम्ही त्यांना स्पोर्टस ब्रा, पँटी, चांगले कपडे असे घातले तर मात्र त्यांना त्याची सवय होऊ लागते या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला उत्तम संवाद साधणे हेच गरजेचे आहे. मुलीसोबत जितका वेळ एखाद्या मैत्रिणीसारखा घालवाल तितकं तिला समजावणं अधिक सोप्प जातं. 

 
संवाद हा यामध्ये सगळ्यात महत्वाचा त्यामुळे संवाद साधा म्हणजे तुम्हाला पिरेड्सबद्दल बोलणे तुम्हाला अधिक सोपे जाईल.

पिरेड्स चुुकवण्यासाठी गोळ्या घेताय, मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात

Read More From पालकत्व