पालकत्व

बाळाला अंघोळ घालण्याची वाटतेय भीती, सुरक्षेसाठी  वापरा हे प्रॉडक्ट्स

Trupti Paradkar  |  Aug 2, 2022
Product List That Keep Your Baby Safe During Bath Time in Marathi

घरात बाळाचा जन्म झाला की सर्व जण आनंदी होतात. मात्र बाळाच्या जन्मासोबत त्याच्या संगोपनाची जबाबदारी वाढते. बाळाचे संगोपन कसे करावे यासाठी तुम्हाला अनेक सल्ले दिले जातात. बाळाला अंघोळ घालणं हे एक आव्हान  असतं. कारण सुरुवातीच्या बाळात बाळाला अंघोळ घालण्याची पालकांना नेहमीच भीती वाटत असते. बाळाचं शरीर नाजूक असतं त्यामुळे तुम्ही त्यासाठी जे प्रॉडक्ट अंघोळ घालताना वापरता ते सुरक्षित असायला हवे. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असेच काही बेबी प्रॉडक्ट शेअर करत आहोत. तसंच वाचा बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय | Babies Diaper Rash Home Remedies In Marathi, बाळाच्या वाढीचे टप्पे | Step By Step Baby Growth In Marathi

बाळाला सुरक्षित अंघोळ घालण्यासाठी वापरा हे प्रॉडक्ट

बाळाला अंघोळ घालताना त्याच्या शरीराची काळजी घेण्यासोबतच त्याला आनंदी आणि आरामदायक वाटेल याची काळजीही घ्यायला हवी. यासाठीच जर तुम्ही हे बेबी प्रॉडक्ट वापरले तर तुम्हाला नक्कीच चांगली मदत होईल.

बाथ टब

नवजात बाळाला अंघोळ घालण्यासाठी खास डिझाइन केलेले बाथ टब आजकाल बाजारात मिळतात. नव माता अथवा पित्याने ते आवर्जून वापरावे. कारण त्यामुळे बाळ अंघोळ घालताना हातातून निसटण्याची भीती राहत नाही. बाथ टबमध्ये अंघोळ करण्याची बाळालाही मजा वाटते. मात्र यासाठी चांगल्या ब्रॅंडचे बाथ टब विकत घ्या.

बेबी वॉश

बाळाची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदशनील असते. त्यामुळे बाळासाठी कोणता साबण अथवा बेबी वॉश वापरावं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो. बेबी वॉश खरेदी करताना त्यामध्ये कृत्रिम सुगंध आणि रंगाचा वापर केलेला नसेल याची खात्री करून मगच तो विकत घ्या. बेबी वॉश नेहमी चांगल्या ब्रॅंडचे आणि नैसर्गिक असावे.

बेबी शॅंपू

बाळाच्या अंगाचा साबण अथवा बेबी वॉश तुम्ही त्याचे केस स्वच्छ करण्यासाठी वापरू शकत नाही. कारण साबण डोळ्यात गेल्यास बाळाला त्रास होऊ शकतो. यासाठी बाळासाठी खास डिझाइन केलेला बेबी शॅंपू विकत घ्या. ज्यामध्ये बाळाच्या त्वचेचा आणि सुरक्षेचा विचार करून माइल्ड घटक वापरण्यात येतात.

बेबी रिनसर

बाळाचे केस धुणे ही एक कठीण गोष्ट तुम्हाला वाटू शकते. कारण केस धुताना बाळाच्या नाक अथवा तोंडात पाणी, साबण गेल्यास ते गुदमरू शकते. म्हणूनच बाळाचे केस धुण्यासाठी बेबी रिनसर वापरा. ज्यामुळे फक्त त्याच्या केसांवरच पाणी आणि शॅम्पू असेल आणि बाकीचे शरीर सुरक्षित राहील.

बेबी शॉवर कॅप

बाळाला अंघोळ घालताना त्याच्या डोळ्यात अथवा नाकात पाणी जाऊ नये, शिवाय बाळाला अंघोळीचा आनंद घेता यावा यासाठी तुम्ही बाळाला थोडं मोठे झाल्यावर बेबी शॉवर कॅप वापरू शकता. 

बाथ टॉय

बाळाला अंघोळ घालणं सोपं करायचं असेल तर बाथ टबमध्ये बाळाचे फेव्हरेट बाथ टॉय जरूर ठेवा. बाथ टॉय पाण्यावर तंरगतात आणि बाळ त्याच्यांसोबत खेळण्यात गुंतून राहते. ज्यामुळे ते अंघोळ करताना चिडचिड करत नाही.

बेबी बाथ टॉवेल

बाळाला अंघोळ घातल्यावर कोणत्याही टॉवेलने बाळाचे अंग पुसू नका. बाळासाठी खास हुड वाले टॉवले मिळतात. ज्यामुळे तुम्ही त्याला छान गुंडाळू शकता. टॉवेलमुळे बाळाच्या शरीरावरील सर्व पाणी शोषून घेतले जाते. या टॉवेलचे कापड सुती, मऊ आणि आरामदायक असेल याची काळजी घ्या.

बाळासाठी आम्ही तुमच्या सोबत शेअर केलेली बी बेबी बाथ प्रॉडक्टची लिस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From पालकत्व