लाईफस्टाईल

लहान मुलांना गोकुळाष्टमीला तयार करताना उपयोगी पडतील या टिप्स

Aaditi Datar  |  Aug 28, 2021
janmashtami-wishes-in-marathi

आपल्या घरी लहान मुलं असल्यावर त्यांना आवर्जून गोकुळाष्टमीसाठी तयार केलं जातं. मुलगा असेल तर कृष्णासारखं आणि मुलगी असेल तर राधासारखं. गोकुळाष्टमीचा सण हा शाळांमध्येही आवर्जून साजरा केला जातो. अशावेळी तुम्ही ऐनवेळी पंचाईत होऊ नये म्हणून शेअर करत आहोत काही खास टिप्स. ज्या तुमच्या राधा किंवा कृष्णाला तयार करताना नक्कीच उपयोगी पडतील. 

रक्षाबंधनानंतर लगेच वेध लागतात ते जन्माष्टमीचे. दहीहंडी आणि गोकुळाष्टमी माहिती आपल्याला असतेच. तसंच या दिवशी आपण आप्तेष्टांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छाही देतोच. पण घरात लहान मुल असल्यावर या दिवसाचा आनंद अजूनच वाढतो. कारण लहान मुलं या दिवशी जास्त उत्सुक असतात. त्यामुळे मुलांना खास गोकुळाष्टमीसाठी तयार करण्यात येतं. अशावेळी खास शॉपिंगही करण्यात येते. कारण मुलांना कृष्ण किंवा राधाच्या लुकमध्ये परफेक्टली तयार करण्यासाठी काही गोष्टी खरेदी कराव्या लागतातच. चला पाहूया काय काय गोष्टी तुम्हाला या लुकसाठी लागतील.

शाळेसाठी मुलांच्या जन्माष्टमीची तयारी करताना –

राधा-कृष्णाला तयार करताना –

धोती-कुर्ता सेट आणि चनिया-चोळी 

कृष्णाचा लुक म्हटल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिवळा धोती-कुर्ता सेट आणि राधाचा लुक म्हटल्यावर चनिया-चोळी हवीच. आजकाल यामध्ये खूप व्हरायटी पाहायला मिळते. 

तुम्हाला असा ड्रेस  विकत घ्यायचा नसल्यास अनेक ठिकाणी संपूर्ण लुक हा भाड्यानेही मिळतो. हे कपडे घेताना ते नीट पाहून घ्या. सोबतची ज्वेलरी ही नीट तपासून घ्या. कारण बरेचदा एखादी ज्वेलरी जुनाट किंवा तुटलेली असू शकते. त्यामुळे घेतेवेळी नीट पाहून घ्या. तसंच भाड्याने ड्रेस घ्यायचा असल्यास चार-पाच दिवस आधीच तो बुक करावा लागेल. विकत घ्यायचा असल्यास तुम्ही तो आदल्या दिवशीही घेऊ शकता.  

मुकुट 

कृष्णाच्या लुकसाठी फक्त कपडेच नाहीतर मुकुट आणि इतर एक्सेसरीजही महत्त्वाच्या आहेत. सर्वात महत्त्वाचा आहे मुकुट. कारण तो घातल्यावर तुमचा छोटा कृष्ण लगेच उठून दिसतो. 

मोरपीस

मोरपीस ही कृष्णाची खास ओळख आहे. त्चाच्याशिवाय कृष्णाचा लुक अपूर्णच आहे. 

मोत्याच्या माळा

कृष्णाच्या गळ्यात नेहमी मोत्याच्या माळा असायच्या. त्यामुळे कृष्णाच्या लुकसाठी आपल्या लाडक्याला मोत्याच्या माळाही नक्की घाला. 

बासरी 

आपल्या बासरीच्या मधुर स्वरांनी कृष्णा राधा आणि तिच्यासोबतच्या गोपिकांना मोहून टाकत असे. मग अशी बासरी आपल्या छोट्या कृष्णालाही हवीच नाही का. तुमच्याकडे आधीपासूनच बासरी असल्यास त्याला गोंडा लावायला विसरू नका. 

शक्य असल्यास यासोबतच छोटसं मडकं लोणी भरूनही नक्की ठेवा. 

राधाचा लुक

कृष्णाची प्रिय सखी राधा हिचा लुक करण्यासाठी तुम्हाला बरेच पर्याय मिळतील. आजकाल लहान मुलींसाठी अनेक प्रकारची ज्वेलरी बाजारात आल्याचं दिसतं. राधाच्या लुकसाठी तुम्ही खास ज्वेलरी विकत घेऊ शकता किंवा घरातल्याच ज्वेलरीचा वापर करून राधाला तयार करा. 

तुमच्या छोट्या राधा किंवा कृष्णाला तयार करताना तिला एक छोटा काळा तीळ काढायला विसरू नका. 

या लुकसाठी तयार करताना राधा-कृष्ण दोघांच्याही हाताला अलता लावायला विसरू नका. 

तसंच मुलांना कपाळावर तिलक नक्की लावा. मुलांनाही ओठांना थोडीशी लिपस्टीक लावायला विसरू नका. 

आजकाल मुलांच्या आणि पालकांच्या हौसेलाही मोल नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकाला किंवा लेकाना कृष्णाच्या रूपात नक्की तयार करा. बरेचदा मुलींनाही श्रीकृष्णाच्या रूपात तयार केले जाते. ज्यात मुली फारच गोड दिसतात आणि हुबेहुब कान्हा वाटतात. तुम्ही तसंही करून पाहू शकता. अशा सणवारांच्या निमित्ताने आपल्याला पुढच्या पिढीला आपल्या सण आणि संस्कृतीची खऱ्या ओळख करून देता येते हे निश्चित आहे.

Read More From लाईफस्टाईल