गरोदरपण आणि बाळंतपण हे स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. या काळात स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. बाळंतपणानंतर या काळाच्या काही खुणा आयुष्यभर महिलांना बाळगाव्या लागतात. त्यातील सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे स्ट्रेच मार्क्स. बाळाच्या आगमनाच्या आनंदासोबत या गोष्टींचा त्रासही प्रत्येक स्त्रीला सहन करावा लागतो. कारण बाळंतपणानंतर निसर्गनियमानूसार स्त्रीचं शरीर पूर्ववत होण्यास सुरूवात होते. मात्र गरोदरपणात वाढलेलं पोट जेव्हा पुन्हा पूर्वीसारखं होऊ लागतं तेव्हा पोटावर आणि शरीराच्या इतर भागावर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. ज्यामुळे मग बाळंतपणानंतरही फॅशनेबल कपडे घालणं महिलांना नकोसं वाटू लागतं. काही जणींना तर यामुळे बॉडी शेमिंगलाही सामोरं जावं लागतं. यासाठी महागडे उपचार आणि औषधं लावून तुम्ही थकला असाल तर एका घरगूती उपचाराने तुम्हाला फायदा होऊ शकतो. स्वयंपाक घरातील कॉफीमुळे तुमचे स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
Shutterstock
कॉफीमुळे कसे कमी होतात स्ट्रेच मार्क्स –
कॉफीमध्ये कॅफेन हा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. यासाठीच आजकाल अनेक सौंदर्योत्पादनांमध्ये कॉफीचा वापर केला जातो. कॉफीमुळे तुमच्या त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारते. यासाठीच अनेक ब्युटी क्रीममध्ये कॉफीचा वापर केला जातो. कॉफीमध्ये त्वचा उजळ करण्याचे आणि डाग अथवा व्रण करणारे गुणधर्म असतात. एवढंच नाही तर कॅफेनमध्ये लवचिकता वाढवणारे आणि सैल त्वचा पुन्हा घट्ट करणारे गुणधर्म असतात. कॅफेनमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते ज्यामुळे तुमची त्वचा अधिक उजळ दिसते. कॅफेनमध्ये अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होण्यास मदत होतात. म्हणूनच सुरकुत्या आणि स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही कॉफी पावडरचा वापर करू शकता. शिवाय कॉफी तुमच्या त्वचेचं योग्य पोषण करून त्वचेला मऊ आणि मुलायमदेखील करते. स्ट्रेच मार्क्सवर कॉफी लावल्याने तिथल्या भागाजवळील रक्ताभिसरण चांगले होते आणि त्वचा नितळ होऊ लागते.
Shutterstock
कॉफीचा वापर स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी कसा कराल –
- एका भांड्यांत कॉफीची पावडर घ्या
- कॉफीमध्ये थोडं कोमट पाणी घालून पातळ आणि एकसमान पेस्ट तयार करा.
- ही पेस्ट लावण्यापूर्वी स्ट्रेच मार्क्स असलेला भाग पाण्याने स्वच्छ करून कोरडा करा. कारण कोणतंही मलम त्वचा स्वच्छ न केल्यास लावल्यास त्यांचा चांगला परिणाम होत नाही. अंघोळ करताना हा मास्क लावणं जास्त फायदेशीर आहे.
- स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर हळूवारपणे ही कॉफीची पेस्ट अथवा कॉफी मास्क लावा. त्यानंतर बोटांच्या मदतीने काही सेंकद भागावर गोलाकार पद्धतीने ( सर्कुलर मोशनमध्ये) मसाज करा.
- वीस ते तीस मिनीटांनी त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ करा. मात्र त्यानंतर कोणतंही बॉडीवॉश अथवा साबण त्वचेवर लावू नका.
- चांगला परिणाम हवा असेल तर कमीत कमी आठवड्यातून दोनदा कॉफी मास्क लावा.
- कॉफी मास्क तयार करण्यासाठी नारळाचे तेल अथवा इतर तेलांचा वापर करू शकता. आपण देखील प्रयत्न करू शकता स्ट्रेच मार्क्स हटविण्यासाठी उत्कृष्ट क्रिम्स.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला
अधिक वाचा –
प्रेगन्सी स्ट्रेच मार्क्सपासून ते चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यापर्यंत उपयुक्त आहे बायो ऑईल
Stretch Marks : प्रेगन्सीनंतर स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय
स्ट्रेच मार्क्स आणि एंटी एजिंग ट्रिटमेंटसाठी घ्या ‘हॉट कॅंडल वॅक्स मसाज थेरपी’