Fitness

गर्भावस्था अधिक जोखमीची वाटतेय, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Leenal Gawade  |  Apr 22, 2021
गर्भावस्था अधिक जोखमीची वाटतेय, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीसाठी फार महत्वाचा असा काळ असतो. या दिवसांत बाळाचे नीट संगोपन होण्यासाठी महिला स्वत:च्या आरोग्याची आणि बाळाची काळजी घेतात. पण काही महिलांची गर्भावस्था ही इतरांच्या तुलनेत अधिक जोखमीची (High Risk Pregnancy) असते.सध्याची जीवनशैली आणि आजुबाजूला घडणाऱ्या घटना या सगळ्याा खोलवर परिणाम हा महिलांच्या गर्भारपणावर होतो. बाळ सुदृढ राहण्यासाठी होणाऱ्या मातेने कशी काळजी घ्यावी हा सल्ला डॉ. गंधाली देवरुखकर (स्त्रीरोगतज्ज्ञ, वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल) देत आहेत. त्यांचा सल्ला जाणून घेत होणाऱ्या माता त्यांची गर्भावस्था आनंदी मनाने घालवू शकता.

गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठता घरगुती उपाय – Constipation During Pregnancy

डॉक्टरांवर विश्वास ठेवा

गर्भावस्थेत असताना तुमच्या सगळ्या शंकाचे निरसन डॉक्टर करु शकतात.अशावेळी कोणावरही विश्वास ठेवण्याऐवजी तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा.तुमच्या कितीही गुंतागुंतीच्या काळात तुम्हाला डॉक्टर हे योग्य सल्ला देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या मनाचा गोंधळ वाढू न देता तुम्हाला योग्य ती माहिती देणे आणि तुमच्या मनाचा गोंधळ कमी करण्याचे काम डॉक्टरांना अगदी सहज जमू शकते. ऑनलाईन किंवा अनावश्यक माहितीचे स्रोत टाळा.ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल

परिस्थिती स्विकारा

Instagram

जर तुमची गर्भावस्था जोखमीची आहे असे जर तुम्हाला कळले असेल तर त्या परिस्थितीचा खूप विचार करण्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्विकारा. जर तुम्हाला तुमची गर्भावस्था कशी आहे ते माहीत असेल तर आहे ती परिस्थिती हाताळणे हे फार सोपे जाते. यात होणाऱ्या गुंतागुंतीचा जाणीव तुम्हाला होते. तुम्ही आहे ती परिस्थिती मान्य केली नाही तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक असलेले उपचार घेणे फार सोपे जाते.

गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल

औषधे घ्या वेळेवर

जोखीम असलेल्या गर्भावस्थेदरम्यान तुमचे नियोजन उत्तम पद्धतीने राखणे गरजेचे असते. तुम्हाला दिलेली औषधे, तपासणी ही वेळच्या वेळी व्हायला हवी. तुम्हाला जर एखादी औषधे घेण्याचा सल्ला दिला असेल  किंवा एखादी सप्लिंमेंट दिली असेल तर ती तुम्ही वेळच्या वेळी घ्या. कारण बाळांच्या वाढीसाठी ही औषधे खूपच फायद्याची असतात. जर तुम्हाला एखाद्या औषधांचा विपरित परिणाम जाणवत असेल तर त्याची माहिती वेळीच डॉक्टरांना द्या. डॉक्टरांना योग्य माहिती देण्यास विसरु नका. त्याची विस्तृतपणे माहिती दिली तर तुम्हाला त्याऐवजी दुसरी औषधे सुचवली जातील. 

 

आहार हवा चांगला

चांगल्या जीवनशैलीसाठी चांगला आहार हा नेहमीच गरजेचा असतो. गर्भारपणात तर आहार हा दोन जीवांचा असतो असे म्हणतात. पण असे असले तरी देखील जिभेचे चोचले पुरवताना काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे असते. गरोदरपणात स्निग्ध आणि साखरयुक्त पदार्थ टाळा. जर ते टाळणे शक्य नसेल तर त्याचे प्रमाण हे योग्य असून द्याय जंक फूड हे या काळात खाणे फारच धोक्याचे असते. कारण अशामुळे जेस्टेशनल डाएबिटीज होण्याची शक्यता असते. याशिवाय मीठ युक्त पदार्थांच्या सेवनावरही नियंत्रण असायला हवे. कारण अशा पदार्थांच्या सेवनामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

व्यायाम करा

Instagram

निरोगी जीवनासाठी व्यायाम हा फारच फायद्याचा असतो. व्यायामामुळे शरीर मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या शरीर फिट राहते. पण तुम्हाला जास्त जोखीम असलेली गर्भधारणा असेल आणि प्लॅसेंटाने गर्भाशयाचा अंशतः किंवा पूर्ण भाग आच्छादला असेल, तर योगासने व प्रसवपूर्व व्यायाम करू नये. याआधी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुमच्यासाठी योग्य असलेले व्यायाम निवडा आणि केवळ तेच व्यायाम नियमितपणे करा.

अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही प्रसुतीही सुलभ होण्यास मदत होईल.

गरोदरपणी ही फळं आवर्जून खावी

Read More From Fitness