Family

प्रेग्नंसीबाबतच्या प्रश्नांनी झाला असाल हैराण तर असं द्या उत्तर

Aaditi Datar  |  Apr 13, 2020
प्रेग्नंसीबाबतच्या प्रश्नांनी झाला असाल हैराण तर असं द्या उत्तर

कोणत्याही महिलेसाठी आई होण्याचा आनंद हा परमोच्च असतो. हा एक असा क्षण असतो, जो प्रत्येकीसाठी अवर्णनीय आहे. प्रत्येक कुटुंबासाठीसुद्धा ही आनंदाची बाब असते. त्यामुळे लग्न झालेल्या जोडप्यांकडून अगदी वर्षभरातच गुड न्यूजबाबत विचारणा होऊ लागते. पण बेबी प्लॅनिंग हे पूर्णतः तुम्ही आणि तुमच्या पार्टनरवर अवलंबून आहे. सुरूवातीला गुड न्यूजच्या प्रश्नांचं काही वाटत नाही पण काही काळाने हे प्रश्न त्रासिक वाटू लागतात. जर तुम्हाला कोणी विचारलं की, काय मग कधी देताय गोड बातमी तर अशा प्रश्नांना टाळण्याऐवजी सरळ उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आता हे नेमकं कसं करावं याबाबतच्या सोप्या टिप्स वाचा. ज्यामुळे नातेवाईकांशी तुमचं बोलणंही वाईटपणाचं ठरणार नाही आणि सिच्युएशनसुद्धा स्मार्टली हँडल होईल.

Giphy

वारंवार गुड न्यूजबाबतचे प्रश्न कोणी विचारल्यास आपण चिडतो आणि ज्यामुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो. हे स्वाभाविक आहे पण तुम्ही हे हसून टाळूही शकता. हो…अनेकदा एखाद्या गोष्टीने हैराण होण्याऐवजी ती मस्करीत घ्यावी. उदाहरणार्थ तुमच्या नवऱ्याची मावशी किंवा आत्त्या म्हणाली की, काय मग सूनबाई गुड न्यूज कधी देणार? तेव्हा हसून उत्तर द्या की, जेव्हा गुड न्यूज असेल तेव्हा सर्वात आधी तुम्हालाच सांगेन. अशाप्रकारे तुम्हाला त्यांचा मानही ठेवता येईल आणि तुमची इमेजही खराब होणार नाही. 

जेव्हा तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा नातेवाईकांना भेटता तेव्हा हा विषय निघणं स्वाभाविक आहे. अशावेळी जेव्हा तुम्हाला कोणी फॅमिली प्लॅनिंगबाबत विचारल्यास विषय बदला किंवा त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवा. यामुळे तुम्ही प्रश्नांपासूनही वाचाल आणि त्यांना पुन्हा विचारण्याची संधी मिळणार नाही. एवढंच नाहीतर जर तुम्हाला वाटलं की, हा प्रश्न पुन्हा येईल तेव्हा तिथून उठा किंवा एखाद्या कामाचं कारण देऊन निघा. 

जर घरातलं कोणी याबाबत तुम्हाला विचारत असेल तर न चिडता कंफर्टेबली उत्तर द्या. पण या गोष्टींची काळजी घ्या की, तुम्हाला वाईटपणा येणार नाही. 

आपल्याकडे गुड न्यूजच्या प्रश्नाबाबत बरेचदा बायकांनाच विचारण्यात येतं. महिलाच महिलेला या प्रश्नाने भंडावून सोडतात. मग ते नातेवाईक असो किंवा कोणी मैत्रिणी असोत. पण तुमच्यासोबतच तुमच्या नवऱ्यालाही अशा प्रश्नांबाबत उत्तर देण्यासाठी तयार करा. त्यामुळे जेव्हा असं विचारण्यात येईल तेव्हा तुम्ही दोघं त्याचं उत्तर देऊ शकाल. ज्यामुळे कुटुंबातल्या सदस्यांनाही वाईट वाटणार नाही आणि तुमचंही काम होईल. 

काय गं लग्न कधी करतेस.. या प्रश्नांनी तुम्हीही आहात हैराण

लक्षात घ्या आई होणं हे प्रत्येक महिलेला आवडणारी बाब आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात. तसंच फक्त कपलमधील बायकोलाच याबाबत प्रश्न न विचारता नवऱ्यालाही कुटुंबियांकडून विचारणा झाली पाहिजे. पण शक्य असल्यास कोणत्याही कपलला त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगबाबत अगदी काळजीपोटीही असे प्रश्न विचारणं योग्य नाही. कारण ही त्यांची खाजगी बाब आहे. त्यामुळे कोणालाही गुड न्यूजबाबत विचारताना एकदा विचार नक्की करा.

इंटरनेट सर्चमध्ये ‘हे’ प्रश्न होत आहेत ट्रेंड

राजा-राणीच्या संसाराची गोष्ट येईल सत्यात तुम्हीही करून पाहा या गोष्टी

Read More From Family