लेदर हॅंडबॅग वापरणं हे एक स्टाईल स्टेटमेंट झालं आहे. कारण या बॅग आकर्षक आणि स्टायलिश असतात. शिवाय प्युअर लेदरच्या बॅग वापरणं हे तुमच्या फॅशनेबल लाईफस्टाईलचं एक प्रतिक मानलं जातं. लेदरच्या बॅग्ज खूप महाग असतात. मात्र आजकाल बाजारात लेदरप्रमाणे दिसणाऱ्या अनेक बॅग्ज मिळत असल्यामुळे प्युअर लेदर आणि आर्टिफिशिअल लेदरमधला फरक पटकन समजत नाही. जर तुम्हाला लेदर कसं ओळखावं हे माहीत नसेल तर तुम्ही प्युअर लेदरचे पैसे खर्च करून साध्या लेदरची बॅग विकत आणू शकता. यासाठीच तुम्हाला या काही टिप्स माहीत असायलाच हव्या
प्युअर लेदर ची बॅग कशी ओळखावी
लेदरची बॅग खरेदी करताना तुमच्या मनात हे लेदर प्युअर आहे की आर्टिफिशिअल असा प्रश्न नक्कीच येतो. दिसायला दोन्ही बॅग सेमच असतात मात्र जर लेदर प्युअर नसेल तर काही दिवसांत ते खराब होतं आणि तुमची फसवणूक होते. यासाठी बॅग खरेदी करताना या गोष्टी जरूर बघा.
रंग
प्युअर लेदरची बॅग तुमच्याजवळ असणं ही एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे. पण यासाठी तुम्हाला प्युअर लेदर कसं ओळखावं हे माहीत असायला हवं. जेव्हा तुम्ही लेदरची बॅग खरेदी करता तेव्हा त्यावर थोडं हलक्या हाताने रगडून बघा. जर लेदर लालसर रंगाचं झालं तर याचा अर्थ ते प्युअर आहे. कारण आर्टिफिशिअल लेदर लालसर रंगाचं होत नाही उलट ते रगडल्यामुळे फाटण्याची शक्यता असते.
गंध
प्युअर लेदर तुम्ही वासावरून ओळखू शकता. ज्यांना लेदरच्या बॅग वापरण्याची सवय असते त्यांना हाल गंध लगेच ओळखता येतो. चामड्याचा एक विचित्र वास अशा प्रकारच्या लेदरला असतो. मात्र आर्टिफिशिअल लेदर मात्र कोणत्याच वासाचं नसतं अथवा त्याला आर्टिफिशिअल गंध देण्यात आलेला असतो. जो चामड्याचा नसू शकतो.
फिनिशिंग
लेदरच्या बॅग या प्राण्यांच्या चामड्यापासून बनवल्या जातात. ज्यामुळे त्यांच्यामध्ये चामड्यामध्ये असलेली लवचिकता असते. सहाजिकच अशा बॅगचं टेक्चर, फिनिशिंग निराळं असतं. लेदर जितकं प्युअर तितकी तुमच्या बॅगची किंमत वाढते. नकली लेदर बनवण्यासाठी फार खर्च नसतो. त्यामुळे आर्टिफिशिअल लेदरच्या बॅग सहज मिळतात. मात्र त्यांची फिनिशिंग लेदरच्या बॅगसारखी नसते.
सेलमध्ये बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदी करा हे प्रकार
चमक
लेदरला एक विशिष्ठ फिनिशिंग असते. जेव्हा तुम्ही अशा बॅग खरेदी करता तेव्हा तुम्ही या चमकदारपणा वरून तुमची बॅग खऱ्या चामड्याची आहे की आर्टिफिशिअल ओळखू शकता. लेदरच्या बॅगला मॅट फिनिशिंग असते तर बनावट लेदरला खूपच चमक असते.
जाणून घ्या leather बॅग स्वच्छ करण्याच्या योग्य पद्धती
पटर्न
चामड्याच्या बॅगचं पॅटर्न पाहून तुम्ही ओळखू शकता की ही बॅग खऱ्या लेदरची आहे की खोट्या लेदरची. कारण प्युअर लेदरला सुरकुत्यांप्रमाणे दिसणारं पॅटर्न असतं. तर आर्टिफिशिअल लेदर निरनिराळ्या पॅटर्नचं दिसू शकतं.
महिलांची बॅग सांगते त्यांचा स्वभाव, जाणून घ्या तुमची बॅग काय सांगते