DIY फॅशन

तुमच्या बजेटमधील Stylish Handbags, ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात!

Dipali Naphade  |  Jul 8, 2019
तुमच्या बजेटमधील Stylish Handbags, ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात!

कॉलेजपासून अगदी ऑफिसपर्यंत, शॉपिंगपासून ते ट्रॅव्हलिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक मुलीसाठी महत्त्वाचं जर काही असेल तर हँडबॅग. हँडबॅगशिवाय कोणत्याही महिलेचा लुक पूर्ण होत नाही. पण ही फक्त बॅग गरजेसाठीच असते असं नाही तर ही बॅग तितकीच Stylish आणि आपल्या लुकला शोभेल अशी हवी असते. आपल्या गरजेसह आपल्या स्टाईलला मॅच करणारी बॅग आपल्याला हवीच असते. आपल्या बजेटमध्ये अशा अनेक बॅग्ज असतात ज्या आपल्याकडे असायलाच हव्यात. आता बाजारातही अनेक बॅग्ज आल्या आहेत. त्यामुळे यामधून आपल्या आवडीची बॅग निवडून ती शोधून काढणं हादेखील आपल्यासाठी एक टास्कच आहे. आम्ही तुम्हाला काही खास स्टायलिश बॅग्जबद्दल सांगणार आहोत. 

1. Medium size हँडबॅग्ज

Medium साईझ अर्थात मध्यम आकाराच्या हँडबॅगची गरज आपल्याला कोणत्याही कारणाने पडू शकते. अगदी फिरायला जाण्यापासून ते बाजारात भाजी आणायला जाण्यापर्यंत तुम्हाला या बॅगेचा उपयोग होत असतो. या बॅगमध्ये तुम्ही तुमची सौंदर्यप्रसाधनं (cosmetics), मोबाईल, पेन, फणी, लहान पर्स ठेऊ शकता. पूर्वी फक्त या वस्तू ठेवण्यासाठीच याचा उपयोग होत होता. पण आता आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठीदेखील या बॅगचा उपयोग करता येतो. 

2. Cross Shoulder बॅग

आजकाल क्रॉस शोल्डर (Cross Shoulder) बॅगेचा ट्रेंड आहे. आपले हात रिकामे ठेऊन अगदी फ्री होऊन फिरण्यासाठी ही बॅग सर्वच महिलांची खास झाली आहे. यामध्ये विविध व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते. घाईत अथवा अगदी जवळपास तुम्हाला कुठे जायचं असेल तर ही क्रॉस शोल्डर बॅग खांद्यावर लावून तुम्ही बिनधास्त घराबाहेर फिरू शकता. शिवाय ही तुम्हाला तुमच्या वेस्टर्न आऊटफिटवर खूपच शोभून दिसते. तुमच्या लुकला अधिक शोभा देते. 

3. Tote बॅग

या बॅग्ज नॉर्मल हँडबॅग्जपेक्षा आकारात थोड्या मोठ्या असतात. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली अथवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांसाठी या बॅग्जचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. आपल्याला हव्या त्या वस्तू या बॅग्जमधून कॅरी करणं सोपं होतं. आपल्या दिवसभराच्या लागणाऱ्या वस्तू या बॅग्जमधून महिला अथवा मुली व्यवस्थित सांभाळू शकतात. या बॅग्जमध्ये या सर्व वस्तू नीट राहातात. तसंच या बॅग्ज कॅरी करायलाही आरामदायी असतात. याचं जास्त ओझं होत नाही. 

4. क्लच

एखाद्या खास कार्यक्रमाला जायचं असेल तर तुमच्याकडे क्लासी क्लच (Clutch)असायलाच हवा. यामध्ये तुम्ही तुमच्या मुलभूत गरजेच्या वस्तू अर्थात क्रेडिट कार्ड, लायसन्स, व्हिजिटिंग कार्ड अगदी आरामात ठेऊ शकता. कोणत्याही तऱ्हेच्या आकारात आणि विविध व्हरायटीमध्ये क्लच बाजारात उपलब्ध आहेत. इतक्या सगळ्या व्हरायटीमधून शोधणं कठीण आहे. पण तरीही अगदी 400 रूपयांपासून ते महाग किमतीचे क्लच बाजारामध्ये उपलब्ध आहेत. 

5. पोटली बॅग्स

पोटली बॅगचं कनेक्शन हे भारतीय परंपरेशी जोडलेलं आहे. कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमापासून ते अगदी फॉर्मल पार्टीपर्यंत तुम्ही पोटली बॅगचा वापर कुठेही करू शकता. तुमच्या वॉर्डरोबमध्ये ही बॅग असायलाच हवी. तुम्ही ही बॅग अगदी आरामात कॅरी करू शकता. यामध्ये सॅटीन, वेलवेट आणि सिल्क अशा अनेक प्रकारच्या फॅब्रिकच्या बॅग्ज असतात. बाजारामध्ये तुम्हाला हव्या तशा आवडीच्या बॅग्ज तुम्ही घेऊ शकता. 

6. मेसेंजर बॅग

जेव्हा अचानक विकेंडला बाहेर जायचा प्लॅन बनतो तेव्हा तयारी करायला जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे अशावेळी तुम्हाला एक अशी बॅग हवी ज्यामध्ये पटापट तुम्ही तुम्हाला हवं असलेलं गरजेचं सामान ठेऊन निघून शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक मेसेंजर बॅग तर ठेवायलाच हवी. जी तुम्हाला कधीही उपयोगी पडू शकते. अगदी तुम्ही एक दिवसासाठी कुठे जाणार असाल तरीही ही बॅग तुम्हाला साथ देते. 

7. Sports बॅग

तुम्ही जर स्पोर्ट्ससाठी जात असाल अथवा तुम्हाला जिमची आवड असेल तर तुमच्याकडे एक स्पोर्ट्स बॅग असणंही गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला नेहमीच्या बॅगेत जिमचे कपडे अथवा इतर गोष्टी ठेऊन चालणार नाही. तुम्ही फिटनेस फ्रीक असाल तर तुमच्याकडे ही स्पोर्ट्स बॅग असायलाच हवी.

हेदेखील वाचा –

अपर लिप हेअर (Upper Lip Hair) पासून सुटकेसाठी करा 7 सोपे घरगुती उपाय

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

तुमच्या बॅगमध्ये तुम्ही खाण्याच्या या वस्तू ठेवायलाच हव्यात

 

 

Read More From DIY फॅशन