आरोग्य

डिहायड्रेशन टाळण्यासाठी अशी लावा स्वतःला पाणी पिण्याची सवय

Trupti Paradkar  |  Apr 27, 2022
डिहायड्रेशन टाळण्यासाठी अशी लावा स्वतःला पाणी पिण्याची सवय

मानवी शरीराला निरोगी राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण उष्णतेमुळे कमी होते. अशा वेळी डिहाड्रेशन टाळण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने पुरेसं पाणी प्यायला हवं. जर शरीराराला पुरेसं पाणी मिळालं नाही तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुमच्या शरीराला पुरेसं पाणी पिण्याची गरज आहे. त्वचा नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी पाण्याचं प्रमाण शरीरात योग्य प्रमाणात असायला हवं. यासाठी जाणून घ्या उन्हाळ्यात पाणी पिण्याची सवय स्वतःला कशी लावावी. या सोबत जाणून घ्या दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi)

पाणी पिण्याचं वेळापत्रक तयार करा

पाणी पिण्याची सवय लावण्यासाठी आणि शरीराला पुरेसं पाणी मिळण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. तुम्ही यासाठी एक वेळापत्रक तयार करू शकता. सकाळी उठल्यावर कमीत कमी दोन ग्लास पाण्याने दिवसाची सुरूवात करा. त्यानंतर प्रत्येक दोन तासाने एक ग्लास अथवा एक तासाने अर्धा ग्लास पाणी प्या. याला आणखी एक पर्याय म्हणजे दर अर्धा तासाने दोन ते तीन घोट पाणी पिणे. असं केल्याने तुम्हाला दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याची सवय लागेल. मात्र लक्षात ठेवा दहा ग्लासांच्या वर पाणी पिऊ नका. कारण अधिक पाणी पिणंही शरीरासाठी योग्य नाही.

पाणीदार फळं आणि भाज्या खा

How To Increase Your Water Intake

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे पाणीदार फळं खाणं. यासाठी तुमच्या आहारात कलिंगड, किवी, पपई, द्राक्षं, संत्री, स्ट्रॉबेरी, अननस अशी फळं आणि काकडी, टोमॅटो, ब्रोकली, बीट अशा भाज्या समाविष्ठ करा. ज्यामुळे तुमच्या शरीराला हायड्रेट राहण्यास मदत होईल. यासोबत नारळपाणी पिण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Coconut Water Benefits In Marathi)

साखरेचे प्रमाण आणि कॅफेनयुक्त पदार्थ कमी करा

तहान भागवण्यासाठी तर तुम्ही कोल्ड्रिंक्स अथवा कॅफेनयुक्त पेय पित असाल तर सावध राहा. कारण या पेयांमुळे तुमची तहान फक्त काही मिनीटांपुरती भागेल त्यानंतर तुमचं शरीर आधीपेक्षा जास्त डिहायड्रेट होईल. यासाठीच अशा पेयांपासून शक्य तितकं दूर राहा. कारण तुमच्या शरीरासाठी ही पेयं मुळीच योग्य नाहीत.

फ्रीजचं पाणी पिणं टाळा

उन्हाळ्यात तहान लागल्यावर आपण फ्रीजमधील थंड पाण्याची बाटली काढतो आणि उभ्यानेच पाणी पितो. पाणी पिण्याची ही सवय मुळीच योग्य नाही. त्यामुळे फ्रीज पाणी पिणं ताबडतोब थांबवा, कारण यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहात नाहीच उलट तुम्हाला जास्त तहान लागते. त्यामुळे या काळात माठातील अथवा सामान्य तापमानामधील पाणी प्या, शिवाय पाणी पिताना ते बसून घोट घोट प्या. कारण उभ्याने घटा घटा पाणी पिण्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य