DIY लाईफ हॅक्स

पोळी बनवताना वापरल्या या सोप्या ट्रिक्स तर थंड झाल्यावरही राहील मऊ

Dipali Naphade  |  Aug 2, 2021
soft chapati easy tricks

गरम आणि मऊ पोळ्या खायला कोणाला आवडत नाही? अनेकांना तर तव्यावरील गरम गरम पोळ्या ताटात घेऊन खायची सवय असते. गोल आणि नरम पोळी बनविण्यासाठी अनेक जण खास प्रशिक्षणही घेतात असं दिसून आलं आहे. मऊ पोळी ही बऱ्याच जणांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. घराघरातून मुलींसाठी स्थळ बघायला सुरूवात झाली की आपोआपच आईची भुणभूण सुरू होते, पोळ्या गोल करायला आणि मऊ होतील अशा शिकून घे. गोल आणि दिवसभर मऊ अशा आणि चपाती कशी बनवतात याच्या काही सोप्या ट्रिक्स आहेत. तुम्हालाही अशा मऊ पोळ्या खायला आवडत असतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचा आणि या ट्रिक्सचा वापर करून घ्या. कारण कधी कधी पोळी थंड झाल्यावर चिवट होते अथवा कडक होते. पण या खास टिप्स तुम्ही वापरल्यात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल. 

कणीक मळताना थोडेस तूप करा मिक्स, येईल मऊपणा 

Freepik

आपल्याला कणीक मळताना नेहमी कणकेत तूप आणि मीठ मिक्स करण्याची सवय असते. यामुळे पोळीचा स्वादही वेगळा येतो. पण तुम्हाला दिवसभर पोळी मऊ हवी असेल तर तुम्ही कणीक भिजवताना तेलाऐवजी त्यामध्ये तूप मिक्स करा. कोणतेही बॅटर मऊ बनविण्यासाठी जसे मोहन वापरले जाते त्याचप्रमाणे कणकेत तूप घातले तर पोळ्या अधिक मऊ बनण्यास मदत मिळते. मोहन घातल्यामुळे पोळी अत्यंत मऊ राहते आणि कडक होत नाही. त्यामुळे ही सर्वात सोपी ट्रिक आहे. तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की, तूप अधिक प्रमाणात नसावे. केवळ अर्धा चमचा तूप यामध्ये खूप होते

पोळीमध्ये तेलाऐवजी तूप घालण्याचे फायदे – 

पोळी काळी न होण्यासाठी सोपी ट्रिक 

तुमच्या पोळ्या जेव्हा तुम्ही भाजायला घेता तेव्हा त्यावरील लागलेले सुके पीठ सर्वात पहिल्यांदा काढून घ्या. पोळी करताना तुम्ही एखादा कॉटनचा कपडा जवळ ठेवा आणि त्यावरील लागलेले अतिरिक्त पीठ काढून घ्या. तसंच पोळी भाजताना तवा मध्यम आचेवरच गरम करा. कारण तुम्ही अति आंच ठेवली तर पोळी पटकन काळी होते. पोळीची कणीक मऊ असल्यामुळे या गोष्टीबाबत तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तसंच कणीक भिजवल्यानंतर तुम्ही पोळी कडक आणि काळी होऊ नये म्हणून काही वेळ ओल्या कपड्याने झाकून ठेवा. त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा मिळतो. कणीक भिजवल्यावर लगेचच पोळ्या करू नका. 

मऊ पोळ्या बनविण्यासाठी सोप्या गोष्टी ठेवा लक्षात – 

freepik

या ट्रिक्समुळे पोळी बनवताना तुम्हाला फायदा तर होईलच पण दिवसभर तुम्हाला मऊ पोळीचा आस्वाद घेता येईल. त्यामुळे तुम्ही या ट्रिक्स नक्की वापरून पाहा आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कळवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स