DIY लाईफ हॅक्स

घरातील लायब्ररी कशी ठेवता येईल स्टायलिश आणि स्वच्छ

Dipali Naphade  |  Mar 31, 2020
घरातील लायब्ररी कशी ठेवता येईल स्टायलिश आणि स्वच्छ

पुस्तक हीच खरी संपत्ती असं म्हटलं जातं. आपल्याकडे बऱ्याच घरांमध्ये वाचनाची आवड असणारे बऱ्याच व्यक्ती असतात. त्यांच्यासाठी घरात लायब्ररी म्हणजे पर्वणीच. पुस्तकांच्या संपत्तीपुढे जगभरातील कोणतीही संपत्ती नक्कीच फिकी पडेल. तुमच्याही आयुष्यात पुस्तकांना महत्त्वाची जागा असेल तर तुमच्या घरातील लायब्ररी कशाप्रकारे स्टायलिश ठेवायची हे  आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बऱ्याचदा काही घरांमध्ये शेल्फमध्ये अथवा कुठेतरी कोपऱ्यामध्ये पुस्तकं ठेवलेली असतात. पण पुस्तकांची काळजी घेण्यासाठी आणि आपला हा खजिना जपून ठेवण्यासाठी आणि तितकाच स्टायलिश दिसण्यासाठी नक्की काय करायचं हे आपण या लेखातून पाहूया. खरं तर घरात लायब्ररी बनवणं अतिशय सोपं आहे. पण आपल्या आवडत्या पुस्तकांची काळजी घेणं हे फारच कठीण आहे. त्यासाठी काही स्पेशल टिप्स जाणून घ्या. 

1. सर्व पुस्तकं एकत्र करा

सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे असणारी सर्व पुस्तकं तुम्ही एकत्र करा. आता ही सगळी पुस्तकं नक्की कुठे ठेवायची आहेत ते ठरवा. यापैकी काही पुस्तकं अशीही असतील जी तुमची खूप वेळा वाचून झाली असतील अथवा तुम्हाला ती वाचल्यानंतर जास्त आवडली नसतील. तर अशी पुस्तकं सर्वात आधी तुम्ही जवळच्या लायब्ररीमध्ये अथवा ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींंना द्या. या दोनच जागा आहेत जिथे तुम्हाला तुमची पुस्तकं देता येतात आणि त्यांचे महत्त्व जाणून  घेणारी ही जागा आहे. असं केल्याने तुमच्या लायब्ररीमध्ये नव्या पुस्तकांनाही जागा मिळते. 

2. पुस्तकांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ करून घ्या

Shutterstock

हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल तर कधीही पुस्तकांना हात लावण्यापूर्वी हात साफ करून घ्या. कारण खराब हाताने तुम्ही पुस्तकांना हात लावल्यास त्यावर डाग पडतात आणि तुमची पुस्तकं जास्त प्रमाणात खराब होतात. तसंच साफसफाई करताना यावर धूळ उडणार नाही याची काळजी घ्या. पुस्तकांवर जमलेली धूळ तुम्ही झाडू नका.  तर सुक्या कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्या. यामुळे पुस्तकं खराब होणार नाहीत. 

3. दोन डस्टरचा करा वापर

दोन कपड्यांच्या डस्टरचा वापर करा. एका कपड्याने सर्व धूळ आणि माती हळू पुसून एका बाजूला करा आणि पुस्तकं त्या बाजूला ठेवा. त्यानंतर दुसऱ्या कपड्याने तुम्ही पुस्तकं साफ करा. पुस्तकांना हात लावण्यापूर्वी नीट हात धुवा आणि कोरडे करून घ्या. याची पाने खराब होणार नाहीत यासाठी तुम्ही अशा प्रकारे काळजी घेऊ शकता. 

बेडशीट्स खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

4. पुस्तके नेहमी कव्हर्ड शेल्फमध्येच ठेवा

Shutterstock

काही व्यक्तींना पुस्तकं जितकी आवडतात तितकीच ती त्यांना लोकांना दाखवायला पण आवडतात.  त्यामुळे बऱ्याचदा पुस्तकं ही उघड्यावरच ठेवली जातात. पण तुम्हाला जर पुस्तकं जास्त काळ टिकवायची असतील तर तुम्ही पुस्तके ही नेहमी कव्हर्ड शेल्फमध्येच ठेवायला हवीत. त्यासाठी तुम्ही काचेचे कपाट अथवा शेल्फ निवडू शकता. ज्यामुळे पुस्तकं नेहमी सुरक्षित राहतील. उघड्यावर पुस्तकं ठेवल्यास,  धूळ जास्त प्रमाणात बसते तुलनेत शेल्फमधील पुस्तके जास्त चांगली राहतात. 

5. व्हेंटिलेशनकडे लक्ष द्या

पुस्तकांचे शेल्फ अथवा कपाट हे भिंतीपासून थोड्या अंतरावर राहू द्या.  भिंतीला चिकटून ठेवलं तर अथवा भिंतीच्या आतच कपाट बनवलं तर भिंतीवर कोणत्याही प्रकारचा ओलावा नाही ना याची खात्री करून घ्या अन्यथा पुस्तकं खराब होतील. तसंच याला वाळवी लागण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शेल्फ अथवा कपाट थोड्या अंतरावरच राहू द्या.  यामध्ये व्हेंटिलेशन आहे की नाही याकडे लक्ष द्या. 

6. पुस्तकांना ऊन दाखवा

जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लायब्ररी साफ करा. पुस्तकं ऊन्हामध्ये ठेवणं विसरू नका. यामुळे पुस्तकांना जर ओलावा आला असेल तर तो दूर होतो. पुस्तकं जास्त वेळ सुरक्षित राहतात. ऊन दाखवल्याने पुस्तकांची पानेही व्यवस्थित राहण्यास मदत  मिळते. 

उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’

7. अति ऊन आणि अति हवेपासून संपर्क वाचवा

Shutterstock

पुस्तकांना ऊन दाखवणं गरजेचं आहे पण याचा अर्थ बराच काळ ऊन्हात पुस्तकं ठेवायची असा होत नाही. काही वेळानंतर पुस्तकं पुन्हा शेल्फमध्ये ठेवा.  अति ऊन आणि अति हवा यांच्या प्रत्यक्ष संपर्कात पुस्तकांना येऊ देऊ नका. कारण यामुळे पुस्तकं लवकर खराब होतात. 

8. योग्य क्रमाने ठेवा

पुस्तकं योग्य क्रमाने ठेवा. अर्थात विषय – वस्तू इत्यादी पाहून पुस्तकांची मांडणी करा. यामुळे दिसायलाही सुंदर आणि स्टायलिश दिसतं आणि तुम्हाला जेव्हा पुस्तक वाचायचे असते तेव्हा ते मिळणंही सोपं होतं. कादंबरी, कथासंग्रह, कविता, प्रवास वर्णन हे सर्व कप्पे वेगवेगळे ठेवण्याचा प्रयत्न करा. 

9. कव्हर्सच्या रंगानुसार ठेवा

Shutterstock

कव्हर्सच्या रंगानुसार तुम्ही पुस्तकं ठेवा यामुळे लांबूनही तुम्हाला कोणते पुस्तक आहे हे कळेल. एकसारखी  दिसणारी पुस्तकं ठेवल्यास, त्याचा सर्वात जास्त त्रास तुम्हाला होणार. कारण पुस्तकं शोधता येणार नाहीत. त्यामुळे कव्हर्सच्या  रंगानुसार ठेवल्यास तुम्हाला कोणते पुस्तक कुठे ठेवले आहे याचा अंदाज येईल.  

टॉप 10 आयडियाजमुळे तुमचं बेडरूम दिसेल अधिक सुंदर!

10. स्टिकरच्या जागी फ्लॅग स्टिक लावा

आपल्या शेल्फवर विविध पुस्तकांचा क्रम लावा आणि त्याला नावं द्या. स्टिकरच्या लेबलिंगच्या जागी तुम्ही फ्लॅग क्टिक लावा. यावर तुम्हाला हवं तसं सुंदर अक्षरात लिहा. यामुळे दिसायलाही स्टायलिश दिसते आणि दुसऱ्या पुस्तकांवर स्टिकर चिकटून राहण्याची भीतीही राहात नाही. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From DIY लाईफ हॅक्स