Periods

इंटिमेट हायजीनची गरज काय? कसा करावा वापर

Vaidehi Raje  |  Apr 25, 2022
intimate hygiene

पूर्वी स्त्रियांना त्यांच्या इंटिमेट हायजिन आणि त्यासंबंधी विषयांवर मोकळेपणाने बोलण्यास किंवा चर्चा करणास  संकोच वाटत असे.ज्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असे.विविध प्रकारच्या संसर्गाचा त्यांना त्रास होत असे. पण आता काळ बदलला आहे. मुली आणि महिलांना या विषयावर सर्व प्रकारची माहिती देणे आवश्यक आहे जेणेकरून त्या निरोगी राहतील. इंटिमेट हायजिन हा वैयक्तिक स्वच्छतेचा एक आवश्यक पैलू आहे आणि हा स्वच्छतेचा सर्वात महत्वाचा प्रकार आहे. स्त्रियांना केवळ स्वच्छ आणि ताजेतवाने वाटण्यासाठीच नव्हे तर UTI सारख्या गंभीर आरोग्य समस्यांपासून दूर राहण्यासाठी इंटिमेट हायजिन राखणे खूप महत्वाचे आहे. 

इंटिमेट हायजिन म्हणजे काय

इंटिमेट हायजिन हा वैयक्तिक स्वच्छतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. महिलांसाठी त्या भागाची स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. यामुळे त्यांना स्वच्छ आणि ताजेतवाने तर वाटतेच शिवाय तिथे खाज सुटणे, बुरशीजन्य आणि जिवाणू संसर्ग किंवा UTI सारख्या गंभीर समस्या देखील टळतात.पूर्वी जेव्हा या विषयाबद्दल फारशी कुणाला माहिती नव्हती तेव्हा स्त्रिया त्या भागाची स्वच्छता राखण्यासाठी साबणाचा वापर करत असत. परंतु या अवयवांवर जास्त साबण वापरल्याने कोरडेपणा, जळजळ होते आणि व्हजायनाचे पीएच संतुलन बिघडू शकते. व्हजायनाचे नैसर्गिक पीएच हे 3.5 ते 4.5 इतके असते. पण हार्श किंवा सुगंधी साबणाच्या वापरामुळे ते बिघडते. शरीराच्या या भागात असलेले टिश्यूज अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे या भागाच्या अस्वच्छतेमुळे किंवा साबणाने अति जास्त स्वच्छता केल्यानेही महिलांमध्ये  आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Importance of Intimate Hygiene

उन्हाळ्यात इंटिमेट हायजिन विशेष महत्वाचे 

उन्हाळा हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून फारसा चांगला ऋतू नसल्यामुळे अनेकांना या दरम्यान आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये स्त्रियांना जास्त घाम येत असल्यामुळे त्यांना अनेकदा योनीमार्गात संसर्ग होतो आणि त्याबद्दल उघडपणे चर्चा करण्यास त्यांना संकोच वाटतो. अशा स्थितीत  घाम येणे आणि त्वचेचे संसर्गापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून मूत्रमार्गात संसर्ग, लघवीत जळजळ इत्यादी त्रासदायक समस्यांपासून सुटका मिळू शकेल.

जास्त घाम येणार नाही याची काळजी घ्या

उन्हाळ्यात सर्वांनाच खूप घाम येतो. अशा परिस्थितीत जर जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे, मांडीच्या आतील भागात घाम येऊ लागला तर आतले कपडे बदला. इनरवेअर असे असावे की त्याचे फॅब्रिक चांगले असेल. उन्हाळ्यात सिंथेटिक कापडाची अंतर्वस्त्रे घालू नका. जर व्यायाम केल्यामुळे किंवा कुठल्याही कारणामुळे तुम्हाला खूप घाम आला असेल तर ताबडतोब आंघोळ करा आणि तो भाग पूर्णपणे कोरडा करा.

स्वच्छतेची विशेष काळजी घ्या

उन्हाळ्यात सर्वांनीच इंटिमेट हायजिन पाळण्यावर विशेष भर दिला पाहिजे. जर तुम्हाला वारंवार घाम येत असेल तर दिवसातून तीन ते चार वेळा तुमच्या खाजगी अवयवांची हर्बल व ऑरगॅनिक उत्पादने वापरून स्वच्छता करा. अशा प्रकारे तुमचे संसर्गापासून संरक्षण होईल. स्वच्छतेसाठी तुम्ही ऑरगॅनिक हार्वेस्टचे ऑरगॅनिक इंटिमेट वॉश वापरू शकता. यातील ऑरगॅनिक कोरफड व टी ट्री ऑईलचे गुणधर्म तुम्हाला फ्रेश फिलिंग देईल. यातील अल्कोहोल फ्री फॉर्म्युला व्हजायनाचे पीएच हळुवारपणे जपण्याबरोबरच तुमचे इन्फेक्शनपासून संरक्षण करेल.  

इंटिमेट हायजिन असे जपा

दिवसातून दोनदा ऑरगॅनिक इंटिमेट वॉशने तुमचा इंटिमेट एरिया हळूवारपणे स्वच्छ करा.या भागाच्या त्वचेवर खूप गरम पाणी, हार्श साबण इत्यादींचा वापर टाळा. जर तुम्हाला योनीतून पांढरा स्त्राव होत असेल तर त्यामागची कारणे शोधून काढून वेळीच उपचार करा.  नेहमी स्वच्छ व सुती अंतर्वस्त्रे घाला. मासिक पाळी दरम्यान, पॅड्स आणि टॅम्पोन्स वारंवार बदला. या भागाची त्वचा नेहमी कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा.

अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या इंटिमेट हायजिनची काळजी घेऊ शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Periods