Periods

मासिक पाळीतील वेदनेमुळे झालाय त्रस्त, फॉलो करा शिल्पा शेट्टीच्या खास टिप्स

Trupti Paradkar  |  Feb 23, 2022
मासिक पाळीतील वेदनेमुळे झालाय त्रस्त, फॉलो करा शिल्पा शेट्टीच्या खास टिप्स

मासिक पाळी आणि मासिक पाळीत होणाऱ्या वेदना महिलांना दर महिन्याला सहन कराव्या लागतात. काही मुलींना आणि महिलांना होणारा त्रास हा असह्य असतो.  यासाठी औषध घेतल्याशिवाय आराम मिळत नाही. दर महिन्याचे ते चार दिवस त्यामुळे महिलांना नकोसे वाटू लागतात. या काळात काही जणींच्या पोटात दुखतं तर काहीच्या कंबरेतून कळा येतात. काही जणींच्या पायात गोळे येतात तर काहींना छातीत दुखू लागतं. पोटात गॅस होणं, अशक्तपणादेखील जाणवतं. विशेष म्हणजे मासिक पाळी दर महिन्याला येणं गरजेचं असल्यामुळे या गोष्टी सहन करण्याशिवाय महिलांकडे काहीच पर्याय नसतो. मात्र यावर तात्पुरता उपाय एखादी पेन किलर घेणं असलं तरी या काही कायमस्वरूपी उपाय नक्कीच नाही. कारण पेन किलर घेण्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होत जातात. खरंतर महिलांना आता मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांची चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण अभिनेत्री शिल्पा शेट्टीने याबाबत एक खास उपाय महिलांसाठी शेअर केला आहे. 

शिल्पा शेट्टीने दिला खास सल्ला

अभिनेत्री शिल्पा शेट्टी जितकी सुंदर आहे तितकीच फिटदेखील आहे. तिच्या फिटनेसचं रहस्य ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. शिल्पा शेट्टी योगासने आणि व्यायामाच्या प्रकारांमध्ये तज्ञ्ज आहे. तिने नुकतंच योगासनांचे असे काही प्रकार सर्वांसोबत शेअर केले आहेत ज्यामुळे तुमच्या मासिक पाळीच्या वेदना सहज दूर होतील. यासाठी तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत तिने शेअर केलं आहे की, “मासिक पाळीच्या वेदना प्रत्येक महिन्याला सहन करणं ही काही सोपी गोष्ट नाही. जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळत असता तेव्हा तर हे सहन करणं खूपच कठीण असतं. मात्र जर तुम्ही नियमित योगा करत असाल तर तुम्ही या वेदनेतून नक्कीच आराम मिळेल ”

शिल्पा शेट्टीचा फिटनेस फंडा 

शिल्पा शेट्टी योगासनांसाठी खूपच लोकप्रिय आहे. यापूर्वी तिने सोशल मीडियावर अनेक प्रकारची योगासने आणि ते करण्याची पद्धत शेअर केलेली आहे. शिल्पाच्या मते योगासने तुमच्या संपूर्ण शरीराला निरोगी आणि सुदृढ ठेवतात. विशेष म्हणजे काही योगासने महिलांच्या प्रजनन संस्था आणि पोटातील स्नायूंसाठी जास्त लाभदायक असतात. या योगासनांचा नियमित सराव केल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. शिवाय या आसनांमुळे तुम्हाला वयाच्या पुढील टप्प्यातील म्हणजेच उतार वयातील अनेक समस्यांवर मात करता येते. स्वतःला प्रत्येक वयात फिट आणि सुडौल ठेवण्याचा हा सोपा मार्ग आहे. शिल्पा शेट्टी हे याबाबत एक सुंदर उदाहरण नक्कीच आहे.

Read More From Periods