आपल्याकडे पावसाळा सगळ्यांनाच आवडतो. पाऊस सुरू झाला की, काही ना काहीतरी चटपटीत खाण्याचे बेत होतच असतात. पण या हंगामात घरातही अनेक समस्या असतात. खिडकी फुलणे, भिंतीचे पोपडे निघणे, घरात मुंग्याचे येणे अशा अनेक समस्या असतात. या सगळ्या समस्यांवर आपण उपाय करतोदेखील. पण त्यातील एक महत्त्वाची समस्या ठरते ती म्हणजे स्वयंपाकघरातून येणारा दुर्गंध. हवेमध्ये दमटपणा असल्यामुळे स्वयंपाकघरातील कपाटांना एक वेगळ्या प्रकारचा दुर्गंध येत असतो. विशेषतः स्वयंपाकघरात वर असणाऱ्या कपाटांना हा दुर्गंध अधिक प्रमाणात येतो. पावसाळ्यात स्वयंपाकघरातील कपाटातून हा येणारा दुर्गंध कसा कमी करायचा याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला आज या लेखातून सांगत आहोत.
कापराचा करा वापर (Use Camphor)
स्वयंपाकघराच्या कपाटातून येणाऱ्या घाणेरड्या वासापासून लांब राहायचे असेल तर तुम्ही कापराचा वापर करावा. पावसाळ्यात दुर्गंधीपासून ते किड्यांना घालविण्यापर्यंत तुम्ही कापूर वापरू शकता. त्यासाठी तुम्ही खालील काही टिप्सचा वापर करावा –
- सर्वात पहिल्यांदा कापूर एक वा दोन भागात तोडा अथवा ठेचून घ्या
- आता हा कापूर पेपरमध्ये घालून कपाटाच्या कोपऱ्यात ठेवा
- अशा पद्धतीने तुम्ही नॅफ्थलिनची गोळीही क्रश करून पेपरमध्ये बांधून कपाटात ठेऊ शकता
- यामुळे पावसाळ्यात अगदी लाकडी कपाटातून येणारी दुर्गंधी निघून जाण्यास मदत मिळते आणि याच्या वासामुळे किडे आणि मुंगीही कपाटात राहात नाहीत. तसंच पावसाळ्यात लाकडी फर्निचरची स्वच्छता राखता येते
एसेन्शियल ऑईलचा करा वापर (Use Essential Oil)
एसेन्शियल ऑईलचे अनेक उपयोग आहेत. घराच्या अन्य भागाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही एकदा नाही तर कितीही वेळा एसेन्शियल ऑईलचा वापर करून घेऊ शकता. पण तुम्हाला स्वयंपाकघरातील कपाटाची दुर्गंधी दूर करण्यासाठी याचा वापर खालील पद्धतीने करता येऊ शकतो –
- यासाठी तुम्ही लवेंडर ऑईल (Lavender Oil) मध्ये कापूस भिजवून घ्या आणि कपाटातील कोपऱ्यांमध्ये हा कापूस ठेवा
- संपूर्ण पावसाळ्यात तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. यामुळे अजिबात दुर्गंध येणार नाही
बेकिंग सोडाही आहे उपयोगी (Baking Soda is Useful)
कपाटातील दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडाही उपयोगी ठरतो. याचा उपयोग करून तुम्ही केवळ दुर्गंधच नाही तर पावसाळी किडेही नष्ट करू शकता. यासाठी फॉलो करा या टिप्स –
- सर्वात पहिल्यांदा 1 लीटर पाणी घ्या आणि त्यात 1-2 चमचे बेकिंग सोडा घालून नीट मिक्स करा
- त्यानंतर हे मिश्रण स्प्रे च्या बाटलीत भरा आणि कपाटात हा स्प्रे मारा
- ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून साधारणतः दोन ते तीन वेळा करा. यामुळे दुर्गंधी निघून जाईल
- बेकिंग सोड्याशिवाय तुम्ही व्हिनेगरचाही वापर करू शकता
सुगंधित फुलाचा वापर (Use Flowers)
लिव्हिंग रूमपासून ते अगदी बेडरूम आणि स्वयंपाकघरातही दुर्गंधी दूर कऱण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सुगंधित फुलांचा वापर करणे. यासाठी तुम्ही स्वयंपाकघराच्या कपाटात फूल ठेऊ शकता अथवा फुलाची पेस्ट बनवूनही कपाटात ठेवणे योग्य ठरते. तुम्ही मोगरा, गुलाब, चमेली आणि रजनीगंधा या फुलांचा वापर करून घेऊ शकता.
यापैकी कोणत्याही गोष्टींची तुम्हाला अलर्जी असेल तर मात्र तुम्ही याचा अजिबात उपयोग करू नका. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दुर्गंधी घालविण्याचे उपाय वापरून पाहा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक