घर सजवण्यासाठी आपण बऱ्याचदा पारंपरिक आणि आधुनिक लुक असणाऱ्या अशा कारपेटचा वापर करत असतो. कारपेट घातल्याने लादी खराब होत नाही आणि त्याशिवाय घरालाही वेगळा आणि आर्टिस्टिक लुक येतो. पण घराची शोभा वाढवणारे हे कारपेट्स आता खूपच महाग मिळू लागले आहेत. शिवाय कारपेट जुने झाल्यानंतर नक्की काय करायचे हेदेखील कळत नाही. एका ठराविक कालावधीनंतर कारपेट खराब होतात. मग ते कारपेट काढून ते फेकून द्यायचं, गरजवंताला द्यायचं की त्याचा पुनर्वापर करायचा असे प्रश्नही आपल्यासमोर उभे ठाकतात. तसं तर कारपेटचा पुनर्वापर करण्याच्या खूपच वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, ज्या वापरून तुम्ही नक्कीच एक वेगळा लुक देऊ शकता. पण याचा नक्की वापर कसा करायचा ते या लेखातून तुम्ही जाणून घ्या.
बनवा टी कोस्टर
Shutterstock
आपण बाजारातून महाग टी कोस्टर आणतो त्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही जुन्या कारपेटपासून टी कोस्टर बनवू शकतो. हा एकदम सोपा उपाय आहे. त्यासाठी तुम्ही तुमचं वजनाने हलके असलेल्या कारपेटचा तुकडा घ्या. जास्त लांबट अथवा आकाराची गरज नाही. तुम्हाला हव्या त्या आकाराचे कारपेट कापून घ्या आणि तुमच्या हिशेबाने त्याला कॉर्क आणि ज्यूटचा बेस लावा. त्याशिवाय तुम्ही डायनिंग टेबल कोस्टरदेखील अशाच प्रकारे तयार करू शकता. जेणेकरून तुम्ही गरम भांडी त्यावर ठेवल्यास, तुमचे टेबल खराब होणार नाही आणि दिसायलाही आकर्षक दिसेल.
बनवा लहान रग
तुम्हाला हवं तर जुन्या कारपेटचा आकार कमी करून आपल्या इच्छेनुसार डिझाईन बनवून घ्या. हे तुम्ही मुलांच्या खोलीत साईड रग म्हणून वापरू शकता. याप्रकारे तुम्ही घरातील जुने कारपेट अर्थात कालीन वापरून मुलांसाठी रग तयार करू शकता. जुने झालेले कारपेट तुम्ही काढून फेकून देण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त तुम्ही थोड्याशा वेगळ्या कल्पना वापरायची गरज आहे.
घराची सजावट करून द्या घराला नवा लुक, करा स्वस्तात मस्त सजावट (Home Decor Ideas In Marathi)
झाडांच्या कुंडीखाली
Shutterstock
कोस्टर्सप्रमाणे तुम्ही कारपेट्सचे लहान लहान तुकडे कापून आपल्या झाडांच्या कुंडीखाली ठेऊ शकता. वास्तविक आपण जेव्हा झाडांना पाणी देतो तेव्हा बऱ्याचदा पाणी वाहून जातं आणि त्याबरोबर मातीही निघून जाते. त्यामुळे अधिक घाण पसरते. असं असताना माती आणि पाणी दोन्ही सुकण्यासाठी कारपेटचा वापर करणे हा उत्तम पर्याय आहे. नंतर हेच कारपेट्स तुम्ही आरामात धुऊदेखील शकता.
आजारांपासून वाचण्यासाठी वाढतोय ‘नो डेकोरेशन ट्रेंड’, काय आहे नक्की हे
बनवा पायपुसणे
Shutterstock
जरा विचार करा की, तुमच्या घरातील पायपुसणे हे एका कलर थीमप्रमाणे असेल तर? ही कलर कोऑर्डिनेट आयडिया खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग कल्पना आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जुने कारपेट वापरून वेगवेगळ्या डिझाईनचे पायपुसणे तुम्ही तयार करू शकता.
टॉप 10 आयडियाजमुळे तुमचं बेडरूम दिसेल अधिक सुंदर!
तुमच्या पाळीव प्राण्यांसाठीही येईल वापरता
तुमच्या घरात मांजर, कुत्रा असा कोणताही पाळीव प्राणी असेल तर तुम्ही त्यांच्यासाठीही जुन्या कारपेटचा वापर करू शकता. त्यांना घराच्या आकाराचे कारपेट कापून तुम्ही डिझाईन करून देऊ शकता. तुम्हाला हवं तर त्यामध्ये एखादा रगही ठेऊन त्यांना त्यांचे मस्त घर बनवून देऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसात त्यांना नक्कीच याचा उपयोग होईल. त्याशिवाय नेहमीच्या दिवसातही त्यांच्यासाठी एक सुंदर घर तयार होऊ शकतं.