नातीगोती

आलेल्या स्थळातून तुमच्यासाठी परफेक्ट वर/वधू निवडताना

Leenal Gawade  |  Sep 1, 2021
लग्नासाठी स्थळ निवडताना

लग्नासाठी परफेक्ट स्थळ निवडणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्ही लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने करत असाल म्हणजे अगदी वधूवर सुचक मंडळात जाऊन तुम्ही नाव नोंदवले असेल तर अशावेळी स्थळ निवडताना खूपच जबाबदारीपूर्वक काम करावे लागते. कारण बरेचदा लग्न जुळवताना फसवणुकीचे किस्से तुम्हीही ऐकले असेल. लग्न करण्यापूर्वी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी या खोट्या सांगितल्या जातात. या गोष्टी लग्न झाल्यानंतर कळतात. अशावेळी परफेक्ट आणि अचूक स्थळ निवडताना किंवा कोणताही निर्णय घेण्याआधी या गोष्टी नक्कीच लक्षात घ्यायला हव्यात 

स्थळांची करा पडताळणी

तुम्हाला आलेल्या कोणत्याही स्थळाची पडताळणी करणे हे सगळ्यांसाठीच फार महत्वाचे असते खूप जण स्थळांची पडताळणी म्हणावी तशी करत नाही. वर वर पाहता एखादी व्यक्ती चांगली दिसली की त्याची चौकशी करणे सोडून देतात.  हल्ली मोबाईल आणि डेटला जाणे अधिक पसंत केले जाते. त्यामुळे होते असे की, वर वर पाहता एखादी व्यक्ती सुंदर दिसली की त्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यासारखे होते. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी झाल्यानंतर स्थळामध्य असलेली एखादी खोटही  तुम्ही दुर्लक्षित करता असे मुळीच करु नका. सगळ्यात आधी तुम्ही स्थळ योग्य तपासून घ्या. त्याचे वय, कुटुंब, मिळकत, नोकरीचे ठिकाण, राहण्याचे ठिकाण, घेतलेल कर्ज या गोष्टींची माहिती असणे हे फारच गरजेचे असते. जर या गोष्टी माहीत करुन न घेता तुम्ही लग्नाचा निर्णय घेतला तर तो तुम्हाला भारी पडू शकतो. 

अपेक्षांचे ओझे वाढवू शकते नात्यातील तणाव.. तुम्ही करत नाही ना ही चूक

पत्रिका घ्या पाहून

Instagram

पत्रिका पाहणे हे आताच्या जनरेशनसाठी फारच जुनी अशी पद्धत आहे.प्रेमविवाह केला असेल तर अशावेळी पत्रिका पाहिलीसुद्धा जात नाही. पण अरेंज मॅरेज किंवा जुळवून लग्न करताना पत्रिका पाहणे हे फारच महत्वाचे ठरते. खूप जणांना पत्रिकेतील बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. पत्रिकेतील नाडी, रास, लग्न रास, असलेली एखादी समस्या जाणून घेेणे खूपच महत्वाचे असते. जर तुमच्याकडे कोणी पत्रिका मागत असेल तर त्यांना तुम्ही अवश्य पत्रिका द्या. गूण जुळत असतील किंवा नसतील तरीदेखील त्यामधला काही मार्ग नक्कीच काढता येतो. त्यामुळे जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर तुम्ही अवश्य पत्रिका बघा. म्हणजे तुमच्या मनाचे समाधान होईल.

डेटिंग अॅप वरुन प्रेम करताना करु नका या चुका

देवाण घेवणाची बोलणी

देवाण घेवाणाची बोलणी ही देखील लग्नासाठी फार महत्वाची असते. खूप ठिकाणी लग्नाचा खर्च हा अर्धा अर्धा केला जातो. तर काही ठिकाणी मुलींनी सगळे लग्न करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे बरेचदा नात्यात तणाव येण्याची शक्यता असते. पैशांचे वाद हे नात्यात तडा आणण्यासाठी पुरेसे असतात. ज्या कुटुंबाशी तुम्ही संबंध जोडायचे म्हणत आहात किंवा विचारात आहात अशा कुटुंबाचे विचार जाणून घ्या. लग्नासंदर्भात त्यांचे विचार काय आहेत ते जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला त्या कुटुंबाबद्दलची योग्य माहिती मिळू शकेल.कधी कधी या गोष्टीच कुटुंब आणि माणसं जाणून घेण्यासाठी महत्वाच्या असतात. 

त्यामुळे तुम्हाला आलेल्या स्थळातून परफेक्ट स्थळ निवडताना तुम्ही या गोष्टी करायला हव्यात

बाळाच्या जन्मानंतर ‘या’ गोष्टींमुळे येऊ शकतो पतीपत्नीमध्ये दुरावा

Read More From नातीगोती