DIY फॅशन

ऑक्सिडाईज्ड दागिने कसे सांभाळाल, सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Jul 20, 2022
how-to-store-oxidised-jewellery-in-marathi

ऑक्सिडाईज्ड दागिने (Oxidized Jewellery) आजकाल अधिक ट्रेंडिंगमध्ये आहे. कोणत्याही कार्यक्रमात अथवा अनेक ड्रेसवरही हे दागिने तुम्ही परिधान करू शकता. सुंदर ऑक्सिडाईज्ड झुमक्यांपासून ते अगदी चोकरपर्यंत वेगवेगळे डिझाईन्स तुमच्या सौंदर्यात भर घालतात. याच कारणामुळे सोन्याचांदीच्या दागिन्यांइतकीच ऑक्सिडाईज्ड दागिन्यांनाही मागणी वाढली आहे. सणासुदीसाठीही ऑक्सिडाईज्ड दागिन्यांची स्टाईल करण्यात येते. पण ऑक्सिडाईज्ड दागिने घेतल्यानंतर त्यांची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते अन्यथा ते काळे पडण्याची अधिक भीती असते. हे दागिने कसे सांभाळायचे आणि स्टोअर करून ठेवायचे याच्या काही टिप्स आम्ही या लेखातून देत आहोत.

दमटपणापासून ठेवा दूर 

ऑक्सिडाईज्ड दागिन्यांना नेहमीच दमटपणापासून दूर ठेवणं चांगलं. हे दागिने दमट हवामानमुळे लवकर खराब होतात. याची चमक निघून जाते आणि त्याशिवाय काळे पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुम्ही हे दागिने स्टोअर करताना लक्षात ठेवा की, या दागिन्यांना हवा लागू देऊ नका आणि एखाद्या बॉक्समध्ये हे दागिने ठेवा अथवा झिपलॉक पाऊचमध्येही हे दागिने तुम्ही व्यवस्थित ठेऊ शकता. तुम्ही संपूर्ण सेट एकत्र ठेवणार असाल तर तसं अजिबात करू नका. तुमचे झुमके अथवा कानातले एका पाऊचमध्ये आणि नेकलेस एका पाऊचमध्ये ठेवा. डबा असेल तर तो एअर टाईट असायला हवा. यामुळे दागिने तुटण्याचा धोका राहात नाही. तसंच हे ऑक्सिडाईज्ड दागिने अधिक काळ सुरक्षित राहातात. 

परफ्यूम अथवा सौंदर्यप्रसाधन उत्पादनांपासून लांब ठेवा 

तुम्ही जेव्हा ऑक्सिडाईज्ड दागिने परिधान करता तेव्हा तुम्हाला परफ्युम अथवा कोणत्याही सौंदर्यप्रसाधन उत्पादनापासून या दागिन्यांना दूर ठेवायला हवे हे लक्षात घ्यायला हवे. तुम्ही कोणत्याही सौंदर्यप्रसाधानांचा वापर करत असाल तर दागिने घालण्यापूर्वी तुम्ही परफ्युम वापरा अथवा मेकअप करा. तसंच हे व्यवस्थित सुकल्यानंतरच अंगावर ऑक्सिडाईज्ड दागिने घाला. तुम्हाला खूप घाम येत असेल तर त्यामुळे ऑक्सिडाईज्ड दागिने खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे दागिने ठेवताना त्याला लागलेला घाम आणि सौंदर्यप्रसाधाने हे व्यवस्थित पुसून आणि सुकवून घ्या आणि मगच दागिने ठेवा. विशेषतः कॉटन साडीसह अशा एक्सेसरीज अधिक उठावदार दिसतात. 

एअर टाईट बॉक्समध्ये ठेवा 

तुम्ही ऑक्सिडाईज्ड दागिने जर एअर टाईट बॉक्समध्ये ठेवणार असाल तर त्यात मऊ कापड अथवा टिश्यूचा वापर करा. डब्यात दागिने ठेवण्यापूर्वी कापूस, कापड वा टिश्यूचा वापर करावा. यामुळे दमटपणा शोषला जातो आणि दागिने खराब होत नाहीत. मात्र यामध्ये दागिने अडकणार नाहीत याची व्यवस्थित काळजी घ्या. कारण दागिने अडकल्यास, तुटण्याची शक्यता असते. 

ऑक्सिडाईज्ड दागिने कसे कराल स्वच्छ 

या सर्व टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे ऑक्सिडाईज्ड दागिने अत्यंत चांगले राखू शकता. ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा तोरा काही वेगळाच असतो. त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित सांभाळून ठेवण्यासाठी नक्की आम्ही दिलेल्या टिप्सचा वापर करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन