फॅशन

इमिटेशन ज्वेलरीची अशी घ्या काळजी

Leenal Gawade  |  Oct 12, 2021
इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेताना

सोन्याचे दागिने घेणे म्हणजे हल्ली सगळ्यांनाच परवडेल असे नाही. एखादा छोटासा दागिना घ्यायचा विचार केला तरी 50 हजार रुपयांच्या पुढे जातात. सगळ्यांनाच सोन्याचे दागिने घ्यायला जमत नाही अशांना इमिटेशन ज्वेलरीचा आधार घ्यावा लागतो. इतकेच नाही तर खूप जणांना सोन्याचे दागिनेही आवडत नाही. अशांना इमिटेशन ज्वेलरी घालायला खूप आवडते. इमिटेशन ज्वेलरी स्वस्त असतात असे नाही. पण सोन्याच्या तुलनेत यामध्ये तुम्हाला बरेच पॅटर्न मिळतात. त्यामुळे अशा ज्वेलरी खूप जण खरेदी करतात. अशा इमिटेशन ज्वेलरीची काळजी नेमकी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.

सोन्याच्या दागिन्यांना द्या गेरु फिनिंशिंग

परफ्युमचा करु नका वापर

तुम्ही काही खास हेव्ही रेंजच्या इमिटेशन ज्वेलरी घातल्या  असतील तर अशा ज्वेलरीवर परफ्युम अजिबात मारु नका. कारण त्यामुळे तुमच्या ज्वेलरीचा रंग जाण्याची शक्यता असते. त्यामुळे परफ्युम लावल्यानंतर किंवा तो सेट झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटी ज्वेलरी घाला. त्यामुळे दागिना हा जास्तीत जास्त काळासाठी टिकतो.त्यामुळे परफ्युमचा वापर करताना तुमच्या इमिटेशन ज्वेलरीची ही काळजी घेतली तर तो दागिना जास्त काळासाठी टिकतो.

एअर टाईट डब्यात ठेवा

Instagram

सोन्याचे दागिने कसेही ठेवले तरी चालतात. म्हणजे ते एका रुमालात बांधले तरी चालू शकतात. पण इमिटेशन ज्वेवलरी या एअर टाईट डब्यात ठेवल्या तर त्या जास्त काळासाठी टिकतात. इमिटेशन ज्वेलरी या काही गोष्टींच्या संपर्कात आल्या तर त्यांचा रंग उडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या वाईट दिसतात. त्यामुळे तुम्ही एखादा दागिना काढल्यानंतर तो अगदी नीट डब्यात भरुन ठेवा. त्यामुळे तो जास्तीत जास्त टिकतो. 

पारंपरिक बांगड्यांच्या एव्हरग्रीन डिझाईन्स

मळसूत्र ठेवा जपून

कोणत्याही दागिन्याचे मळसूत्र जपून ठेवणे फारच कठीण असते. इमिटेशन ज्वेलरीच्या मळसूत्राबाबतही नेहमी असेच होते. कारण जड कानातल्यांसाठी असलेले खास मळसूत्र त्यातील रबर का काही काळानंतर निघतो. मळसूत्र नीट लागत नाही. त्यामुळे अशावेळी तुम्ही प्लास्टिकचे घट्ट मळसूत्र जास्तीचे आणून ठेवा. त्यामुळे मळसूत्र हरवले तरी देखील तुम्हाला ते कानातले वापरता येतात.

कानातले ठेवा जपून

Instagram

कानातल्यांचे दांडे  हे देखील खूप वेळा वाकतात. त्यामुळे ते तुटण्याची किंवा वाकडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे कानातल्यांचे दांडे वाकू नये म्हणून तुम्ही कानातले योग्य घालून ठेवून द्या म्हणजे तुम्हाला कानातल्यांपासून वंचित राहावे लागणार नाही. कारण कानातले तुटल्यामुळे अनेकदा सेट हा वाया जाण्याची शक्यता असते.  त्यामुळे कानातले जपून ठेवा. 

सेट ठेवा पुसून

इमिटेशन ज्वेलरी ही जास्ती वेळ घातल्यानंतर त्याला घाम लागतो. शरीराला त्याचे घर्षण झाल्यामुळे त्याचा रंग जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कोणताही दागिना काढल्यानंतर लगेचच तो स्वच्छ पुसून किंवा थोडासा वाऱ्यावर ठेवून वाळवून मग तो आत ठेवून द्या. 

आता इमिटेशन ज्वेलरी तुमच्याकडे असेल तर त्याची अशापद्धतीने नक्कीच काळजी घ्या

सुंदर आणि लेटेस्ट नथ डिझाईन्स खास तुमच्यासाठी

Read More From फॅशन