DIY लाईफ हॅक्स

पावसाळ्यात तुमचा लेदर सोफा असा ठेवा स्वच्छ आणि निर्जंतूक

Trupti Paradkar  |  Jul 27, 2022
how to take care of leather sofa during monsoon in marathi

घराची सजावट हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. नवीन घर घेतल्यावर अथवा जुन्या घराचं नुतनीकरण केल्यावर घर कसं सजवायचं हे प्रत्येकाने ठरवलेलं असतं. आपलं घर क्लासी लुकचं असावं आणि येणाऱ्या प्रत्येकाला ते आवडावं अशी तुमची इच्छा असते. घराच्या लुकमध्ये फर्निचरचा रोल महत्त्वाचा असतो. यासाठी तुम्ही जास्तीत जास्त क्लासी फर्निचर घराच्या सजावटीसाठी निवडता. आजकाल लेदर सोफ्याचा ट्रेंड आहे. इतर सोफ्याच्या मानाने लेदर सोफे महाग आणि रॉयल लुक देणारे असतात. मात्र असा सोफा खरेदी केल्यावर त्याची पावसाळ्यात कशी निगा राखावी हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. कारण जर योग्य निगा नाही राखली तर लेदरच्या सोफ्याला बुरशी लागून त्यातून दुर्गंधी येऊ लागते. यासाठी जाणून घ्या पावसाळ्यात लेदर सोफ्याची कशी काळजी घ्यावी. तसंच वाचा आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi), वास्तु शास्त्र टिप्स मराठीत | Vastu Shastra Tips For Home In Marathi, घराची सजावट करून द्या घराला नवा लुक, करा स्वस्तात मस्त घर सजावट (Home Decor Ideas In Marathi)

वॅक्यूम क्लिनरचा वापर करा 

लेदरचा सोफा नियमित स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यासाठी व्यॅक्यूम क्लिनर वापरणे. असं केल्यास सोफ्याचा प्रत्येक कोपरा आणि अडचणीचा भाग स्वच्छ होतो. धुळ, माती अथवा ओलावा कमी झाल्यामुळे सोफ्याला फंगस लागत नाही. सोफा स्वच्छ राहिला तर तो लवकर खराब होत नाही.

लेदर क्लिनिंग सोल्यूशन वापरा

बाजारात आजकाल प्रत्येक गोष्टींसाठी क्लिनिंग सोल्यूशन तयार मिळतात. लेदरचे सोफे स्वच्छ करण्यासाठी खास सोल्यूशन तयार करण्यात येतात. काही लोक लेदरचे सोफे ओल्या फडक्याने पुसतात. पावसाळ्यात असं केल्यामुळे सोफा बुरशी लागून खराब होऊ शकतो. यासाठी लेदरचा सोफा स्वच्छ करण्यासाठी नेहमी लेदर क्लिनिंग सोल्यूशनचाच वापर करा.

हवेशीर जागी सोफा ठेवा

पावसाळ्यात लेदरचे सोफे, लाकडी फर्निचर अशा अनेक वस्तूंना बुरशी लागण्याची शक्यता असते. यासाठी या वस्तू हवेशीर जागी असाव्या. उन्हाळ्यात तुम्ही सोफ्याची अरेंजमेंट खिडकीजवळ केली तर घामामुळे लेदरचे सोफे खराब होण्याचं प्रमाण कमी होतं. घामामुळे लेदरचा सोफा खराब होऊ नये यासाठी ते हवेशीर आणि थोडं ऊन मिळेल अशा ठिकाणी असावे. मात्र पावसाळ्यात खिडकीतून पावसाचे पाणी आत येत असेल तर अशा ठिकाणी लेदरचा सोफा ठेवू नये.अशा वेळी पावसाच्या ओलाव्यामुळे सोफा खराब होऊ नये यासाठी सोफ्याला कव्हर लावणं नक्कीच फायद्याचं ठरेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक


Read More From DIY लाईफ हॅक्स