Natural Care

बीचवर टॅन व्हायचं नसेल तर अशी घ्या त्वचेची काळजी

Leenal Gawade  |  Feb 9, 2021
बीचवर टॅन व्हायचं नसेल तर अशी घ्या त्वचेची काळजी

कोरोना आटोक्यात आल्यापासून अनेकांनी घराबाहेर पडत आनंद लुटण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. निसर्गसौंदर्य आणि कोरोनापासून अलिप्त असलेल्या अशा ठिकाणांना लोकांनी अधिक पसंती दिलेली दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवताना अनेक जण दिसत आहे. समुद्राचे पाणी, भरपूर मासे, मजा असा काहीसा प्लॅन तुम्हीही  केला असेल. समुद्रात खेळायला आवडतं पण टॅन होण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही त्वचेची कशी काळजी घ्यावी आणि टॅन होण्यापासून स्वत:ला कसं वाचवावे याच्या काही ट्रिक्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

समुद्र आवडत असेल तर कोकणातील देवबाग आहे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण

कोकोनट ऑईल

Instagram

नारळाचे तेल हे त्वचेसाठी सगळ्यात उत्तम असे ऑईन्मेंट आहे. तेलाच्या वापरामुळे त्वचेवर एक आवरण तयार होते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर सूर्याची किरणं तितकासा त्रास देत नाही. जर तुम्ही खूप वेळ समुद्रात खेळायला जाणार असाल आणि तुमची त्वचा कोरडी होऊ द्यायची नसेल आणि त्वचेवर टॅन होऊ द्यायचे नसेल तर तुम्ही संपूर्ण अंगाला कोकोनट ऑईल लावा. समुद्राच्या पाण्यात राहिल्यामुळे केसांनाही त्रास होतो. अशावेळी केसांनाही कोकोनट ऑईल लावले तरी चालेल. त्यामुळे तुमच्या केसांचे आणि त्वचेचे मॉईश्चर टिकून राहील

सनस्क्रिन

 टॅन होऊ नये म्हणून सनस्क्रिन लावणे हा उत्तम पर्याय आहे. पण सगळेच सनस्क्रिन तुम्हाला टॅनपासून सुरक्षित ठेवतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सनस्क्रिन निवडताना तुम्हाला त्याचे SPF चेक करा. तुमच्या त्वचेचा प्रकार आणि SPF याची योग्य निवड करुन ते लावा. फक्त समुद्राच्या पाण्यात उतरतानाच नाही पण जितके दिवस तुम्ही अशा ठिकाणी आहात तितके दिवस तुम्ही बाहेर पडण्याआधी संपूर्ण शरीराला सनस्क्रिन लावा. त्यामुळे त्वचेत क्रिम चांगले मुरेल आणि त्वचा टॅनही होणार नाही.

आंघोळ

Instagram

समुद्रात भिजताना जितकी मजा येते. तितकी बाहेर आल्यानंतर त्वचेची लाही लाही व्हायला लागते. पाण्यात असताना उन्हाच्या झळा त्वचेला किती बसतात हे लक्षात येत नाही. पण  पाण्यातून आल्यानंतर काळवंडलेल्या शरीरावरुन टॅन काढून टाकायचे असेल तर तुम्ही जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर आंघोळ करा म्हणजे तुमच्या त्वचेवरुन टॅन निघून जाईल. शिवाय मीठाच्या पाण्यामुळे त्वचेला येणारा कोरडेपणा कमी होईल.

DIY – डागविरहित त्वचेसाठी करा घरातील कापूराचा वापर

फुल टीशर्ट

 समुद्रासारख्या ठिकाणी गेल्यावर चांगले फोटो काढण्याची हौस सगळ्यांना असते.  त्यामुळे स्टायलिश कपडे आपण घेऊन जातो. फोटो काढल्यानंतर त्वचेवर झालेले टॅन काढता नाकी नऊ येते. त्यामुळे शक्य असेल त्यावेळी पूर्ण बाह्याचे आणि शरीर झाकतील असे कपडे घाला. या शिवाय रंगाची निवड करतानाही फ्रेश आणि चांगल्या रंगाची निवड करा.  काळा रंग टाळा कारण हा रंग अति उष्णता खेचू घेतो. ज्यामुळे तुम्ही कितीही त्वचेची काळजी घ्यायचे म्हटले तरी देखील तुमची त्वचा टॅन होते. लाईट रंगाचे आणि पटकन वाळणारे हुड जॅकेट किंवा अशा काही कपड्यांचे प्रकार तुम्ही कॅरी करा.


 आता बीचवर जाणार असाल तर त्वचेच्या काळजीसाठी या गोष्टी नक्की करा.

त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी असा वापरा चूना

Read More From Natural Care