Acne

(१५+ टिप्स) उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी | Summer Skin Care Tips In Marathi

Trupti Paradkar  |  Apr 15, 2019
Summer Skin Care Tips In Marathi

ऋतूत बदल झाला की वातावरणात देखील प्रचंड बदल होतात. एप्रिल महिना सुरू झाला की, उन्हाची काहिली वाढत जाते. सहाजिकच वाढत्या उन्हाचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागतो. एवढ्या कडाक्याच्या उन्हात प्रत्येकाने स्वतःच आरोग्य नीट ठेवण्यासाठी हेल्थ टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. या दिवसांमध्ये आरोग्यासोबत त्वचेची काळजी घेण्याची देखील फार गरज असते. कारण उन्हाळ्याच त्वचा काळवंडणे, त्वचेवर काळे डाग अथवा चट्टे पडणे, सनटॅन होणे, त्वचा तेलकट अथवा कोरडी पडणे, त्वचेवर पुरळ येणे, घामोळे येणे अशा अनेक सौंदर्य समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचेची काळजी खास घेण्याची गरज असते. जाणून घ्या यासाठी काही सोप्या टिप्स

Table of Contents

  1. सनस्क्रिन लावा आणि उन्हाळ्यात त्वचा सुरक्षित ठेवा
  2. फेसवॉश वापरा उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी
  3. स्किन केअर रूटिन फॉलो करा करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या
  4. स्किन केअरमध्ये अँटीऑक्सिडंटचा वापर करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या
  5. त्वचा हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा (Keep Your Skin Hydrated)
  6. त्वचा एक्सफोलिएट करा (Exfoliate For Healthy Skin)
  7. हेवी मेकअप टाळा – उन्हाळ्यात त्वचेची काळजी टिप्स
  8. चांगले टोनर वापरा आणि उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या
  9. त्वचा मॉईस्चराईझ करणे उन्हाळ्यात त्वचेसाठी गरजेचे
  10. भरपूर पाणी पिणे उन्हाळ्यात त्वचेसाठी उपयुक्त ठरते
  11. कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या
  12. आरामदायक कपडे वापरा (Wear Breathable Fabrics)
  13. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय
  14. FAQ

सनस्क्रिन लावा आणि उन्हाळ्यात त्वचा सुरक्षित ठेवा

Wear Sunscreen – खरंतर कोणत्याही ऋतूत घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे फार गरजेचे आहे. कारण सनस्क्रीन लोशन लावल्यामुळे त्वचेचा थेट प्रखर सूर्यकिरणांसोबत संपर्क होणे टाळता येते. मात्र लक्षात ठेवा उन्हाळ्यात नेहमी चांगल्या कंपनीचे आणि जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन लोशन लावा. घरा बाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी पंधरा ते वीस मिनीटे आधी सनस्क्रीन लोशन लावणे गरजेचे आहे. ज्यामुळे ते त्वचेत चांगले मुरते आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण करते. सनस्क्रीन निवडताना तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सनस्क्रिन निवडा.

फेसवॉश वापरा उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी

Face Wash to Remove Excess Oil – दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे फार गरजेचे आहे. चेहरा धुण्यासाठी चांगल्या प्रतीचे फेस वॉश वापरा. आजकाल बाजारात विविध प्रकारच्या त्वचेसाठी निरनिराळे फेसवॉश मिळतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ आणि प्रदूषण निघून जाते. त्वचा स्वच्छ झाल्यामुळे त्वचेला पुरशा ऑक्सिजनचा पुरवठा होईल आणि तुम्ही दिवसभर फ्रेश दिसाल.

स्किन केअर रूटिन फॉलो करा करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या

उन्हाळा असो वा कोणताही ऋतू त्वचेची निगा राखण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्किन केअर रूटिन फॉलो करणे. नियमित त्वचेची निगा राखली तर कोणत्याही ऋतूमध्ये त्वचा निरोगी राहिल. मात्र लक्षात ठेवा यासाठी कोरड्या त्वचेसाठी स्किन केअर निवडताना ते जेल बेस निवडा तर तेलकट त्वचेसाठी मात्र वॉटर बेस प्रॉडक्ट निवडा. कारण तेलकट अथवा क्रिम बेस असलेल्या उत्पादनांमुळे तुमचा चेहरा अधिक तेलकट दिसू शकतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कमीत कमी दोनदा त्वचेला क्लिंझिंग, टोनिंग आणि मॉईस्चराईझिंग करणं गरजेचं आहे.

स्किन केअरमध्ये अँटीऑक्सिडंटचा वापर करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या

Include Antioxidants In Your Skin Care – उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्वचेवर अॅंटि ऑक्सिडंट सीरम वापरणं. कारण त्यामुळे वातावरणातील बदलांचा यामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होत नाही. हवामानातील फ्री रेडिकल्समुळे त्वचेचं खूप नुकसान होत असतं. उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही नियमित अशा सीरमचा वापर त्वचेवर करू शकता. त्वचेला अॅंटि ऑक्सिडंट्स मिळण्यासाठी आहारात तुम्ही लिंबू वर्गातील फळं, हिरव्या पालेभाज्या, ग्रीन टीचा समावेश करू शकता. 

त्वचा हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा (Keep Your Skin Hydrated)

उन्हाळ्यात जशी तुमच्या शरीराला हायड्रेट राहण्यासाठी गरज असते तशीच त्वचेलाही असते. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी हायड्रेटिंग मास्कची निवड करा. रात्री झोपण्यापूर्वी हायड्रेटिंग मास्क चेहऱ्याला लावण्यामुळे तुमच्या त्वचेला टवटवीतपणा मिळतो. रात्रभर त्वचा फ्रेश राहते आणि त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासाठी भरपूर पाणी पिणे आणि सतत चेहरा धुणे गरजेचं आहे. 

त्वचा एक्सफोलिएट करा (Exfoliate For Healthy Skin)

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तो फक्त धुण अथवा चांगले फेसवॉश वापरणं पुरेसं नाही. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी आणि त्वचा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी चांगल्या स्क्रबने त्वचा एक्सफोलिएट करायला हवी. मात्र लक्षात ठेवा तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य अशा फेस स्क्रबची निवड करा. चेहरा एक्सफोलिएट करताना मान आणि ओठ स्वच्छ करायला विसरू नका.न

हेवी मेकअप टाळा – उन्हाळ्यात त्वचेची काळजी टिप्स

Avoid Heavy Makeup – उन्हाळ्यात हेवी मेकअप करणे टाळा. कारण उन्हाळ्यात तुम्हाला भरपूर प्रमाणात घाम येतो. घामामुळे मोकळ्या झालेल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये मेकअपचा थर जातो. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र ब्लॉक होतात. त्वचेच्या आतील भागाचा संपर्क केमिकलयुक्त मेकअपच्या थरासोबत झाल्यामुळे त्वचा समस्या निर्माण होतात. यासाठी उन्हाळ्यात मेकअप करणं टाळावं, अथवा गरज असल्यास हलका आणि नैसर्गिक मेकअप करावा. तसंच तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप निवडा, कारण जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि तुम्ही लिक्विड अथवा क्रिम बेस फाऊंडेशन अथवा मेकअपचं साहित्य वापरलं तर तुमचा मेकअप घामामुळे उतरतो. ज्यामुळे लुक खराब होण्याची शक्यता असते. यासाठी जाणून घ्या उन्हाळ्यात मेकअप कसा करावा | Tips For Summer Makeup In Marathi

चांगले टोनर वापरा आणि उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या

Use A Good Toner – चांगल्या टोनरमुळे तुमच्या त्वचेची उघडी झालेली छिद्रे पुन्हा पूर्ववत होतात. म्हणूनच क्लिंझिंगनंतर त्वचेला चांगल्या टोनरची गरज असते. जर ओपन पोअर्स बंद नाही झाले तर त्वचेमधून अतिरिक्त तेल बाहेर पडत राहते ज्यामुळे त्वचा तेलकट होतो आणि त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात. अशा वेळी त्वचेला थंडावा देणाऱ्या कोरडफ, गुलाबपाणी अथवा काकडीच्या रसाचे टोनर उपयुक्त ठरते. ज्यामुळे त्वचेची छिद्रे पुन्हा पहिल्यासारखी बंद होतात. 

त्वचा मॉईस्चराईझ करणे उन्हाळ्यात त्वचेसाठी गरजेचे

Moisturize Well – त्वचा क्लिन आणि टोन केल्यानंतर तुमच्या त्वचेला हायड्रेट आणि मऊ राहण्यासाठी गरज असते चांगल्या पोषणाची… त्यामुळे फक्त हिवाळ्यात नाही तर उन्हाळ्यातही तुम्ही त्वचेवर मॉईस्चराईझर वापरू शकता. मात्र लक्षात ठेवा उन्हाळ्यात त्वचेला जास्त चिकट नसलेलं अथवा वॉटर बेस मॉईस्चराईझर वापरावं. ज्यामध्ये जास्तीत जास्त व्हिटॅमिन्स आणि एपीएफ फॉर्म्युलाचा वापर केलेला असेल. अंघोळीनंतर आणि रात्री झोपताना त्वचेला मॉईस्चराईझ करण्याची गरज आहे.

भरपूर पाणी पिणे उन्हाळ्यात त्वचेसाठी उपयुक्त ठरते

Drink More Water – शरीर हायड्रेट राहण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामध्ये शरीर नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातून भरपूर प्रमाणात घाम बाहेर पडत असतो. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी अनियंत्रित होते. उन्हाळ्यात पुरेसे पाणी न पिल्यास तुमचे शरीर आणि त्वचा लवकर डिहायड्रेट होते. कोरड्या त्वचेमुळे अनेक त्वचा समस्या निर्माण होतात. शिवाय डिहायड्रेशनमुळे तुम्हाला उष्माघाताचा त्रास देखील होऊ शकतो. यासाठी उन्हाळ्यात शरीर आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी प्या. त्वचा नितळ आणि चमकदार दिसण्यासाठी उन्हाळ्यात दररोज नारळपाणी, लिंबूपाणी, कोकमाचे सरबत, आवळा सरबत अथवा वाळ्याचे सरबत पिण्यास काहीच हरकत नाही.

कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या

Stay Away From Sugary Drinks – उन्हाळ्यात एक सर्वात मोठी चूक केली जाते ती म्हणजे सतत कोल्ड ड्रिंक्स पिणं. कोल्ड ड्रिंक्स थंडावा देणारे असले तरी त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुम्हाला सतत तहान लागत राहते आणि शरीर साखरेचे प्रमाण वाढून तुमचे शरीर डिहायड्रेट होते. शिवाय वजन वाढण्यासाठी आणि आरोग्य बिघडण्यासाठी ते कारणीभूत ठरते. यासाठी उन्हाळ्यात कितीही तहान लागली तरी कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका. 

आरामदायक कपडे वापरा (Wear Breathable Fabrics)

उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही सुती आणि आरामदायक कपडे वापरणं गरजेचं आहे. सिंथेटिक, अंगाला चिकटणारे, हवा खेळती न ठेवणारे कपडे तुमच्या त्वचेचं नुकसान करतात. यामुळे तुम्हाला आरामदायक वाटत नाहीत पण अति प्रमाणात घाम येतो.  त्वचेच्या समस्या यामुळे वाढत जातात. 

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायSimple Home Remedies For Skin Care In Summer Marathi

तुमची त्वचा कोणत्याही प्रकारची असो काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही उन्हाळ्यात त्वचेची निगा राखू शकता. 

नॉर्मल त्वचेसाठी घरगुती उपचार – Home Remedies For Normal Skin In Marathi

काही घरगुती उपचार देखील त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.

तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय – Home Remedies for Oily Skin In Marathi

उन्हाळ्यात अति घामामुळे त्वचा तेलकट आणि चिकट होते. अशा वेळी साधे घरगुती उपाय करून तुम्ही त्वचेचा तेलकटपणा कमी करू शकता.

कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय – Home Remedies for Dry Skin In Marathi

कोरडी त्वचा उन्हामुळे अधिक रूक्ष आणि रखरखीत होते. यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. 

संवेदनशील त्वचेसाठी घरगुती उपचार – Home Remedies for Sensitive Skin In Marathi

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला इतर त्वचेपेक्षा या त्वचेची उन्हाळ्यात थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

FAQ‘s – उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याबाबत

प्रश्न  – उन्हाळ्यात सनस्क्रीनची निवड कशी करावी ?

उत्तर – प्रत्येक त्वचेसाठी निरनिराळ्या सनस्क्रीनची गरज असते. त्यामुळे तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे पाहून सनस्क्रीनची निवड करा. प्रत्येक उत्पादनावर ते कोणत्या त्वचाप्रकारासाठी योग्य आहे हे लिहीलेले असते. त्यामुळे एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यावरील माहिती अवश्य वाचा. एसपीएफ 30 पेक्षा अधिक एसपीएफ असलेले सनस्क्रीन उन्हाळ्यात वापरणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला त्वचेनुसार काही उत्पादने सांगितली आहेत याचा देखील तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो.

प्रश्न –घरी त्वचा डीटॅन कशी करावी ?

उत्तर – उन्हाळ्यात त्वचा टॅन होण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. जर तुम्हाला घरीच त्वचा डीटॅन करायची असेल तर त्वचेवर बटाट्याचा रस लावा. कारण बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग घटक असतात. ज्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते.

प्रश्न – उन्हाळ्यात त्वचा निरोगी राहण्यासाठी किती पाणी प्यावे ?

उत्तर – साधारणपणे शरीराला दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिण्याची गरज असते. मात्र उन्हाळ्यात शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सतत पाणी पिणे गरजेचे आहे. यासाठी दर पंधरा मिनीटांनी थोडे थोडे पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पाणी पिण्याची आठवण होण्यासाठी कामाच्या ठिकाणी बाटली भरून ठेवा आणि दर पंधरा मिनीटांचा अलार्म लावा.

Conclusion – त्वचा सुंदर दिसण्यासाठी उन्हाळ्यात त्वचेची विशेष निगा राखणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही शेअर केलेल्या या समर स्कीन केअर टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

Read More From Acne